कमलेश सध्या काय करतो ? नक्की बघा हा विडीओ कमलेशचे आयुष्य कसे बदलले…

कमलेश कोण आहे याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. सोशल मिडीयावर मागील काही दिवसाअगोदर कमलेशचा विडीओ वायरल झाला होता. त्यावर अनेक मिम्स वर विडीओ वायरल करण्यात आले. त्यानंतर कमलेश हा प्रकाशझोतात आला. परंतु सध्या कमलेश करतो काय करतो हे खासरेवर आज आपण बघूया…

कमलेशचा विडीओ हा मुळात दिल्ली येथील येथील एका माहितीपटातील होती. नशेच्या आहारी गेलेल्या दिल्ली येथील लोकाची वास्तविकता दाखविण्याकरिता “नशेबाझ” हा माहितीपट बनविण्यात आला होता त्यामध्ये कमलेश दिसला होता. हा विडीओ काही वर्षा अगोदर शूट करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मिडीयावर फार कमी लोक असे असतील ज्यांना कमलेश माहिती नाही. त्याचा जुना विडीओ आपण खाली बघू शकता…

एका सर्वेनुसार दिल्ली मध्ये तब्बल ७०,००० लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यापैकी ३५टक्के हे १८ वर्षाखालील लहान मुले आहेत. कमलेशचेही आयुष्य असेच होते. लहानमुले हे सोलूशन आणि व्हाईटनरची नशा करतात कारण हे आरामात सगळीकडे मिळतात आणि स्वस्त आहे. असाच कमलेश करीत होता. परंतु या विडीओनंतर कमलेशच्या जीवनात अमुलाग्र बदल झालेला आहे. सध्या त्याने नशापाणी सोडून दिलेले आहे आणि तो शाळेत जात आहे. सहाव्या वर्गात तो सध्या शिकत आहे. त्याला सेवाभावी संस्थेमार्फत त्याचा दाखला शाळेत टाकण्यात आला आहे. खालील विडीओ मध्ये आपण कमलेश ला बघू शकता…

कमलेशच्या पुढील आयुष्याकरिता खासरेकडून शुभेच्छा… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा दारू पिऊन तात्काळ झोपल्याने होतील हे 9 साईड इफेक्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *