रहस्यमय जगन्नाथ पुरी मंदिरा बाबत आपणास हि माहिती आहे का ?

जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला.

दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही! असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा तात्काळ मृत्यू होईल कारण त्या हृदयात ब्रह्मदेव आहे आणि प्रचंड तेज आहे जे कोणीही सहन करू शकणार नाही.

ज्या दिवशी जगन्नाथाची मूर्ती बदलली जाणार असते त्यादिवशी सरकारकडून संपूर्ण पुरी शहरात वीज बंद करून अंधार केला जातो. ‘मूर्तीत श्रीकृष्णाच्या हृदयाचा लगदा आहे का?’ हि बाब एक रहस्यच आहे!

१) भगवान जगन्नाथाच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, असे का होते, हे शास्त्रज्ञ पण सांगू शकले नाहीत!

२) मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी असलेले सुदर्शन चक्र पुरीमध्ये कुठेही उभा राहून पाहता येते आणि कुठूनही पहिले तरी असेच वाटणार कि हे सुदर्शन चक्र आपल्या समोरच आहे!

३) सर्वत्र पहिले तर असे आढळून येते की, दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात पण पुरी याला अपवाद आहे, इथे नेमकं याच्या उलटे होते दिवसा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात!

४) भारतातल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखरांवर पक्षी बसलेले दिसून येतात परंतु जगन्नाथाच्या मंदिराच्या आजवरच्या इतिहासात एकही पक्षी मंदिर शिखर परिसरात फिरकला नाही!

५) मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होतो. मात्र संपूर्ण पुरीमध्ये अन्य कुठेही जावा, समुद्राचा आवाज येतच असतो!

६) अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण आपल्या पत्नीसमवेत विराजमान असतात पण या मंदिरात मात्र ते आपले भाऊ बळराम आणि बहीण सुभद्रे सहित विराजमान आहेत!

७) मंदिराच्या शिखराची उंची २१४ फूट आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही क्षणी त्याची सावलीच कुठे पडत नाही!
आज पर्यंत ह्या रहस्यांची उत्तरे कोणतेही शास्त्र वा शास्त्रज्ञ देऊ शकलेले नाहीत.

राहुल तानाजी चव्हाण मो-8956378073
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
श्री खंड महादेव ! अमरनाथ पेक्षाही कठीण असलेली यात्रा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *