विश्वसुंदरी मानुषी छिल्लर तुम्हाला ह्या ९ गोष्टी माहिती आहे का ?

‘आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. त्यांना कॅशमध्ये पगाराऐवजी खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं,’ मिस इंडिया मानुषी छिल्लर हिच्या या उत्तराने ​परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली आणि अंतिम फेरीतील पाच सौंदर्यलतींमधून विश्वसुंदरीच्या मुकुटाचा मान तिला मिळाला. शनिवारी चीनमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यात मानुषीने आपण ‘ब्युटी विथ ब्रेन्स’ असल्याचे सिद्ध केले. अजूनही बऱ्याच गोष्टी आहे ज्या आज आपण खासरेवर बघणार आहोत.

१) मानुषी हि सौंदर्यासोबत बुद्धीचा अप्रतिम संगम आहे. सध्या ती सोनपत भगत फुल सिंग सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घीत आहे. फक्त तिच नाहीतर तिचे आई वडील देखील तिच्या प्रमाणेच हुशार आहे तिचे वडील डॉक्टर मित्रा बासू छील्लर हे DRDO मध्ये वैज्ञानिक आहे आणि तिची आई डॉक्टर नीलम छील्लर हि Institute of Human Behaviour and Allied Sciences येथे Neuro-chemistry विभागाची विभागप्रमुख आहे.
२) मानुषी हि अष्टपैलू आहे ती अभ्यासात तर हुशार आहे सोबतच ती नृत्यात देखील पारंगत आहे. ती कुचीपुडी या नृत्यप्रकारात निपुण आहे आणि चांगल्या नावाजलेल्या गुरु कडून तिने हे नृत्याचे शिक्षण घेतले आहे.
३) मानुषी हि एक चांगली कवियत्री सुध्दा आहे तिला कविता लिहायला आवडते. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती नेहमी कविता लिहते त्यासोबत तिला चित्रकलेची सुध्दा आवड आहे रिकाम्या वेळेत ती आपल्या छंदाला वेळ देते.

मानुषीचे आई वडील

४) जपान येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात २०१४ साली तिने आपल्या कॉलेजचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या प्रमाणे सर्व गोष्टी निपुण राहणे सर्वांनी शिकायला हव.
५) विश्वसुंदरी व्हायचं हे तिने पहिलेच ठरविले होते. याकरिता फेमिना मिस इंडिया २०१७ साली तिने सहभाग नोंदविला या करिता तिने स्वतःच्या १ वर्षाच्या शिक्षणाचे बलिदान दिले आहे. ह्या सर्व गोष्टीमुळे तिला फेमिना मिस इंडिया २०१७ हा मान मिळाला होता.
६) मानुषी हि अतिशय साहसी आहे तिला स्कुबा डायविंग, बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग, snorkeling इत्यादी साहसी खेळ तिला आवडतात.

७) या सोबतच ती अतिशय दयाळू आहे समाजात जागृती निर्माण करण्याकरिता ती “प्रोजेक्ट शक्ती” या एनजीओ करिता काम करते. यामध्ये स्त्रियांची मासिक पाळी आणि समस्या इत्यादी विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम मानुषी करते.
८) मानुषीला अभिनायःची सुध्दा आवड आहे. तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये कोर्स पूर्ण केला आहे.
९) २० वर्षीय मानुषीची इंग्रजी अतिशय उत्तम आहे. १२व्या वर्गात ती पूर्ण भारतातून सीबीएससीमध्ये मेरीट आलेल्या विद्यार्थ्यापैकी एक होती.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
या प्रश्नाचे उत्तर देऊन मानुषी छिल्लर बनली ६वी भारतीय मिस वर्ल्ड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *