धक्कादायक: ७ वर्षाच्या मृत मुलीचे दवाखाण्याचे बिल १६ लाख होते तेव्हा…

आजकाल लोकांना योग्य उपचार मिळत नाही. किंवा त्याच्याकडे महागडे औषधावर खर्च करायला पैसा माही. सरकारी दवाखान्यात असणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधामुळे लोक खाजगी दवाखान्याकडे वळत आहे. परंतु खाजगी दवाखान्यात सुरू आहे लुट हो अक्षरक्ष: लुटीचा धंदा सर्रास सुरू आहे खाजगी दवाखान्यात असेच एक उदाहरण आपण आज खासरेवर बघुया…

आपल्या प्रियजनाचा जिव वाचावा याकरीता कोनीही पैश्याचा विचार करत नाही. दवाखान्यात कितीही खर्च आलातरी चालेल आपण मागेपुढे पाहत नाही. परंतु याच गोष्टिचा गैरफायदा दवाखाने घेत आहे हे आपल्या लक्षात येईल. नुकतिच अशी घटना गुडगाव येथील फोर्टिस हॅास्पिटल येथे घडली आहे. ७ वर्षाची अद्याला बरे वाटत नव्हते लक्षात आले की हा आजार डेंग्यु आहे म्हनुन दवाखान्यात भर्ति करण्यात आले. १५ दिवसाकरीता तिला या दवाखान्यात भर्ती करण्यात आले. ३१ ॲागस्ट ते १४ सप्टेंबर या काळात ति दवाखान्यात भर्ती होती. तिचा जिव वाचवायला डॅाक्टरांना यश नाही आले परंतु त्या नंतर झालेला प्रकार अत्यंत क्लेषदायक होता.

फोर्टिस हॅास्पिटलने या १५ दिवसाचे औषधोपचाराचे बिल तब्बल १६ लाख रुपये त्यांच्या हातात सोपवले. २० पानाचे लांब असलेले हे बिल बघुन तिच्या पालकांना धक्का बसला. याबात त्यांनी हरकत नोंदवुन चौकशीची मागणी केली आहे. अद्याच्या वडिलाच्या मित्राने हे बिल ट्विटरवर अपलोड केले असुन हे वायरल झालेले आहे. या बिलामध्ये रक्त तपासणी करीता २ लाख १७ हजीर रुपये, २७०० हैन्डग्लोजचे १७,१४२ रुपये , ब्लड बैंक ६१,३१५ रुपये डायग्नोसीस २९,२९० रुपये डॅाक्टर चार्ज ५३,९०० रुपये औषधी ३,९६,७३२ रुपये साहीत्य चार्ज ७१,००० रुपये उपचार २,१७,५९४ रुपये मेडिकल व सर्जरी प्रोसेस २,८५,७९७ रुपये औषधे दवाखान्यातील २,७३,००० रुपये ईतर १५,१५० रुमभाडे १,७४,००० रुपये सुट २०,००० एकुण बिल= १५,७९,३२२ रुपये त्यांना सोपविण्यीत आले

७ वर्षाच्या मुलीला रोज ६६० इंजेक्शन देणे शक्य आहे का? दवाखान्याने त्यांना मृत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला तिच्या पालकास ॲम्बुलन्सची व्यवस्था करुन तिला नविन दवाखान्यात नेण्याकरीता सांगण्यात आले. हे सर्व झाले मुलगी मृत असताना. रुग्णाच्या नावाखाली दवाखाना हा धंदा झाला का ?

माहिती पटल्यास शेअर करा व आमचे पेज लईक करायला विसरु नका…
फक्त एक चिमूट सेवन डायबिटीज, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगापासुन वाचवेल

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *