ज्या कोर्टात वडील होते चपराशी, मुलगी तिथेच बनणार जज, पण…

ज्या कोर्टामध्ये वडिलांनी अनेक वर्षे चपराशी म्हणून नोकरी केली त्या कोर्टामध्ये आता त्यांची मुलगी जज बनणार आहे. परंतु याला नियतीचा खेळ म्हनले जाऊ शकते, त्यांच्या वडिलांना ही खुशखबर दिली जाऊ शकत नाहीये कारण ते आता जीवन व मृत्यूच्या मध्ये संघर्ष करत आहेत. 2013 पर्यंत सिव्हिल कोर्टमध्ये चपराशी म्हणून नोकरी करत रिटायर्ड झालेले जगदीश शाह यांना आता भागलपूर च्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आजारामुळे एकप्रकारे दुःख सुद्धा आहे सोबत मुलीची ते काम करत असलेल्या न्यायालयात जज म्हणून निवड झाल्याने खुश सुद्धा आहेत. चिंता यामुळे आहे की घरातील प्रमुख व्यक्ती 25 ऑक्टोबरपासून एका आजाराने ग्रासलेले आहेत आणि आयसियू मध्ये ऍडमिट आहेत.

आनंद या गोष्टीचा आहे की त्यांची मुलगी ज्युलि न्यायालयीन सेवा स्पर्धा परीक्षेत पास होऊन जज बनली आहे. परंतु ही आनंदाची गोष्ट मुलगा मुलगी आणि अजून बाकीचे कुटुंबातील सदस्य त्यांना आता ही गोष्ट नाही सांगू शकत.

वडिल सोडून सर्व नातेवाईक पासून पूर्ण गल्लीतील लोकं सामील झाले आहेत ज्युलिच्या आनंदात-

ज्युलि कुमारी 29 वी न्यायिक सेवा परीक्षा पास झाल्यानंतर भागलपूरच्या मायगंज या परिसरात प्रत्येक गल्लीमध्ये आनंद आणि चर्चा आहे. त्यांच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा जगदीश शाह मुलगी जज झाल्याची बातमी वाचतील तेव्हा खरच त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाहीत. भागलपूर सारख्या शहरात सिव्हिल कोर्टामध्ये चपरश्याची नोकरी करूनसुद्धा त्यांनी आपल्या मुलीला एवढे सामर्थ्यवान बनवले आहे त्याचे कौतूक करावे तेव्हडे कमीच आहे. त्यांच्या घरी परिवारात, शेजारी, नातेवाईक आणि वकिलांनी ज्युलिला शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या आहेत.

फक्त जज बनणे ही ज्युलिसाठी गर्वाची गोष्ट नाहीये तर ज्युलिला आनंद या गोष्टीचा झाला आहे की ती त्या न्यायालयात निकाल सुनावणार आहे जिथे तिचे वडील चपराशी म्हणून काम करायचे. घरची परिस्थिती चांगली नसतानाही आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊन जज बनवण्याच्या वडिलांच्या स्वप्नाला ज्युलि रोज जगत आली आहे. आणि आता तिने हे स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु या आनंदाच्या क्षणी ज्युलिला आपल्या वडिलांची कमी जाणवत आहे. कारण रुग्णालयात दाखल केलेले असल्यामुळे त्यांना मुलीच्या यशाची कल्पना नाहीये. ज्युलिच्या वडीलांना भागलपूरच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात चालले आहे.

लग्नानंतरही नाही सोडला आपल्या स्वप्नांचा ध्यास, पहिल्या प्रयत्नात राज्य न्यायिक सेवेच्या परीक्षेत मिळवले यश.

सरकारी शाळेत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्युलिने टीएनबी लॉ कॉलेजमधून लॉ चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच दरम्यान 2009 साली ज्युलिचे लग्न झाले. मात्र लग्नानंतरही ज्युलि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिली आणि पहिल्याच प्रयत्नात 29 व्या बिहार न्यायिक सेवा परीक्षेत यश मिळवले.

या कामगिरीवर ज्युलि खूप खुश आहे. पण वडिलांच्या तब्येतीमुळे थोडी नाराज सुद्धा आहे. कारण अजूनही ती आपल्या वडिलांना ही खुशखबर देऊ शकली नाहीये, ज्याचे स्वप्न ते अनेक वर्षापासून बघत होते.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *