हे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…

आज आपण बघणार आहोत जगातील सर्वात जास्त विषारी जीवांची माहिती. हे जीव आपल्या विषाचा प्रयोग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपला शिकार पकडण्यासाठी करतात. यातील काही जोव दिसायला खूप आकर्षक असतात. काही तर आपल्या आजूबाजूच्या माहोल मध्ये असे रंगलेले असतात की त्यांना ओळखणे सुद्धा अवघड होऊन बनते. जगामध्ये असे अनेक धोकादायक जीव जंतू आहेत जे कोणाचाही जीव घेण्यात खूप माहीर असतात. यातील काही जीव तर आपली पापणी लवुस्तर आपल्या विषाने मृत्यूच्या हवाली करू शकतात. तर काही जीवांमुळे अगोदर आजारी पडून नंतर मृत्यू होऊ शकतो. भारतामध्ये सुद्धा असे बरेच जीव जंतू आहेत जे की खूप धोकादायक आहेत. खासरेवर आज जाणून घेऊया अशाच काही जगातील अत्यंत विषारी जीवांबद्दल.

1. कोमोडो ड्रॅगन-

कोमोडो ड्रॅगनची जीभ सापाच्या जिभेसारखी फाटलेली असते. त्याचे नख आणि दात खूप तीक्ष्ण आणि जबडा खूपच मजबूत असतो. आपल्या लांब शेपटीच्या माराने सुद्धा ते घायाळ करू शकतात. शल्कानी झाकलेल्या असतात. कोमोडो ड्रॅगन चे वैज्ञानिक नाव वारानस कोमोडीएनिस असे आहे. याला कोमोडो मॉनिटर सुद्धा बोलले जाते. हे एक विशाल पालीच्याप्रजातीचे आहेत जे की इंडोनेशियामधील कोमोडो, रिंका, फ्लोरेस, गिली मोटांग मध्ये भेटतात.

2. कोन स्नेल-

खरंतर गोगलगाय या विषारी नसतात, पण ही गोष्ट कोण स्नेलला लागू होत नाही. याचे विष दुसऱ्या प्राण्यांना अंध बनवते व नंतर डोळे निघायला लागतात. हा जीव इतका विषारी आहे की याच्या विषाच्या एका थेंबाने 20 प्रौढ पुरुषांचा मृत्यू होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे याच्या विषावर अजून उपाय नाहीये. या विषाचा असर कमी करेल असं कोणतंही औषध उपलब्ध नाहीये आणि अजून दुसरा काही पर्यायही नाहीये. विशेषज्ञ अजून या विषाचा तोड शोधण्यात अपयशी ठरले आहेत.

3. ब्लू लाईन ऑक्टोपस-

या ऑक्टोपसचा आकार टेबल टेनिसच्या बॉल सारखा छोटा असतो. दिसायला हा खूपच सुंदर असतो. याला आपण सहजपणे मुठीमध्ये पकडू शकतो पण हे आपल्या जीवासाठी खूप धोकादायक असतात. याचे विष अगोदर आपल्या डोळ्यांना व नंतर श्वसन प्रक्रिया बंद पाडते.

4. बॉक्स जेलिफिश-

पाण्यात असणारी ही बॉक्स जेलिफिशला जगातील सर्वात विषारी जिवांपैकी एक मानले जाते. आशिया आणि ऑस्ट्रेलिया मध्ये भेटणारी बॉक्स जेलिफिश या पारदर्शी असतात. यांना पाण्यामध्ये सहजासहजी बघणे कठीण असते. यांच्या विषाने आपले हृदय काम करने बंद करते तर धडकने सुद्धा बंद होते. हे विष तात्काळ हृदयावर हल्ला करते.

5. बनाना स्पायडर-

या मकडीला बनाना स्पायडर म्हणतात. या मकडीला लोकं साधी मकडी समजण्याची चूक करू शकतात. बनाना स्पायडर मध्ये सेरोटॉनिन नावाचे विष असते. हर थेट मेंदुवर हल्ला करते. हे विष शरीरात पोहचल्यानंतर मेंदू काम करणे बंद करतो. ज्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.

6. डार्ट फ्राग-

मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा बेडूक आपल्या रंगामुळे शिकाराला आकर्षित करतो. दिसायला हा जितका सुंदर तितकाच घातक आहे. शिकाऱ्यांपासून बचावासाठी याच्या त्वचेमध्ये घातक विष असते. याचे विष मेंदूतील सूचनांचे आदान-प्रदान बंद पाडते. याच्या संपर्कात येणाऱ्या जीवांची वाचण्याची शक्यता खूप कमी असते.

7. स्टेलकर स्कॉर्पिअन-

मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत हा चमक असणारा विंचू आढळतो. दिसायला हा साधारण असला तरी याचे विष मृत्युचे कारण बनू शकतो. याच्या डंखामुळे खूप जोरात वेदना होणास सुरुवात होते. काही मिनिटांमध्ये दम घोटून गुदमरून तात्काळ मृत्यू होतो.

8. इनलँड ताईपैन-

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा हा साप खूप विषारी होता. याच्या विषामध्ये न्यूरॉटॉक्सिन असतात, जे 45 मिनिटात माणसाला मृत्यूच्या हवाली करतात. या विषाचा उपचार सहजासहजी उपलब्ध होतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *