भारतात मागील १० वर्षात किती आरोपींना फाशी देण्यात आली ? वाचा आरोपी व त्यांचे गुन्हे

आज कोपर्डीच्या तिन्ही आरोपींना फाशी देण्यात आली. त्यावरून भारतीय न्यायव्यवस्थेत वेळ लागतो पण योग्य न्याय मिळतो हा समज अनेकांच्या मनात पक्का झाला. परंतु तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत किती लोकांना भारतात फाशीची शिक्षा देण्यात आली आणि किती लोकांना फासावर लटकवीण्यात आले आहे ? चला आज आपण हि माहिती खासरेवर बघूया..

नेशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोनुसार २००४ ते २०१५ या दहावर्षाच्या काळात एकूण १३०३ लोकांना फाशीची शिक्षा सुनविण्यात आली आहे. परंतु त्यापैकी केवळ ४ लोकांना मागील १० वर्षात फाशी देण्यात आली आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर किती लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली याचा आकडा उपलब्ध नाही परंतु या ७० वर्षात केवळ ५७ लोकांना फासावर चढविण्यात आले आहे. स्वतंत्र भारतात पहिली फाशी नथुराम गोडसेला देण्यात आली आहे. National Crime Record Burroने मागील १० वर्षात नोंद करण्यात सुरवात केली आहे. यामध्ये केवळ ह्या ५७ केस उपलब्ध आहे ज्यामध्ये आरोपींना फासावर लटकविण्यात आलेले आहे. २०१४ साली संपूर्ण जगात एकूण ६२२ शिक्षाची अमलबजावणी करण्यात आली आहे त्यावर्षी भारतात एकही फाशीची शिक्षा देण्यात आली नाही.

भारतात दरवर्षी किमान १३० आरोपींना फाशीची शिक्षा सुनवीण्यात येते परंतु अमलबजावनी शून्य टक्क्यात आहे. या मागचे मुख्य कारण आहे माफी करिता चालणारी लांब प्रक्रिया त्यामुळे फाशीची शिक्षा देण्यात उशीर होतो. राज्यानुसार फाशीची शिक्षा सुनवीण्यात आलेल्या प्रकरण पुढील प्रमाणे आहे. उत्तर प्रदेश ३१८ आरोपी, महाराष्ट्र १०८ आरोपी, कर्नाटक १०७ आरोपी, बिहार १०५ आरोपी आणि मध्यप्रदेश १०४ आरोपी हे सर्व प्रकरणे मागील दहा वर्षातील आहे. धक्कादायक हि माहिती आहे कि मागील १० वर्षात “फक्त चार” आरोपींना खरोखर फासावर लटकवीण्यात आली अमलबजावणी करण्यात आली आहे. हे चार आरोपी कोण आणि त्यांनी काय गुन्हा केला याची माहिती आता बघूया…

धनंजय चैटर्जी १४ ऑगस्ट २००४ कलकत्ता

धनंजय चैटर्जीवर बलात्कार व खुनाचा गुन्हा होता. त्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हेतल पारेख हिचा बलत्कार करून खून केला होता. कलकत्ता येथून २०० किमी दूर धनंजयचे गाव तो कलकत्त्यास सुरक्षा रक्षकाची नौकरी करत होता. हि rarest rare केस होती कारण सुरक्षा रक्षक हे आपली रक्षा करण्यास असतात जीव घेण्यास नाही. २५ जून २००४ साली त्याला फाशीची शिक्षा सूनवीण्यात आली. त्याचा दयेचा अर्ज ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी नाकारला त्यानंतर त्याच्या वाढदिवसाला सेन्ट्रल जेल अलीपूर कलकत्ता येथे फाशी देण्यात आली.

मोहमद अजमल अमीर कसाब २१ नोव्हेंबर २०१२ येरावाडा पुणे

अजमल कसब याचा गुन्हा संपूर्ण भारतास माहिती आहे. या आतंकवाद्याने २६/११ ला संपूर्ण मुंबईत खुनाचा नंगानाच चालविला होता. ११,००० पानाची चार्जशीत कसाब वर दाखल करण्यात आली होती. त्याने फाशीपासून वाचण्याकरिता त्याचे स्टेटमेंट प्रत्येक वेळेस बदलले. २ नोव्हेंबर २०१२ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसब याचा दयेचा अर्ज खारीज केला त्यानंतर कसबला २१ नोव्हेंबर २०१२ला येरवाडा पुणे येथे फाशी देण्यात आली.

अफजल गुरु ९ फेब्रुवरी २०१३ तिहार दिल्ली

१३ डिसेम्बर २००१ साली झालेला संसदेवरील हल्ल्याचा मास्टर माइंड अफजल गुरु होता. ५ आतंकवाद्यांनी दिल्ली संसदभवनावर हल्ला केला होता. हा सर्व कट अफजल गुरु याने रचला होता. १५ डिसेम्बर २००१ला अफजल गुरूला दिल्ली पोलिसाने अटक केली आणि १८ डिसेम्बर २००२ला त्याला फाशीची शिक्षा सुनवीण्यात आली. त्याची फाशीची शिक्षा माफ करण्याकरिता अनेक याचिका दाखल करण्यात आल्या त्यामुळे त्याची फाशी लांबणीवर जात होती. ६ फेब्रुवरी २०१३ला अफजल गुरुचा दयेचा अर्ज प्रणव मुखर्जी यांनी खारीज केला आणि त्याला ९ फेब्रुवरी २०१३ रोजी दिल्ली येथील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली.

याकुब मेमन ३० जुलै २०१५ नागपूर

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई येथील १३ बॉम्बब्लास्ट करिता पैसा पुरविणारा आणि मुख्य सूत्रधारापैकी एक याकुब मेमन हा होता. याकुब मेमन हा सी.ए. होता. त्याचा भाऊ टायगर मेमन व दाउद हे या बॉम्ब ब्लास्टचे मुख्य आरोपी आहेत. एकूण २५७ लोकांचा या ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला होता. याकुब मेमन याच्या फाशीवर स्थगिती येण्याकरिता सकाळी ५ वाजता सुनावणी करण्यात आली परंतु न्यायालयाने हि याचिका खारीज केली. त्याला सकाळी ७ वाजता नागपूर येथे फाशी देण्यात आली.

हि माहिती धक्कादायक आहे. आता कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा देण्यात किती काळ जातो हा येणारा काळच सांगेल… माहिती आवडल्यास शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
या सहा मोठ्या न्यायालयीन लढाया, ज्यांनी उज्वल निकम पोहचले प्रसिध्दीच्या शिखरावर..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *