चिमुकल्या जीवाला मसणवट्यात घेऊन झोपतो बाप,कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल!

हा वडील आपल्या आपल्या मुलीला दररोज ‘कबर’मध्ये घेऊन झोपतो, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का. हेडलाईन वाचून गोंधळलात ना… पण हे सत्य आहे. चीनचे झांग लियोंग आणि त्यांची पत्नी डेंग मिन यांचं जीवन आता एका अशा वळणावर आहे. जिथे हतबल होण्याव्यतिरिक्त त्यांच्या हाती काहीच नव्हतं. पण निराश न होता त्यांना यावर एक तोडगा काढला आहे. परिस्थिती अशी आहे की या दोघांना आपल्या मुलीच्या ‘मृत्यू’ची वाट पाहावी लागत आहे. बघा खासरेवर काय आहे प्रकरण..

खरं म्हणजे हे चीनमधील एक सर्वात गरिब शेतकरी कुटुंब आहे. यांची दोन वर्षाची मुलगी आहे झांग जिनली. जी एका गंभीर अशा थेलेसीमियाने पीडित आहे. या आजारावर उपचार म्हणून या कुटुंबाने आतापर्यंत ११,००० पाऊंड म्हणजे जवळपास १० लाख रुपये खर्च केले आहे. मात्र यातून काहीच निष्पन झाले नाही. त्यामुळे आता त्यांनी एक अजबच प्रकार केला आहे. आता या बापाने आपल्या मुलीला घेऊन तिच्या मृत्यूची तयारी करत आहे. दुःखद बाब म्हणजे या बापाने आपल्याच मुलीसाठी स्वतःच्या हाताने कबर खोदली आहे. ज्या कबरमध्ये हा बिचारा बाप आपल्या मुलीला घेऊन दररोज खेळत असतो तर कधी आराम करत असतो. या मागचं कारण असं ही ती या जागेला ओळखेल आणि तिचा शेवटचा प्रवास अधिक सुखकर होवो.

जिनली एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. मोठी झाल्यावर आपल्या मुलीला मृत्यूची भीती वाटू शकते. तसे होऊ नये यासाठी मी तिला आतापासूनच कबरीत घेऊन झोपतो असे झांग लियोंग यांनी इंडिपेंडंटला माहिती देताना सांगितले. आपल्या मुलीवर बापाचे असणारे प्रेमच यातून दिसून येते. ज्याच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण दुखः आणि भीतीमध्ये पाहू शकत नाही. विशेषतः एका बापासाठी हा अतिशय अवघड क्षण असतो. त्यामुळे मी आतापासूनच काळजी घेत असल्याचे लियोंग म्हणाला.

आपल्या घराच्या अंगणातच लियोंग याने कबर खणली आहे. दिवसभरात वेळ मिळाला तर तो आपल्या या चिमुकलीला घेऊन याठिकाणीच झोपतो. आपल्या पत्नीलाही तो अनेकदा म्हणतो, कधी जर तिला याठिकाणी एकटीला रहावे लागले तर तिला भीती वाटायला नको. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे जोडपे आणखी एका बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहेत. या बाळाच्या नाळेतील स्टेमसेल्सपासून जिनलीवर उपचार करता येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वाचा नियमित शिळे अन्न खाताय, थांबा ! होऊ शकतात हे गंभीर आजार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *