पंतप्रधान मोदीजींच्या टॉप टेन ब्रेन मधील एकमेव मराठी अधिकारी..

पारदर्शी आणि स्वच्च कारभार यासाठी सर्वश्रुत असलेल्या श्रीकर परदेशी सर्वानाच माहिती आहे. याच कामाची पावती त्यांना मिळाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खास दहा सनदी अधिकाऱ्यात परदेशींचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयात एप्रिल 2015 पासून परदेशी संचालकपदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्राला ही अभिमान वाटणारी बाब म्हणजे या दहा रत्नात महाराष्ट्राचे सुपूत डॅाक्टर श्रिकर परदेशी यांचा समावेश आहे. आज खासरेवर डॅा. श्रिकर परदेशी यांच्या विषयी काही खासरे माहिती बघुया…

डॉ. श्रीकर परदेशी यांचा जन्म सांगली शहरात झाला. वडील सांगलीला नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण सांगली शहरातच गेले. अभ्यासात लहाणपनापसुन डॉ. परदेशी अतिशय हुशार त्यामुळे शिक्षणाकरीता ते पुणेत गेले व पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडी पूर्ण केले. त्यादरम्यान यूपीएसकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली रॅंक घेत गृह (महाराष्ट्र) केडर मिळवले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची छाप पडलेली आहे आजही परदेशी साहेबांच नाव त्यांनी काम केलेल्या प्रत्येक जिल्ह्यात घेतले जाते. मला आजही परदेशी साहेबांचा नांदेड येथिल निरोप समारंभ आठवतो दिवसभर पुष्पगुच्छांचा वर्षाव विद्यार्थ्यापासुन तर वयोवृध्द व्यक्ती सर्वाचे डोळे पाणावलेले होते व साहेब स्वत: प्रत्येकाच्या शुभेच्छा घेत होते.

आदर्श अधिकारी कसा असावा याचा प्रत्यय आला पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत आयुक्त असताना. पिंपरी महापालिकेत आयुक्त म्हणून कर्मचा-यांचा फौजफाटा, वाहन सुविधा यांसारख्या अनेक सुखसोई उपलब्ध असूनही वैयक्तिक कामासाठी त्याचा त्याग केला होता. खासगी आयुष्य साधेपणाने जगणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. परदेशी अनेकांसाठी ‘आयकॉन’ ठरले होते. सरकारी नियमाप्रमाण पिंपरीमध्ये आयुक्त म्हणून १८ महिने काम केलेल्या श्रीकर परदेसी यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेन ९० हजार रुपयांचा बोनस चेकद्वारे पाठवला… पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. केंद्रीय प्रशासकीय सेवेत असल्याचा संकेत पाळत त्यांनी हा बोनस नाकारलाय. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक होण्याबरोबरच प्रशासकीय कारभाराला शिस्त लागली होती.

राजकीय हस्तक्षेपाला भीक न घालता आपले कर्तव्य बजावण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्या काळातही परदेशींनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सारथी’ नावाची अतिशय उत्तम योजना चालू केली होती. तक्रारी दाखल करताना नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्याची सोय त्यात होती. लोकाभिमुख सेवा देणारा हा अधिकारी आहे. स्वयंशिस्त व नागरिकांना पालिकेतील कामांची माहिती मिळावी यासाठी सारथी ही संगणकप्रणाली विकसित केली. यामुळे अनेक भ्रष्ट बाबूंना निलंबित केले तर चुकीचे काम करणा-या ठेकेदारांना दंड ठोठावला. डॉ. श्रीकर परदेशी यांची पिंपरी पालिकेचे आयुक्तपदावरून बदली प्रकरणी अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले होते.

नांदेडमध्ये काम करत असताना त्यांच्या ध्यानात आले की अनेक संस्थाचालक विद्यार्थी खोटे प्रवेश दाखवुन सरकारी अनुदानावर हात मारतात. या संस्थाचालकाना वठणीवर आणन्याकरीता त्यांनी पटपडताळणी मोहीम सुरू केली. एकाच दिवशी जिल्ह्यातील संपुर्ण शाळेची तपासणी विद्यार्थ्याच्या बोटावर शाई लावुन विद्यार्थी गणना करण्यात आली. याकरीता संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली. आणि त्यातून एक भयावह सत्य उजेडात आले. पुढे ही योजना राज्यभर राबवण्यात आली आणि शिक्षण संस्थाचालकांचे धाबेच दणाणले. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि संस्थांच्या अनुदानात प्रचंड कपात झाली. हजारो अतिरिक्त शिक्षकांसह शेकडो बोगस शाळांची प्रकरणे त्यांनी पुढे आणली होती. परदेशी यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य सरकार 2011 पासून शिक्षकांचे समायोजन करीत आहे.

माझा मित्र यवतमाळला ग्रामसेवक आहे काही वर्षापुर्वी त्याच्या खोलीवर गेलो असता मि परदेशी साहेबाचा फोटो देवघरात बघितला. कारण विचारले तर थक्क करणारे होते ते ४ मित्र खोलीवर राहत होते चौघेही ग्रामसेवक व एकाच दिवशी नौकरीला लागलेले. ते सांगतात की , यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पुर्णत्वास नेले. एकाच दिवशी परीक्षा व मुलाखत घेऊन लगेच नियुक्तीपत्र देण्याची किमयाही त्यांनी केली म्हनुन आम्हाला नौकरी लागली. नोकरभरतीच्या पारदर्शी प्रक्रियेचा पायंडा त्यांनी पाडला होता. त्यांच्या कार्यकाळात अवघ्या महाराष्ट्रातील बेरोजगार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला येत होते. दरम्यान त्यांच्या बदलीचा राजकीय डावही रचला गेला. मात्र यवतमाळकरांनी आंदोलन करून तो हाणून पाडला होता.

श्रीकर परदेशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतून बदली केली नसती तर माझे सरकार कोसळले असते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. श्रीकर परदेशींची बदली झाली की त्या त्या भागातील, शहरातील लोक बदली करण्यासाठी आंदोलन करायचे. श्रीकर परदेशींचा मुलगा कणाद हा वडिलाप्रमाणेच हुशार आहे तो शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आला होता. जेथे जेथे परदेशींनी काम केले तेथील युवक त्यांच्या कार्याला सलाम ठोकतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना अवैध बांधकामे पाडल्यामुळे श्रीकर परदेशींना बुलडोजर व डिमॅालीश मॅन’ही उपाधी दिली गेली.तोच बुलडोजर मॅन आज मोदींच्या टॉप टेन ब्रेन्सपैकी एक आहे.आपल्या कार्यकुशलतेने आणि निर्णयक्षमतेने दिल्लीदरबारात स्थान मिळवणे महाराष्ट्रासाठी अभिमानाचीच बाब ठरावी. या महाराष्ट्राच्या सपुतास खासरे तर्फे मानाचा मुजरा…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका….
२५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *