१९ पेक्षा अधिक एन्काऊंटर करणारे भानुप्रताप बर्गे यांचा चित्तथरारक प्रवास…

पोलीस म्हणलं की सामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरते. पण ही भीती खऱ्या अर्थाने एका व्यक्तीने संपवली आहे. या निधड्या छातीच्या व्यक्तीच्या नावावर १९ एन्काऊंटर आहेत, ४०० हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहेत. रिअल सिंघम म्हणून प्रसिध्द असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुणे एटीएस चे प्रमुख भानुप्रताप बर्गे. महाराष्ट्र एटीएस मध्ये भानुप्रताप बर्गे यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. आज आपण खासरेवर जाणून घेऊया या खास व्यक्तीमत्वाविषयी माहिती.

भानुप्रताप यांचा जन्म आणि शिक्षण-

भानुप्रताप बर्गे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. पुढे भानुप्रताप यांचे शालेय शिक्षण पुणे शहरात व जिल्ह्यातील विविध भागात झाले. आपले शालेय शिक्षण संपल्यानंतर भानुप्रताप यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आर्ट्सच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतला. १९८३ साली आर्ट मधून पास झाल्यानंतर त्यांनी MBA ला प्रवेश घेतला. ते महाविद्यालयात असताना MPSC ची तयारी सुद्धा करत होते. MBA ला प्रथम वर्षाला असतानाच त्यांची MPSC द्वारे PSI पदासाठी निवड झाली.

पोलीस दलातील सेवेस सुरवात-

PSI म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी १ वर्षे नाशिक शहरात ट्रेनिंग घेतले. ट्रेनिंगमध्येच भानुप्रताप यांनी आपली छाप पाडली होती. रिव्हॉल्व्हर फायर शूटिंगमध्ये त्यांना पहिले बक्षीस मिळाले होते. त्यानंतर १९८६ साली त्यांचे पहिले पोस्टिंग डोंगरी येथे झाले. सर्व भारतामध्ये प्रसिद्ध असलेले हे शहर ९६ % मुस्लिमबहुल होते. त्याकाळी डोंगरी या भागात कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन, करीम लाला, युसूफ पटेल आणि हाजी मस्तान यांचा डोंगरी या पोलिस स्टेशनच्या हद्दीत नेहमी वावर असायचा. त्यावेळी भानुप्रताप हे अविवाहित असल्याने ते पोलीस स्टेशनच्या वरच्या खोलीतच राहायचे. त्यावेळेस त्यांना २४ तास उपलब्ध असणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे. त्यांनी अनेक मोठ्यामोठ्या गुन्ह्यांमध्ये चोख जबाबदारी बजावली आहे. सध्या भानुप्रताप बर्गे यांच्याकडे एटीएस च्या पश्चिम महाराष्ट्राची प्रभारी म्हणून जबाबदारी आहे.

भानुप्रताप बर्गे यांचा जीवनप्रवास-

भानुप्रताप बर्गे यांना महाराष्ट्रातील एटीएस चे रिअल सिंघम म्हणून ओळखले जाते. अत्यंत कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ओळख असलेले भानुप्रताप बर्गे हे त्यांच्या पोलीस दलातील सेवेसाठी कौतुकास्पद कामगीरीसाठी सर्वांना परिचित आहेत. भानूप्रताप यांना ऑगस्ट २००९ साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भानुप्रताप बर्गे हे Survivals Club Membership हा दहशतवाद विरोधी कार्यामुळे मिळालेला आंतरराष्ट्रीय अवार्ड जिंकनारे पहिले भारतिय पोलीस अधिकारी आहेत. भानुप्रताप बर्गे यांनी धीरूभाई अंबानी आणि तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांची नात यांचे अपहरण करण्याचा कट रचलेल्या चार खलिस्तानी अतिरेक्यांना अटक केली होती. भानुप्रताप बर्गे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन आणि नसली वाडिया यांचे बॉडीगार्ड म्हणून सुद्धा काम केले आहे. भानुप्रताप बर्गे यांना आतापर्यंत ४०० हुन अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नोव्हेंबर १९९१ मध्ये लोखंडवाला येथे माया डोळस आणि त्याच्या साथीदारासोबत झालेल्या प्रसिद्ध चकमकीत पोलीस टीमचे सदस्य होते.

शूटआऊट ऍट लोखंडवाला-

१९९१ साली मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे भारतातील प्रसिद्ध शूटआऊट झाला होता. ही घटना मुंबईच्या गुन्हेगारी विश्वास एक नवीन अध्याय बनून गेली होती. या गोळीबारात माया डोळस आणि दिलीप बुवा या प्रसिद्ध गुंडासह ७ जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता. विशेष म्हणजे पोलिसांनी अशाप्रकारे केलेले हे पहिलेच एन्काऊंटर होते. या पोलिसांच्या टीमचे भानुप्रताप बर्गे हे सुद्धा सदस्य होते.

आयसिस कडून जीवे मारण्याची धमकी-

जगामध्ये दहशतवादाचा धोका हा प्रंचड वाढलेला आहे. तालिबान, अलकायदा, इंडिअन मुजाहिद्दीन, लष्करे तोयबा, हुजी अशा अनेक संघटना जगभरात दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहेत. यातच नवीन भर म्हणजे आयसिस या नवीन संघटनेने जगभरात हाहाकार माजवला आहे. भानुप्रताप यांनी आयसिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणीस रोखले होते. त्यानंतर त्यांना परिवारासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सामाजिक कार्य-

भानुप्रताप बर्गे यांना पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी बाळासाहेब ठाकरे व अमिताभ बच्चन यांच्याकडे वर्षभर बॉडीगार्ड म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर होता. वेश्याव्यवसायात जबरदस्तीने पाठवण्यात आलेल्या मुलींची सुटका करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका होती. ते अजूनसुद्धा या मुलींसाठी व तृतीयपंथी व्यक्तीसाठी कार्य करतात. त्यांनी आतापर्यंत १५० हुन अधिक मुलींची यामधून सुटका केली आहे. ते महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी स्वराक्षणासाठी नेहमी लेक्चर घेत असतात. याशिवाय अजूनही बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

खासरेकडून भानुप्रताप बर्गे साहेबांच्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *