या निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची…

भारतात तरूण पिढीतील आयएएस अधिकारी त्यांच्या चांगल्या कामाने वेगळी छाप सोडत आहे. नुकताच केरळ येथील परिवहन मंत्र्यास ९२ करोड रुपयाच्या घोटाळयाकरिता खुर्ची खाली करावी लागली हा घोटाळा उघडकीस आणला आहे अल्लाप्पूझाच्या कलेक्टर टी. वी. अनुपमा यांनी या घोटाळ्याची चौकशी आणि रिपोर्ट अनुपमा यांनीच बनविली होती. चला तर आज खासरे वर बघूया काय होते पूर्ण प्रकरण आणि कोण आहे तो मंत्री..

अल्लाप्पूझा येथील कलेक्टर अनुपमा यांनी सरकारला घोटाळया संबंधित संपूर्ण अहवाल सोपवला आहे. ज्या मध्ये परिवहन मंत्री थॉमस चांडी यांच्यावर बेकायदेशीर रित्या जमीन हडपून त्यावर रिसोर्ट बनविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या रिपोर्ट विरोधात चांडीने दाखल केलेली याचिका केरळ हायकोर्टाने खारीज केली आहे. थॉमस चांडी हे केरळ एनसीपीचे आमदार आहेत. थॉमस चांडी विजयन कॅबिनेटमधून राजीनामा देणारे आता तिसरे मंत्री आहे. थॉमस चांडी मे २०१६ मध्ये LDF च्या सरकारमध्ये मंत्री झाले होते.

कोण आहे IAS टी.वी. अनुपमा ?
अनुपमा मुळची केरळची आहे. त्यांचा जन्म मल्लापूरम येथील मरान्चेरी या गावी झाला होता. अनुपमा यांनी बिट्स पिलानी येथून इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेली आहे. टी.वी. अनुपमा २०१० सालच्या बैचची IAS अधिकारी आहे संपूर्ण भारतात ४ नंबरची रँक त्यांनी मिळवली होती. अनुपमा यांचे वडील के.के. बालसुब्रम्हण्यम सर्कल पोलीस अधिकारी होते, २००२ साली त्यांचे निधन झाले. आणि अनुपमा यांचे पती क्लिंसटन कोच्चिमध्ये आयटी Entrepreneur आहे. अनुपमा जेव्हा फूड सेफ्टी कमिशनर होती तेव्हा त्यांनी अन्नात होणारी भेसळ याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली होती. १५ महिन्यात ७५० व्यापाऱ्यांवर ६ हजार पेक्षा अधिक नमुने घेऊन केस लावण्यात आल्या होत्या. या नंतर अनुपमा यांची नियुक्ती अल्लाप्पूझा येथील कलेक्टर म्हणून करण्यात आली.

IAS अनुपमा यांच्या अहवालानुसार, मंत्री चांडी यांनी जमीन बेकायदेशीर हडपली आहे आणि त्यावर रिसोर्ट बांधले आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर जमीन सुरक्षा नियम कार्यवाही करण्यात यावी. मंत्री महोदयांनी भात शेतीस लागून रिसोर्टकडे जाणारा रस्ता बनविला आहे जे बेकायदेशीर आहे. हे प्रकरण उघडकीस येताच मंत्री चांडी यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

या निडर IAS अधिकाऱ्यास खासरेचा सलाम.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा २५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *