२०० नक्षलवाद्यासोबत एकटा लढला ! इन्स्पेक्टर प्रसाद बाबू याची चित्तथरारक कथा..

प्रसाद बाबू हे सच्चे हिरो आहेत ज्यांना कोणीही विसरू शकत नाही. देशातील संरक्षणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने त्यांचे कार्य लिहिल्या गेले आहे. मागील प्रजासत्ताक दिनी त्यांच्या कार्यासाठी अशोकचक्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. माओवाद्याना कर्दनकाळ म्हणून प्रसाद बाबू आले होते. आज खासरेवर बघूया त्याचे अप्रतिम साहस आणि कार्य

इन्स्पेक्टर प्रसाद बाबू हे मुळचे आंध्र प्रदेश मधील आहे. माओवादि टोळीचा जवळपास सफाया एकट्या प्रसाद बाबूनि केला होता. हि गोष्ट आहे १६ एप्रिल २०१३ची सरकारने नक्षलवाद विरोधी मोहीम सुरु केली होती. आंध्र छत्तीसगड बोर्डरवरची ती रात्र इन्स्पेक्टर प्रसाद बाबू आणि त्यांचे सहकारी आपली ड्युटी बजावत होते. The Greyhounds हे प्रसादबाबू यांच्या चमूचे नाव होते. अचानक त्यांना बातमी आली कि माओवाद्यांनी स्फोट केला आहे. The Greyhoundsची संपूर्ण टीम घटनास्थळाकडे रवाना झाली. तिथे उडालेल्या चकमकीत ९ माओवादी प्रसाद यांच्या टीमने यमसदनी धाडले.

दुसर्या दिवशी त्यांना घेण्याकरिता हेलीकॉप्टर बोलविण्यात आले. जवळपास १४ कमांडो हेलीकॉप्टरवर चढले होते. प्रसाद बाबू यांची टीम एकूण १९ कमांडोची होती. तेवढ्यात ६०-७० माओवाद्यांनी हेलीकॉप्टर वर हल्ला सुरु केला. प्रसाद बाबू आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता हेलीकॉप्टरवर न जाण्याचा निर्णय घेतला आणि नक्षलवाद्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. त्यानंतर जवळपास २०० माओवादि सदर ठिकाणी आले आणि त्यांच्यावर हल्ला सुरु केला. प्रसाद बाबू यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या ४ जवानांना सुरक्षित स्थळी जाण्याचा आदेश दिला. आणि प्रसाद बाबू एकटे त्या लोका सोबत लढत राहिले. प्रसाद बाबू एकटे लढले २०० नक्षलवाद्यासोबत आणि आपले सहकारी सुखरूप स्थळावर पोहचविले. परंतु शेवटी त्याच्या जवळील दारूगोळा समाप्त झाला आणि प्रसाद बाबुना नक्षलवाद्यांनी पकडून मारून टाकले.

प्रसाद बाबुनी दाखविलेले साहस अद्वितीय आहे. त्या करिता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मागील वर्षी त्यांच्या मृत्यूप्रश्चात प्रसाद बाबू यांचे वडीलांना अशोक चक्र देण्यात आले. त्यांच्या या साहसी कार्याकरिता उपस्थित सर्व लोकांनी उभे राहून प्रसाद बाबुना मानवंदना दिली.
अशा या भारतमातेच्या शूर पुत्रास खासरे तर्फे विनम्र अभिवादन… लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

वाचा हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *