कौतुकास्पद: 12 वर्षाची ही मुलगी गाते तब्बल 80 भाषांमध्ये गाणे…

तुम्ही या अगोदर 2-3 भाषांमध्ये गाणे गाणाऱ्या गायकांविषयी ऐकले असेल किंवा गाताना बघितले सुद्धा असेल. परंतु तुम्ही विचारही केला नसेल की कोणी एखादी व्यक्ती 1-2 नव्हे तर तब्बल 80 भाषांमध्ये गाणे गाऊ शकते, ते पण पूर्ण सुरामध्ये आणि लयीवर. दुबईच्या इंडिअन हायस्कूल मध्ये शिकणारी सुचेता सतीश तब्बल 80 भाषांमध्ये गाणे गाऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुचेताला या सर्व भाषांमध्ये सलग गाणे गाताना आपण बघू शकतो. यावर्षी 29 डिसेंबर होणाऱ्या एका कॉन्सर्ट मध्ये 85 भाषांमध्ये गाणे गाऊन सुचेता गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

सुचेताने मिडियासोबत बोलताना सांगितले की ती 80 भाषांमध्ये गाणे गाऊ शकते आणि तिने ही कला फक्त एका वर्षात अवगत केली आहे. सूत्रांच्या मते रेकॉर्ड तोडण्याच्या अगोदर सुचेता अजून 5 भाषांमध्ये 5 वेगवेगळे गाणे शिकणार आहे. सुचेता ही मूळची केरळ येथील आहे. आणि ती पहिल्यापासून काही भारतीय भाषा हिंदी, मल्याळम आणि तामिळ मध्ये गाणे गाऊ इच्छिते. ती याअगोदर शाळेत झालेल्या स्पर्धेत इंग्रजी गाणे गायली आहे. परंतु तिने मागच्या वर्षीपासून परदेशी भाषेतील गाणे गण्यास सुरुवात केली आहे.

सुचेताने गाण्याविषयी माहिती देताना सांगितले की तिने गायलेले विदेशी भाषेतील पाहिले गाणं हर जपानी होते. तिचे म्हणणे आहे की फ्रान्सिसी, हंगेरीअन आणि जर्मन भाषेत गीत गाणं सर्वात कठीण होतं. सध्या एका कॉन्सर्ट मध्ये सर्वात जास्त भाषेत गीत गाण्याचा विक्रम केसीराजु श्रीनिवास यांच्या नावावर आहे. त्यांनी सुद्धा तब्बल 76 भाषांमध्ये गीत गायले होते. सुचेता आता सध्या फक्त सातवी मध्ये शिक्षण घेत आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत दुबईमध्ये राहते.

युट्युबवर अनेक असे व्हिडीओ आणि इंटरव्ह्यू उपलब्ध आहेत ज्यामध्ये सुचेता या भाषांमध्ये गीत गाताना दिसत आहे. येणाऱ्या 29 डिसेंबरला जर सुचेता 85 भाषांमध्ये गीत गाण्याची किमया करू शकली तर तिचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये समाविष्ट होण्याची पूर्ण शक्यता आहे. बघा सुचेता ला 5 मिनिटांमध्ये 25 भाषांमध्ये गीत गाताना. हा इंटरव्ह्यू तिने दुबईच्या एका स्थानिक भारतीय भाषेच्या एफएम रेडिओला दिला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *