भारतातील या मंदिरात मिळतो आगळावेगळा प्रसाद नक्की वाचा…

देवाला प्रसाद देऊन देवांना खुश करण्याचा प्रकार संपूर्ण जगात चालतो. आपआपल्या परीने गरीब असो का श्रीमंत देवाला प्रसाद देतो आणि आपल्या मनातील इच्छा देवापुढे सांगतो. उद्देश हाच असतो कि देव प्रसन्न व्हावे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी किंवा पूर्ण झालेल्या इच्छे करिता देवास कृतज्ञता व्यक्त करणे. हाच प्रसाद इतर भक्तांना सुध्दा वाटण्यात येतो कारण लोकाचे श्रद्धा असते कि या प्रासादामध्ये देवाचा आशीर्वाद असतो. परंतु भारतात असेही काही मंदिर आहेत जेथे प्रसाद हा रोज भेटणारा पेढा, साखर नसून वेगळा प्रसाद वाटल्या जातो. आज असेच काही मंदिर आपण खासरेवर बघूया…

बीकानेर, करनी माता मंदिर

राजस्थान येथील बिकानेर पासून ३० किमी अंतरावर हे हिंदू देवी करणी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध आहे तिथे असणाऱ्या उंदरामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही इथे तब्बल २५,००० उंदीर राहतात. इथे कोणत्याही व्यक्तीने प्रसाद दिल्यानंतर तो पहिले उंदरांना खायला दिला जातो आणि त्यानंतर भक्तामध्ये वाटण्यात येतो. या उंदरांना कब्बास असे म्हणतात.

थ्रिसुर, महादेव मंदिर

वड्डकुनाथ मन्दिर म्हणजे केरळ येथील महादेव मंदिर उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना केरळ येथील हे मंदिर आहे. आणि येथील प्रसादहि तसाच खासरे आहे इथे मिळतात सीडी डीव्हीडी, पुस्तके कारण काय तर ज्ञानाचा प्रचार होणे या शिवाय इतर कुठलाही प्रसाद या मंदिरात दिल्या जात नाही. आज कारण समजले केरळमधील शिक्षणाचे प्रमाण का अधिक आहे.

पुरी, जगन्नाथ मंदिर

ओडीसा मधील जग्गानाथ मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. जगन्नाथ मंदिर रथयात्रा सुरु असते तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या मंदिरावर असतात. इथेच मिळतो वेगळ्या प्रकारचा प्रसाद तो म्हणजे ५६ भोग एकूण ५६ प्रकारचे पदार्थ देवास अर्पण केले जातात. आणि हा प्रसाद आनंद बाजार येथील दुकानात उपलब्ध असतो जे भक्त खरेदी करून ग्रहण करतात. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळा भोग दिला जातो सकाळी ८:३० ला गोपाल वल्लभ भोग, १० वाजता सकाळ धूप, ११ वाजता भोग मंडपा भोग दुपारी १ वाजता मध्यान्ह भोग सायंकाळी ७ ते ८ संध्या धूप आणि रात्री ११ वाजता बडा सिंघारा भोग असे व्यंजन दिले जातात.

गुवाहाटी, कामाख्या देवी मंदिर

कामाख्या देवी मंदिराला कामाख्या कामरूप मंदिर म्हणूनहि ओळखतात. इथे काली प्रसाद गोस्वामी यांच्या तर्फे तंत्र मंत्राचे शिक्षण हि दिले जाते. गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात भव्य मेळ्याचे आयोजन करण्यात येते. याकाळात तीन दिवसांसाठी देवीचे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात येते आणि चौथ्या दिवशी जेव्हा मंदिराचे द्वार उघडले जाते त्यावेळी असंख्य भक्त देवीची दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. येथे देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून एक ओला कपडा दिला जातो.

अलेप्पी, बालामुरुगन मंदिर

या मंदिरास मंच मुरगन म्हणून सुध्दा ओळखतात कारण आहे तिथे प्रसाद म्हणून मिळणारे मंच चॉकलेट, केरळमधील अलेप्पी येथे असलेले थेक्कन पलानी बालसुब्रमणिया मंदिराचे इष्ट देवता आहे. बालामुरुगन येथे असणा-या देवाला चॉकलेट अतिशय प्रिय आहे. त्यामुळे येथे देवासमोर प्रसाद म्हणून चॉकलेट अर्पित केले जाते आणि उपस्थित भक्तांना चॉकलेट प्रसाद म्हणून दिला जातो. ३०० वर्ष जुन्या असणार्या या मंदिरास १० वर्षापासून फक्त चॉकलेटच प्रसाद स्वरुपात देण्यात येते.

कोलकाता, चायनीज काली मंदिर

कोलकाता शहरतील टांगरा हि मध्यवस्ती आहे आणि इथे असलेली काली माता प्रसिद्ध आहे तिथे दिल्या जाणाऱ्या प्रसादा करिता. या भागात असणारे चायनीज लोक या देवीची मनोभावे पूजा करतात आणि प्रसाद स्वरुपात नूडल्स वाटण्यात येतात. संपूर्ण चायनीज शाकाहारी पदार्थ देवीला प्रसाद स्वरुपात देण्यात येतात. ६० वर्षापासून या देवीला चायनीज पदार्थाचा भोग चढविण्यात येतो.

मदुराई,अलागार मंदिर

मदुराई येथील २०किमि अंतरावर असलेले अलगार मंदिर आहे. जसा देश तसा वेश अशी एक म्हण आहे. त्यानुसारच तमिलनाडू येथे असलेल्या मदुरै येथे असणा-या विष्णुच्या अलागार मंदिरामध्ये प्रसाद म्हणून डोसा देण्याची प्रथा आहे. हा डोसा वेगळ्या पद्धतीने बनविल्या जातो मंदिरातील लोक सांगतात कि लोकांना पोटभर अन्न प्रसादातून मिळावे या करिता हा प्रसाद सुरु करण्यात आला आहे.

पलानी, धनदायुथपानी स्वामी मंदिर

तमिलनाडूच्या कोईम्बतूर येथून १०० किमी अंतरावर असलेले पलानी येथील अवस्थित भगवान मुरुगन मंदिरामध्ये प्रसाद म्हणून पाच फळं, गुळ आणि शुगर कॅंडी एकत्र करून “जॅम” सारखा पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. हा प्रसाद भक्तांना विकत देण्यात येतो.

अमाब्लापुझा, श्री कृष्ण मंदिर

केरळच्या थिरुवंथपुरुम जवळच असलेल्या अमाब्लपुझा येथील कृष्ण मंदिरा इसवि सण १५ ते १७ मध्ये बांधण्यात आले. हे मन्दिर प्रसिद्ध आहे इथे मिळणारा प्रसाद म्हणून दूध, साखर तांदूळापासून तयार केलेले पायसम (खीर) दिले जाते.

हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *