ट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील

भारतामध्ये तुम्ही जर दुचाकी किवा चारचाकी चालक असाल तर संपूर्ण आयुष्यात एकदा तरी वाहतूक पोलिसांनी तुमची गाडी अडवल्याचा अनुभव आला असेल. वाहतूक पोलिसांनी अडवले तरी जास्त काही चिंतेचे कारण नाहीये, पण एक सजग नागरिक म्हणून तुम्हाला वाहतुकीचे नियम आणि अधिकार माहिती असायला हवे. आज आपण खासरेवर तुमच्या माहितीसाठी जाणून घेऊया वाहतुकीचे काही महत्वाचे नियम-

Police

1. ट्राफिक पोलिसांनी तुमची गाडी अडवली व तुमच्याकडे दंडाची मागणी केली तर ट्राफिक पोलिसांकडे चलन बुक किंवा इ-चलन मशीन असणे बंधनकारक आहे. पोलिसांकडे या दोन्हीपैकी एक जरी नसेल तर ते तुमच्याकडून दंड वसूल नाही करू शकत.
2. जर तुमची गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला घ्या आणि पोलिसांनी मागीतलेले कागदपत्र त्यांना द्या. नेहमी लक्षात असुद्या की फक्त ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणे बंधनकारक आहे. नंतर तुमची मर्जी आहे की ते कागदपत्रे पोलिसांना सुपूर्द करायची का नाही. मोटर व्हेहिकल ऍक्ट च्या कलम 130 अन्वये गाडीचा चालक वाहतूक पोलिसाला लायसन्स तपासण्यासाठी तो पोलीस युनिफॉर्म मध्ये नसल्यास त्याला अडवू शकतो. आणि नियमाप्रमाणे पोलीसांना फक्त लायसन्स दाखवणे बंधनकारक असून ते सुपूर्द करण्याची आवश्यकता नाहीये.

3. तुम्ही वाहतुक पोलिसांना सहकार्य करायला हवं आणि त्यांच्याशी हुज्जत घालणे प्रामुख्याने टाळावे. जर कदाचित काही चूक झालीच तर पोलिसांना ती व्यवस्थित समजून सांगा, त्यामुळे पोलीस तुम्हाला सोडू ही शकतील.
4. तुम्ही गाडी जर लाल लाईट असताना सिग्नल वरून नेली, नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करणे, हेल्मेट नसताना गाडी चालवणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे, गाडीमध्ये धूम्रपान करणे, गाडीला नंबर प्लेट नसणे, लायसन्स नसताना गाफी चालवणे, गाडीचे RTO कडे रेजिस्ट्रेशन नसताना गाडी चालवणे, वैध इन्शुरन्स किंवा वैध पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या सर्व गोष्टी भारतामध्ये गुन्हा ठरू शकतात.

5. पोलिसांनी अनधिकृतपणे तुमच्याकडे पैशांची मागणी केली तर ती पुर्ण करू नका. पोलिसांना चुकुनही लाच देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुमची गाडी वाहतूक पोलीस पकडतो तेव्हा त्याचा बकल नंबर आणि नाव नोंद करून ठेवा. कदाचित त्याने बकल लावलेले नसेल तर त्या पोलिसाला त्याच्या ओळखपत्राविषयी विचारा. जर पोलिसाने तुम्हाला देण्यास नकार दिला तर तूम्ही पण कागदपत्रे देण्यास नकार देऊ शकता.
6. जर तुमची गाडी पकडणारा पोलीस जर उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दंड भरून तुमची चूक सेटल करू शकता.

7. जर तुम्ही गाडी लायसन्स किंवा परवाना नसताना चालवत असल्याचे आढळून आल्यास पोलीस तुमची गाडी ताब्यात घेऊ शकतात. तुमची गाडी रेजिस्टर नसेल तरी सुद्धा पोलिस ती जप्त करू शकतात.
8. वैध पावतीशिवाय ट्राफिक पोलीस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकत नाही. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द ही केले जाऊ शकते जेव्हा तुम्ही सिग्नल तोडून जाता, मर्यादेपेक्षा जास्त वजन गाडीत वाहने, दारू पिऊन गाडी चालवली किंवा गाडी चालवताना मोबाईल वापरला.
9. तुम्ही गाडीमध्ये बसलेले असताना ट्राफिक पोलीस तुमची कर टो करून नेऊ शकत नाहीत. तुमच्या गाडीमध्ये कोनी नसेल तरच त्यांना ती उचलून नेण्याचा अधिकार आहे.

10.जर तुमची गाडी ट्राफिक पोलीसांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये जप्त केली तर तूम्हाला पुढील 24 तासात न्यायालयात चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक आहे.
11. ट्रॅफिक पोलिसांनी जर तुम्हाला काही त्रास दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करू शकता. त्यामध्ये घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती नोंद करावी.

जर तुम्ही फिर्यादी असाल किंवा तुम्हाला चलन देण्यात आले तर त्यामधे खालील माहिती असणे बंधनकारक आहे-

indian-traffic

1. ज्या न्यायालयात हजर राहायचे आहे त्याचे नाव आणि पत्ता, 2. केलेल्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती, 3. हजर राहण्याची तारीख, 4. गाडीची सर्व माहिती, 5. अपराधीचे नाव आणि पत्ता, 6. चलन घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आणि पत्ता, 7. जप्त केलेल्या कागदपत्रांचा तपशील.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
रस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *