सासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..

”प्रेक्षक हो हसताय ना… हसायलाच पाहिजे…” हे वाक्य कानावर पडले कि कोण आठवतो ? दर सोमवारी आणि मंगळवारी छोट्या पडद्यावर साडे नऊ वाजता प्रत्येक मराठी माणूस झी टीव्ही समोर बसतो कारण एकच डॉ. निलेश साबळे आणि त्यांची चला हवा येऊद्या ची टीम आहे. डॉक्टर निलेश साबळे मराठी प्रेक्षकाच्या मनामनात घर करून बसले आहे. अभिनय क्षेत्रात कुठलीही पार्श्वभूमी नसतात आज डॉक्टर निलेश साबळे आपले सर्वोच्च स्थान बनवून आहे. सासवड पुणे ते मुंबईची स्वप्ननगरी आज हा प्रवास आपण खासरेवर बघूया..

सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी घालतो. झी मराठी वाहिनीवर एक रिअॅलिटी शो येतो त्यामध्ये निलेश साबळे भाग घेतात आणि आपल्या उत्कृष्ट कलागुणामुळे हा कार्यक्रम जिंकतो आणि महाराष्ट्राला मिळाला सर्वाचा लाडका डॉक्टर निलेश साबळे. पुढे फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर करतो. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते. पण वरवर जरी हे सगळं सहज-सोपं वाटंत असलं, तरी त्यामागचे प्रयत्न, अडथळ्यांवर मात करत स्वप्नपूर्तीसाठी झगडून हा तरुण आज यशोशिखरावर पोहोचला आहे.

३० जून १९८६ रोजी पुण्यातील सासवड येथे निलेश साबळे यांचा जन्म झाला. अगदी बालपणापासून निलेशला अभिनयाची आवड मात्र आपल्या इकडे अभिनय हे क्षेत्र सामान्या करिता नाही हि पद्धत प्रचलित आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलाची इच्छा होती कि मुलाने डॉक्टर व्हावे त्यांना डॉक्टर होता आले नाही म्हणून हे स्वप्न ते मुळात बघत असे. त्यांना दोन मुले त्यामुळे निलेश हे वैद्यकीय क्षेत्राकडे वळले. निलेशचे वडील शिक्षण अधिकारी होते. डॉक्टरांचे प्राथमिक शिक्षण सासवडच्या वाघिरे विद्यालयात पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी पाटसच्या नागेश्वर विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. शाळेत स्नेहसंमेलन असले कि निलेश शिवाय ते पूर्ण होत नसे. कारण अंगात असलेला नकलाकार त्यामुळे तो पूर्ण शाळेत प्रसिद्ध होता. शाळेत तो शिक्षकांच्या व घरी नातेवाईकांच्या नकला करत असे. ओमप्रकाशपासून ते शाहरुखपर्यंतच्या नकलांमुळेच तो आपल्या मित्रांमध्ये प्रसिद्ध होता.

निलेशच्या आईला अभिनयाची फार आवड होती. त्यामुळे आईकडून नेहमीच त्याला अभिनयासाठी पाठिंबा मिळाला. पुढे त्यांचे मन वैद्यकीय क्षेत्रात रमत नव्हते हे बघून वडिलांनी निलेश यांना संधी दिली त्यांनी सांगितले कि, एक ते दीड वर्षांत अभिनयात काय करायचे ते कर, मात्र तिकडे जम बसला नाही, तर पुन्हा डॉक्टर म्हणून करिअर करावे. पण नंतर अभिनयात स्थिरस्थावर होत असताना वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले. पुण्यातील गडहिंग्लज कॉलेजमधून त्याने वैद्यकीय डिग्री प्राप्त केली आहे. सोबतच निलेशने आुयर्वेदात एमएस केले आहे. डॉक्टर झाल्यानंतर निलेशने वाशीच्या एमजीएमला कॉलेजमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यांच्या पत्नीचे नाव गौरी साबळे हे आहे.

निलेश सांगतात कि ते काही काल भोरला राहत असताना जिथे ते राहत त्याच्यामागे एक राजवाडा होता, तेथे शूटिंग व्हायचे. बारावीत असताना तेथे जाणून आत काय चालतं, हे बघण्याची इच्छा होती. प्रयत्न करुन आत शिरायचो आणि गुपचूप शूटिंग बघायचो. मात्र लोक तेथून त्याला बाहेर काढायचे. मला आत जाण्याची संधी मिळायला हवी अशी इच्छा होती. अखेर ती मिळाली. असा स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो त्याला जो सामोरे जातो तोच आयुष्यात यशवी होतो. गडहिंग्लजच्या त्याच्या कॉलेजमध्ये एकांकिका किंवा नाटकं काही नव्हतं. म्हणून एकपात्री ‘व-हाड’ करता करता त्याने ‘हसरी फसवणूक’ हा स्वतःचा प्रयोग घडवला होता आणि आपल्यातला अभिनय जिवंत ठेवला होता.

नौकरीत कायम होण्याच्या दिवशी त्यांना गीरीश मोहितेच्या ‘नान्याच्या गावाला जाऊ या…’ या मालिकेसाठी त्याला बोलावणं आलं. वडिलांकडून होकार मिळाल्यानंतर निलेशने ही मालिका केली. हि मालिका संपली आता पुढे काय ? हा मोठा प्रश्न पुढे पडला होता तेवढ्यातच झी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली आणि तो निवडला गेला. इतकेच नाही तर या कार्यक्रमाचा तो विजेतासुद्धा ठरला. ‘होम मिनिस्टर’, ‘फू बाई फू’ या शोजमध्ये तो झळकला. शिवाय मोठ्या पडद्यावरही त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. ‘नवरा माझा भवरा’, ‘बुध्दीबळ’, ‘एक मोहर अबोल’ या सिनेमांमध्ये निलेश झळकला.

निलेश साबळे यांचा फेवरेट स्टार आहे शाहरुख खान त्यांना नेहमी वाटायचं कि शाहरुख खान यांना आयुष्यात एकदा त्याला भेटावे, असे त्याचे स्वप्न होते. ‘चला हवा येऊ द्या’ शोमुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले. एवढच काय तर निलेशला डान्स शाहरुखकडून डान्स स्टेप्स शिकण्याची संधी निलेशला ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर मिळाली होती. पुढील आयुष्याकरिता डॉक्टर निलेश साबळे यांना खासरे कडून शुभेच्छा…
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *