या प्रश्नाचे उत्तर देऊन मानुषी छिल्लर बनली ६वी भारतीय मिस वर्ल्ड…

भारतची मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड २०१७ हा मान भारताच्या नावावर करुन घेतला आहे. हरीयाणा येथील राहणारी मानुषी कार्डियाक सर्जन आहे. मानुषी हा पुरस्कार जिंकणार ६वी भारतीय आहे. यासोबतच मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकण्यात भारताने वेनेजुएलाची बरोबरी केलीआहे. मानुषी ने मेक्सिकोच्या एंड्रीया मेजा व इंग्लंडची स्टीफन हील ला मागे टाकत हा ऐतिहासिक पुरस्कार जिंकला आहे.

मानुषीला हा पुरस्कार मिळवण्याकरीका विचारलेला प्रश्न पुढील प्रमाणे आहे. तिला विचारले होते की, कोणत्या व्यक्तीस सर्वात जास्त पगार मिळायला पाहीजे? यावर तिने उत्तर दिले की सर्वात जास्त प्रतिष्ठा व सर्वात जास्त पगार आईला मिळायला पाहीजे परंतु पगार हा पैश्याच्या स्वरूपात नसुन सन्मान व प्रेमाच्या स्वरुपात मिळायला हवा. हे उत्तर देऊन तिने परिक्षकाचे मन जिंकली व हा सन्मान भारताच्या नावावर केला.

मानुषीची सुरवातीचे शिक्षण बंगलोर आणी दिल्ली येथे झाला. मानुषीनो दिल्ली येथील सेंट थॉमस स्कुल व सोनीपत तेथील भगत फुल महिला सरकारी मेडीकल कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. मानुषी पिजीआय एमएस रोहतक येथुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मानुषी पेटिंग व कुचीपुडी नृत्यामध्येही निपुण आहे.

या अगोदर झालेल्या मिस वर्ल्ड

रीता फारीया: १९६६मध्ये पहिल्यावेळेस रीता फारीयाने हा मान मिळवला होता. ती पहिली भारतीय. सुंदरी होती जिने या स्पर्धेत भाग घेतला होता.
ऐश्वर्या राय: १९९४ साली ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली होती आणि त्यानंतर तिने हिंदी चित्रपट सृष्टीत आपली छाप निर्माण केली.
डायना हेडन: ऐश्वर्या राय नंतर १९९७ मध्ये डायना हेडेन हीने हा मान मिळवला होता.
युक्ता मुखी: युक्ता मुखी चौथी भारतीय महिला आहे जिने हा मान १९९९ साली मिळवला होता.
प्रियंका चोप्रा: सन २००० साली प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली होती. तेव्हापासून १७ वर्षानंतर आज हा पुरस्कार परत भारतात आला आहे.

खासरे तर्फे मानुषीला मानाचा मुजरा.. आपल्याला ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *