टोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग…

आजकाल प्रत्येकाला वाटत की सुंदर दिसावं, आणि चार चौघांमध्ये आपली प्रतिमा उठून दिसावी. पण प्रतिमा चांगली दिसावी यासाठी आपला स्वभाव महत्वाचा असतो. परंतु आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसणं पण महत्वाचं झालं आहे. तुमचा रंग जर सावळा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास सांगणार आहोत असे काही उपाय ज्याने तुम्ही सहजपणे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळू शकता.

टोमॅटो हे खूप सहजपणे प्रत्येक घरात उपलब्ध असतात. टोमॅटो वापरून तुम्ही सहजपणे घरगुती पद्धतीने चेहऱ्याचा रंग उजळू शकता. आपल्या सर्वांच्या घरात टोमॅटो चा भाजी बनवण्यासाठी उपयोग होतच असतो. आतापर्यंत आपण टोमॅटोचा उपयोग फक्त खाण्यासाठी करत आलो आहोत. परंतु हे खूप कमी जणांना माहिती असेल की टोमॅटो वापरून आपण आपल्या चेहऱ्यावर एकदम तेज आणूु शकतो. लाल असेलेले टोमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले असतात. लाल टोमॅटोमुळे आपण अगदी सहजपणे चेहरा साफ करू शकतो.

चला तर आज खासरेवर जाणून घेऊया टोमॅटो वापरून घरी बसल्या बसल्या करावयाच्या आपल्या चेहऱ्यास उजळवून टाकण्याचे काही घरगूती उपाय-

सर्वप्रथम यासाठी तुम्हाला हवंय एक टोमॅटो, साखर, हळद, आणि लिंबू. एक ताजं टोमॅटो घ्या त्याला चाकूच्या साहाय्याने कापा. त्यानंतर अर्ध कापलेल्या टोमॅटोच्या पिवळ्या भागाला हळदीमध्ये टाका किंवा हळद त्यावर टाका. टोमॅटो ला हळद चांगल्या प्रकारे लागेल याकडे लक्ष द्या. आता या नन्तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते हळद लावलेले टोमॅटो घेऊन हळू हळू आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे. जसे आपण मसाज करतो त्याप्रमाणे टोमॅटोने चेहऱ्यावर मसाज करायची आहे. जवळपास १०-१५ मिनिट तुम्हाला अशाप्रकारे मसाज करायची आहे. चेहऱ्यावर मसाज करताना फक्त या गोष्टीचं ध्यान असुद्या की टोमॅटो थोडं दाबून घासा. ज्यामुळे हळद आणि टोमॅटो मिक्स होऊन ते त्वचेवर सहजपणे जाईल. आपण सर्व जाणतो की हळदी मध्ये सुद्धा अँटीबॅक्टोरीअल गुण असतात, जे मी आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक असतात. आणि आपल्या चेहरा उजळायचं काम करतात.

यानंतर तुम्हाला ३-४ चमचे साखरेमध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि दोन्हीचे चांगले मिश्रण तयार करायचे आहे. . आता तुम्ही हळद न लावलेले राहिलेले टोमॅटो घ्यायचे आहे. हे मिश्रण त्या टोमॅटो वर लावून साखर लावलेल्या अर्ध्या टोमॅटो ने मसाज करायची आहे. तुम्हाला हे ध्यान द्यायचे आहे की, टोमॅटोला पहिल्यासारखे थोडं थोडं दाबून मसाज करायची आहे. यामुळे याचा रस त्वचेला व्यवस्थित लागेल. ही मसाज तुम्हाला ५ मिनिटं करायची आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज निर्माण होईल. ही पद्धत तुम्ही काही दिवसासाठी अवलंबली तर तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा एकदम तेजस्वी बनला आहे. चांगल्या प्रकारे मदत मिळावी म्हणून हप्त्यातून २-३ वेळेस याचा उपयोग करावा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल…
सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *