सोशल मिडीयावर काँग्रेसचे अच्छे दिन आणनारी हि तरुणी कोण?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी खासदार आणि अभिनेत्री राम्या उर्फ दिव्या स्पंदना यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवड केली आहे. यापूर्वी रोहतकचे खासदार दिपेंदर हुडा हे मागील 5 वर्षांपासून काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची जबाबदारी बघत होते. राम्या यांच्या कडे ही जबाबदारी दिल्यापासून काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर भक्कमपणे बाजू मांडताना दिसत आहे. आणि याचाच परीणाम म्हणून की काय राहुल गांधीं सोशल मीडियावर खूप चांगल्या आणि आक्रमक पद्धतीने काँग्रेस पक्षाची बाजू मांडताना दिसत आहेत. राहुल गांधी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका करताना मिश्किल आणि विनोदी ट्विट करून चांगलेच जेरीस आणत आहेत. चला बघुया खासरेवर राम्याविषयी खासरे माहिती..

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया स्ट्रॅटेजीकडे चांगलेच लक्ष दिले आहे. सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर पक्षाला मजबुतपणे प्रेझेंट करण्यासाठी राहुल गांधी यांनी स्ट्रॅटेजीमध्ये बदल केले आहेत. आणि याचे चांगले परिणाम सुद्धा दिसायला सुरुवात झाली आहे. पूर्वीपेक्षा गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींचा खूप ऍक्टिव्ह अंदाज बघायला मिळत आहे. गुजरातमध्ये प्रचारानिमित्त दुसऱ्या दौऱ्याच्या वेळेस त्यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभा आणि रॅली ची माहिती खूप चांगल्या पद्धतीन लोकांपर्यंत पोहचवली जात आहे. यामुळे खूप जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अचानक डिजिटल प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या आयटी सेलचे यश म्हणजे राहुल गांधी यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची वाढत चाललेली संख्या. आणि अजून विषेश म्हणजे काँग्रेस पक्षाच्या राज्यातील आणि केंद्रातील सर्व नेत्यांना सोशल मीडियावर आणण्यासाठी राम्या प्रयत्न करत आहेत.

जाणून घेऊया सोशल मीडियावर काँग्रेसला ऊर्जा देणाऱ्या राम्या उर्फ दिव्या स्पंदना कोण आहेत

Ramya

राम्या या राजकारणात येण्यापूर्वी एक अभिनेत्री होत्या. त्यांनी कन्नड, तेलगू आणि तामिळ चित्रपटामध्ये काम केले आहे. राम्या यांनी 2012 साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2013 मध्ये मंडया या लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत विजय मिळवत खासदार होण्याचा मान मिळवला. पण पुढे 2014 च्या निवडणुकीत त्यांना मोदी लाटेत जेडीएस च्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला.

राम्या यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे. त्यांना ट्विटरवर जवळपास 4,83,000 फॉलोअर्स आहेत. आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.

DNA ला दिलेल्या मुलाखतीत राम्या यांनी सांगितले की, ‘सोशल मीडिया ही खूप महत्त्वाची गोष्ट बनला आहे. मला सोशल मीडियाच्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे जबाबदारी पूर्ण ताकदीने सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील काही महिन्यात खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही शिकत आहे. डिजिटल जग सुद्धा राजकारणासारखे आहे. तुम्ही जर कधीच पूर्णपणे शिकू शकत नाही. सोशल मीडियावर होणाऱ्या नवीन नवीन गोष्टींमुळे मला यामध्ये खूप रस वाटतो.’

राम्याचे ‘विकास गांडो थायो छे’ हे कॅम्पेन झालं आहे प्रचंड प्रसिद्ध

राम्या म्हणते की आपण फार काही मोठे नाही. पण त्यांच्याकडे टीममध्ये चांगल्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी आहे जी की यश मिळवण्यास सक्षम आहे. त्यांच्या टीमचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘विकास गांडो थायो छे’ कॅम्पेन. विशेष म्हणजे ही टॅगलाईन त्यांच्या टीममधील सदस्याच्या व्हाट्सएप ग्रुपमधून त्यांना मिळाली आहे. बुलेट ट्रेनचे काही फोटोस ग्रुपमध्ये टाकल्यानंतर तिथे काही एक जणाचा रिप्लाय आला की ‘विकास गांडो थायो छे’. त्यावेळी त्यांना याचा अर्थ माहिती नव्हता पण नंतर गुजराती ट्रान्सलेटर ने सांगितले की याचा अर्थ विकास पागल झाला आहे असा होतो. यानंतर काही मिनिटात हे खूप वायरल झाले.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
हार्दिक पटेल विषयी तुम्हाला ह्या गोष्टि माहिती आहे का?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *