फक्त एक चिमूट सेवन डायबिटीज, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासुन वाचवेल…

आजच्या काळात मनुष्याची जीवनशैली खूप बदलत चालली आहे. आजकालच्या तणावपूर्ण जिवनात प्रत्येक व्यक्तीला काही न काही शारीरिक समस्या असते ज्यासाठी तो विदेशी गोळ्या-औषधी घेतो. पण महागड्या गोळ्या-औषधी घेऊन सुद्धा या आजारांवर फरक पडत नाही. पण मोठ्या आजारावर आपल्या घरातच उपाय आहे आणि तो आपल्याला माहिती नसतो. होय, आपल्या किचन मध्ये असे बरेच पदार्थ उपलब्ध आहेत जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. असाच एक पदार्थ आहे हिंग. हिंगाची चव आणि सुवास आपल्या सर्वांना परिचित आहे. कारण बरेच वेळा आपल्या भारतीय जेवणामध्ये त्याचा वापर केला जातो. परंतु खूप कमी लोकांना याच्या औषधीय गुणधर्माविषयी माहिती आहे. आज आपण खासरेवर फक्त हिंगाचे फायदेच नाही जाणून घेणार आहोत तर एक असाही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे डायबिटीज सारख्या मोठ्या रोगांना सहजपणे संपवले जाऊ शकते.

हिंगाचे औषधीय गुण-

जास्त लोकांना हिंग हे फक्त मसाला म्हणून माहिती आहे. हिंग हे खूप गुणकारी औषध आहे त्याचे वर्णन प्राचीन ऋषि मुनींनी सुद्धा केले आहे. महर्षी चरक यांनी सांगितले आहे की हिंग हे दमा या रोगासाठी अत्यंत रामबाण औषध आहे. गुणविषयी बोलायचं झालं तर हिंगामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीऑक्सिडेंट दोन्ही गुण आहेत. सोबतच हिंगामध्ये आयरण, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, कैरोटीन, फायबर इत्यादी तत्व सुद्धा मिळतात. तसेच याच्या फायद्याविषयी बोलायचं झालं तर हींग कफ किंवा वात च्या समस्येला मिटवते सोबतच लकवा सारख्या आजारांपासून सुद्धा सुटका मिळू शकते. हिंग हे डोळ्यांच्या समस्येसाठी पण खूप उपयोगी पडते. जेवण पचण्यास मदत मिळते व भूक वाढते. हिंग खाल्याने गर्मी वाढते व आवाज सुद्धा साफ होतो. हिंगाचे तेल कानात टाकले तर कानात आवाज हिट असेल तर तो थांबतो आणि बहिरेपणा पण दूर होऊ शकतो. हवेमुळे होणाऱ्या रोगापासून हिंग बचाव करते. हिंग हे हलके, गरम आणि पचायला चांगले असते व हिंगापासून श्वसनाचे आजार दूर होतात व खोकला पण बरा होतो. यामुळे हिंग हे खूप गुणकारी औषध आहे.

असाध्य रोगांवर उपचार- कॅन्सर साठी अचूक औषध आहे हिंग.

cancer

हिंगामुळे फक्त छोटे मोठे आजार बरे होतात असे नाही तर यामध्ये खूप असाध्य रोगांवर उपचार करण्याची सुद्धा क्षमता आहे. हिंग हे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असून कॅन्सरसाठी प्रतिबंधक आहे. कँसर पिडीत व्यक्तीसाठी हिंग औषध म्हणून काम करते.

मायग्रेन आणि डोकेदुखी पासून सुटका होईल-

मायग्रेन, डोकेदुखीवर हिंग खूप असरदार ठरते, यावर हिंग हे एक उत्तम औषधी म्हणून काम करते.

डायबिटीज साठी उपयुक्त-

हिंग खाल्ल्याने डायबिटीज च्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार व्हायला लागते आणि साखरेचं प्रमाण यामुळे कमी व्हायला लागते.

दम्यावर उपयोगी-

asthama

हिंग हे खोकल्यावर पण खूप उपयुक्त आहे. हिंगामुळे कोरडा खोकला, दमा आणि अन्य आजारांवर खूप फायदा होतो. हिंग हे मधात मिसळून खाल्यास खूप फायदा होतो.

असा करा प्रयोग-

सर्वात प्रथम 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये गव्हाच्या दाण्याच्या आकाराची चिमूट भरून ते पाण्यात मिसळावे व बसून त्याचे सेवन करावे. जर तुम्हाला ऍसिडिटी, डायबिटीज, रक्ताची कमी आणि जोड्यामध्ये त्रास असेल तर दररोज हिंगाच्या पाण्याचे सेवन करा. कारण यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे आपल्या पचनसंस्थेला ठीक करतात. एवढेच नाही तर हिंगाचे पाणी आपल्या हाडांना आणि दातांना सुद्धा मजबूत करते आणि हे दम्याच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सॅनेटरी पॅडना योग्य आरोग्यादायी आणि पर्यावरणपूरक पर्याय मेनस्ट्रअल कप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *