रस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल..

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात प्रवास ही न चुकणारी गोष्ट आहे. दैनंदिन जिवनात जास्त करुन लोक रस्त्याने प्रवास करतात. परंतु कधी तुम्ही या रस्त्याकडे लक्ष देऊन बघितले का ? तुम्हाला पांढ-या आणि काळ्या रंगाचे पट्टे आढळेल. बरोबर ना? परंतु तुम्ही कधि विचार केला का ? का बर रस्त्याच्या मधोमध हे पट्टे असतात. केलाच नसेल हा विचार कधी गरज सुध्दा पडली नाही. फार कमि लोकांना याविषयी माहिती असेल. ट्राफिक सिग्नल विषयी मीहिती बहुतांश सर्व लोकांना माहिती आहे. परंतु रस्त्यावरील पट्यांना सुध्दा अर्थ असतो , वेगवेगळे पट्टे वेगवेगळे नियम सांगतात. ही पिवळी व पांढरी लाईन वेगवेगळ्या आकार व स्वरुपात असतात , जी रोडचे वेगवेगळे नियम दर्शित करते. चला तर आज खासरेवर या वेगवेगळ्या पट्यांचा अर्थ जाणुन घेऊया..

लांब पिवळा पट्टा

या लांब पिवळ्या पट्टा ज्या रस्त्यावर असेल त्या रस्त्यावर वाहनांना तुम्ही ओवरटेक करु शकता. परंतु काहि राज्यात या पट्याचा अर्थ वेगळा सुध्दा आहे. जसे तेलंगणा मध्ये हा पट्टा ज्या रस्त्यावर असेल तिथे आपण इतर वाहनांना ओवरटेक करु शकत नाही.

दोन लांब पिवळे पट्टे

दोन लांब पिवळ्या पट्ट्याचा अर्थ होतो की, आपल्यास रस्ते वाहतुक नियमांचे पालन करत गाडी आपल्या बाजुने (लेन) मध्ये चालवावी लागते. या रस्त्यावर ओवरटेक करायला जमत नाही.

तुटक पिवळा पट्टा

तुटक पिवळ्या पट्ट्याचा अर्थ होतो की, मागील पुढिल वाहनास त्रास होत नसेल तर तुम्ही ओवरटेक करु शकता. सोबतच तुम्ही वाहनाचा वेग सुध्दा वाढवु शकता.

लांब पिवळ्या पट्यासोबत तुटक पिवळा पट्टा

यामध्ये दोन लाइन असतात, ज्यामध्ये एक लाइन लांब व दुसरी लाइन तुटक असतात. याचा अर्थ असा होतो की जर आपण लांब पट्याच्या बाजुने अससाल तर तुम्हाला ओवरटेक करीता कोणिही त्रास देऊ शकत नाही. याउलट आपण जर तुटक पिवळ्या पट्ट्याच्या बाजुने अससाल तर , तर आरामात ओवरटेक करता येउ शकते.

लांब पांढरा पट्टा

लांब पांढ-या पट्याचा अर्थ होतो की आपण आपली बाजु बदलुन दुस-या लेनमध्ये जाउ शकत नाही. हा पट्टा आपल्याला नेहमी घाटरस्त्यावर आढळेल.

तुटक पांढरा पट्टा

या लाइनचा अर्थ होतो की वाहतुकिचे नियम पाळुन आपण आपली बाजु बदलु शकता. परंतु मागील व पुढिल वाहनास याचा त्रास होणार नाही ही खबरदारी घ्यावी लागेल.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका….

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *