सोन्याचे धूर निघणारे जगातील काही देश नक्की वाचा फक्त खासरेवर

भारतात सामान्य लोकाकरिता सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि श्रीमंताकरिता त्यांच्या कडे किती ऐश्वर्य आहे हे दाखवायचे साधन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने साठवून ठेवल्या जाते. आपल्याला वाचायला नवल वाटेल कि सोने साठवून ठेवणाऱ्या देशाच्या यादीत भारत १०व्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या स्थानी अमेरिका हा देश आहे. हे सोने येथे कोठून चला बघूया खासरेवर

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या (डब्ल्यूजीसी) रिपोर्टनुसार, सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेत आहे. त्याचबरोबर जगातील काही देशातही सोने सापडते. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी जगातील पाच सोन्याच्या खाणींविषयी माहिती देत आहोत. कामगार आपला जीव धोक्यात टाकून खाणीतून सोने काढण्याचे काम करतात.

1. मुरुन्तौ:

उज्बेकिस्तानमधील किझील कम वाळवंटी प्रदेशात मुरुन्तौ हा प्रदेश आहे. जगातील सर्वाधिक सोने ह्या खाणीमधून काढल्या जाते. १९५८ साली या भागाचा शोध लावण्यात आला. या खाणीचा आकार ३.३५ किलोमीटर असून लांबी २.५ किलोमीटर तर खोली ५६० मीटर आहे. या खाणीवर ह्या सरकारच्या अधिपत्याखाली येतात. एका रिपोर्टनुसार, या खाणीतून अजून १७०० लाख पौंड सोने काढले जाणार आहे. मागील वर्षी या खाणीतून २६ लाख पौंड सोने काढण्यात आले होते.

2. ग्रासबर्ग:

ग्रासबर्ग हि जगातील दुसरी सर्वात मोठी सोन्याची व तांबयाची खाण आहे. इंडोनेशिया मधील पपूआ या राज्यात सर्वात उंच पहाडावर ह्या खाणी आहे. १९५०० लोक या खाणीत दिवसरात्र सोने काढण्याचे काम करतात. १९३६ साली काही डच वैज्ञानिकांनी या खाणीचा शोध लावला. मागील वर्षी या खाणीतून ११.३१ लाख पौंड सोने काढण्यात आले होते. सन २०१७ पर्यंत या खाणीतून सोने काढण्यास परवानगी मिळाली आहे. या खाणीवर अनेक वेळा हल्लाहि करण्यात आला आहे. १९७७ साली फ्री पपुआ मूवमेंट सुरु असताना येथे मोठा हल्ला करण्यात आला जवळपास ८०० लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते.

3. प्यूब्लो विएजो:

प्यूब्लो विएजो हि सोन्याची खदान डोमिनिकन रिपब्लिकन या देशात आहे. हि अमेरिकेतील सर्वात मोठी सोन्याची खदान आहे. हि खदान कंपनी मार्फत चालविल्या जाते. बॅर्रिक आणि गोल्‍ड कार्प या दोन कंपन्या या खाणीत संयुक्त रुपात उत्खनन करतात. या खाणीत बॅर्रिकची ६० टक्के तर गोल्ड कॉर्पची ४० टक्के भागिदारी आहे. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये २०१२ मध्ये या खाणची सुरुवात झाली होती. सन २०१४ मध्ये या खाणीतून ११.०८ लाख पौंड सोने काढण्यात आले होते.

4. यानकोचा:

पेरू या देशात यानकोचा हि सोन्याची खाण आहे. या शब्दाचा अर्थ आहे यानकोचा म्हणजे स्थानिक भाषेत काळे तलाव असा अर्थ आहे. दक्षिण अमेरिकेतील ही खाण डिपार्टमेंट आणि काजमार्काच्या अंतर्गत येते. ही खाण नॉर्थईस्ट लीमापासून ८०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच समुद्रसपाटीपासून ३५००-४१०० मीटर उंचीवर आहे. या खाणीतून २०१४ मध्ये एकूण ९.७० लाख पौंड सोने काढण्यात आले होते.

5.कार्लिन ट्रेंड:

न्यूमोंट कार्लिन ट्रेंड माइन कॉम्प्लेक्स अमेरिकेतील नेवाडा येथे आहे. ही खाण भूमिगत असून ओपन पिटही आहे. सोन्याच्या उत्पादनाच्या आधारावर या खाणीचा जगात पाचवा क्रमांक लागतो. या खाणीतून २०१४ मध्ये ९.०७ लाख पौंड सोने काढर्यात आले होते. २०१३ मध्ये १०.२५ लाख पौंड सोन्याचे उत्पादन घेण्यात आले होते.

तर हे आहेत सोन्याचा धूर निघणारे जगातील काही देश माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *