ऑटोरिक्षावाला ते हजारो कोटींचा मालक अविनाश भोसले यांचा प्रेरणादायी प्रवास..

कष्ट आणि चिकाटी हे गुण जर अंगी असतील तर तो माणूस कसा प्रगती करतो याचे उदाहरण द्यायचे असेल तर आपल्याला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे द्यावे लागेल एवढे यश त्यांनी संपादित केले. आज बघुया खासरे वर अविनाश भोसले यांची यशोगाथा

12 वी नापास झाल्याने अपयश आले आणि त्यातून जिद्द आणि मेहनत करायचे गुण मिळाले. काही तरी केलं पाहिजे यासाठी मग त्याने आपले गाव संगमनेर सोडून पुण्याला आला त्याने तिथे ऑटोमोबाईलच्या कोर्सला प्रवेश घेतला. कोर्स करताना तो पुण्यातील पेठ भागात भाड्याने राहायचा त्या घराचा मालक रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय करायचा. अविनाश भोसले यांना या व्यवसायात उतरावे वाटले. त्यांनी वडिलांकडून 10 हजार घेऊन पहिली रिक्षा घेतली व ती शिफ्ट प्रमाणे 12 रुपये देऊन रिक्षा चालकांना चालवायला दिली. या व्यवसायातून त्याने प्रगती साधली 6 महिन्यात स्वतःच्या 3 रिक्षा घेतल्या. या व्यवसायात काही अडचणी निर्माण व्हायच्या रिक्षा चालकांकडून पैसे वसूल करणे कठीण काम होते त्यासाठी त्यांना त्या चालकांच्या घरापर्यंत जावे लागायचे झोपडपट्टी भागात ही लोक राहायची त्यांना भेटून पैसे वसूल करायचे.

या व्यवसायानंतर अविनाश भोसले हे बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी एका बिल्डर कडून सर्व माहिती घेतली. त्यांच्या वडिलांनी प्रभातरोड ला घर घेतले त्याच्या शेजारी एका बिल्डरची साईट सुरू होती. त्या साईटवरील कामावर पूर्ण लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ती पूर्ण करून 9 महिन्यात बिल्डिंग रेडी केली. येथून त्यांचा बांधकाम व्यवसायातील प्रवास सुरु झाला व 1979 साली त्यांनी ABIL Group या कंपनीची स्थापना केली. या कंपनी मधून काम करून पुण्यातील लँडमार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे निर्माण केले.

एबिल ग्रुप हा इमारती निर्माण पर्यंतच मर्यादित राहिला नाही. महामार्ग, बोगदे, धरण, कॅनॉल या गोष्टीही बनवतो. आज महाराष्ट्रातील अग्रणी नाव म्हणून अविनाश भोसले यांची ओळख आहे. बाणेर येथे त्यांचा आलिशान पॅलेस जरी लोकांना त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारा वाटत असला तरी त्यापाठी मागे त्यांनी केलेले अपार कष्ट आहेत.

आज त्यांच्या आलिशान घरात हेलिकॉप्टर उतरायची सोय आहे. त्यांच्याकडे स्वतःची 3 हेलिकॉप्टर आहेत. तर जगातील सर्व आलिशान कार चे कलेक्शन ही त्यांच्याकडे आहे.अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने कष्ट केले की यश तुमच्यापासून दूर जात नाही हेच अविनाश भोसले यांच्या जीवन प्रवासावरून दिसून येते.
साभार भैया पाटील

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..
शेतकऱ्याच मुल IAS अधिकारी ते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *