चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली…

आज गुगलने व्ही शांताराम यांच्या 116 व्या जन्मदिनानिमित्त डुडल ठेवून श्रद्धांजली दिली आहे. शांताराम राजाराम वनकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम आजही त्यांच्या एकसे बढकर एकचित्रपटासाठी आठवले जातात. व्ही शांताराम हे मराठी हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून ओळखले जाते. व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला होता. त्यांनी 1927 साली आपला पहिला चित्रपट नेताजी पालकर दिग्दर्शित केला होता. व्ही शांताराम हे फक्त दिग्दर्शक म्हणून नाही तर एक कलाकार, एडिटर आणि चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिध्द होते. शांताराम आधी प्रभात फिल्म्स कंपनीत काम करायचे. मात्र नंतर त्यांनी राजकमल कालामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी चालू केली.

त्यांनी चित्रपट निर्मितीच्या बऱ्याच नवनवीन शैली निर्माण केल्या. त्यांना खासकरून सामाजिक आणि पारिवारिक विषयांवर अर्थपूर्ण चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. त्यांना त्यांच्या डॉ कोटणीस की अमर कहाणी(1946) अमर भोपाली(1951) झनक झनक पायल बाजे(1955), डॉ आंखे बाराह हाथ(1957), नवरंग(1959), पिंजरा(1972) या चित्रपटांसाठी ओळखले जाते. व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. त्या सूचित 1913 ते 1931 या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या 372 मुकपटांची नावे आहेत.

v shantaram

गुगलने ने डुडल मध्ये व्ही शांताराम यांच्या 1950 च्या दशकात आलेल्या चित्रपटांना दाखवले आहे. पहिला चित्रपट अमर भोपालीचा गडरिया बनवलेला आहे. दुसऱ्या मध्ये 1957 मध्ये बनलेला डॉ आंखे बाराह हाथ चित्रपटाचे दृश्य दाखवले आहे. हा चित्रपट रंगीत चलचित्र वापरणाऱ्या चीत्रपटांपैकी पैकी एक होता. यानंतर 1959 मध्ये बनलेल्या नवरंग चे दृश्य दाखवले आहे. या चित्रपटांसाठी व्ही शांताराम यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

व्ही शांताराम यांनी अभिनेता म्हणून जवळपास 25 चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘सवकारी पाश’, ‘परछाई’ ‘सिंहगड’ या चित्रपटांचा समावेश आहे. व्ही शांताराम यांनी जवळपास 92 चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि 55 चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. यामध्ये नेताजी पालकर चंद्रसेना आणि झनक झनक पायल बाजो या चित्रपटांचा समावेश आहे. शांताराम यांनी 1933 मध्ये पहिला रंगीत चित्रपट बनवला होता. तसेच हिंदी चित्रपटात मुविंग शॉट्स आणि ट्रॉली चा उपयोग त्यांनीच केला होता. सोबतच अनिमेशन चा उपयोग पण त्यांनीच सुरू केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्म विभूषण से ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1990 साली वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *