कथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची…

आयुष्यात मनुष्यावर संकटे येत असतात परंतु या संकटाना जे सामोरे जातात त्यांना खासरे नेहमी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. आज खासरेवर कोल्हापुरच्या शांताबाई यादव यांचा प्रवास बघुया पुरूषाची मक्तेदारी असलेल्या क्षेत्राला त्यांनी ४० वर्षाअगोदर मोठा धक्का दिला व आजही हे काम सुरूच आहे. चला तर खासरे वर बघुया शांताबाई यादव यांचा प्रेरणादायी व संघर्षमय प्रवास…

शांताबाईचे लग्न वयाच्या १२व्या वर्षी झाले. घरचे शेतमजुरी करायचे नवऱ्याकडे कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात ३ एकर जमीन होती. आणि शेतीसोबत त्यांचा न्हाव्याचा जोडधंदा होता. आयुष्य सुरळीत चालु होते परंतु अचानक आयुष्यात संकटाचा वर्षाव सुरू झाला. तिचे २ मुले जन्मत:च वारली, नवऱ्याचा हर्ट अटॅकमुळे मृत्यु झाला, नवऱ्याच्या शेतीवर पैसे उधार घेतल्यामुळे सावकाराने ताबा बसविला, शांताबाईच्या पाठीमागे ४ मुली व पोटापाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. आयुष्यात एवढे संकटे आल्यावर साधारण व्यक्ती थांबनार. एखादी स्त्री तिच्या माहेरी गेली असती किंवा नातेवाईकांना मदत मागितली असती. परंतु शांताबाईने वेगळा मार्ग निवडला स्वतंत्र रहायचा.

काही दिवस शांताबईने शेतात रोजमजुरी केली. ८ तास जिवतोड काम करुन त्या काळात फक्त ५० पैसे रोज मिळायचा. १९८५ साली ५० पैस्यात ५ लोकांचा परिवार चालविणे अत्यंत कठीण होते. शेवटी त्यांनी ठरविले नवऱ्याचा न्हाव्याचा व्यवसाय परत सुरू करायचा. हातात वस्त्रा,कैची घेणारी विधवा स्त्री ग्रामीण भागात ही गोष्ट अमान्य होती. शांताबाईने हे तमाम विरोध झुगारून हे काम सुरू करायचा ठाम निर्धार केला. तिला तिच्या ४ मुलींना भुकिने तडफडून मरु द्यायचे नव्हते. सुरवातीच्या काळात ओळखिच्या व्यक्तिकडे जाऊन त्यांनी कामास सुरवात केली. गावातील लोक तिला चिडवत नावे ठेवत परंतु ति ह्या सर्व लोकाकडे लक्ष देत नव्हती. दिवसभर शेतीत काम करुन सकाळच्या वेळेत ती नाव्ह्याचे काम करत असे. गावातील नाव्ह्यापेक्षा अर्ध्या किंमतीत शांताबाई काम करत असे.

जेव्हा गावातील चर्चा खुप वाढु लागल्या तेव्हा गावातील पाटलाने या गोष्टीला थांबविण्याकरीता गावातील चौकात शांताबाईकडुन कटिंग दाढी करुन घेतली. त्या वक्तिचे नाव हरीभाऊ कडुकार गावातील सन्माननीय व्यक्तिने गावातील चौकात तिच्या कडुन दाढी करुन घेऊन घोषणा केली की शांताबाई आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्याकरीता शांताबाई प्रामाणिकपणे काम करत आहे. यापुढे तिच्याविषयी टिंगळ टवाळी बदनामी खपविल्या जाणार नाही. हरीभाऊच्या सहकार्याने शांताबाईला होणारा मनस्ताप बंद झाला. त्यानंतर शांताबाईने पुर्णवेळ न्हावी म्हनुन काम सुरू केले. तिच्या घरी गिऱ्हाईक स्वत: येऊ लागले. घरातील वऱ्हांड्यात शांताबाईने दुखान थाटले. पैश्याएवजी ति धान्य घेत असे वर्षभर दाढी कटिंगचे १० किलो धान्य घरातील मुलाबाळांचा पोटाचा प्रश्न सुटला.

त्यांनी लवकरच आपले काम वाढविले आजुबाजुच्या खेड्यातील शेतकरी , म्हशी त्याच्याकडे येत असे. रोज ४ ते ५ किलोमिटरची पायपीट करत शांताबाई काम करत असे. म्हशीकरीता वेगळे वस्त्रे व माणसाकरीता वेगळे वस्त्रे आणि दरही कमी त्यामुळे शांताबाई आजुबाजुच्या गावात प्रसिध्द झाले. तिला सहकार्य म्हनुन गावातील शाळेने अधिकृत न्हावी म्हनुन शांताबाईची घोषणा केली. शाळेतील सर्व मुले त्यांच्याकडे कटींगला येतात. ४ मुलिचे पालनपोषण एकटीने समर्थपणे केले. शांतबाईने उचलल्या या पावलाकरीता आज अनेक लोकांनी त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. स्वत: शांताबाईनी चारही मुलिंच्या लग्नाची जवाबदारी पार पाडली. लोक म्हनतात विधवापन कठीण असते परंतु शांताबाईने समाजात एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. आजही त्यांचा व्यवसाय सुरू आहे एका दाढी/कटिंगकरीता शांताबाई २० रुपये घेतात. त्यांच्या जवायाने त्यांना मुलिकडे राहण्याची विनंती केली परंतु शांताबाईने ती नम्रपणे नाकारली. खालील विडीओत आपण त्यांचा जिवनप्रवास बघु शकता…

शांताबाईच्या ह्या संघर्षमयी वृत्तीस खासरेचा सलाम… लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…

रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉ. रखमाबाई यांना गुगलकडून मानवंदना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *