अंबानी, बच्चन व तेंडुलकरच्या घरी जाते हिच्या हायटेक डेअरीतील दूध…

कभी ख़ुशी कभी गम हा सिनेमा बहुतेक सर्वांनी बघितला असेल त्यामध्ये काजोलचा एक डायलॉग आहे बड्डे लोक बड्डी बाते ! हो तसेच काही आहे सध्या आपण खासरेवर बघणार आहोत. भारतात असी एक डेअरी आहे जिचे ग्राहक फक्त सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक आहे. तुम्ही म्हणसाल दुध हे दूधच त्यात काय फरक ? तर बघा खासरेवर काय आहे या डेअरी मध्ये व इतर डेअरी मध्ये फरक..

महाराष्ट्राकरिता अभिमानाची गोष्ट आहे कि हि हायटेक आणि महागडी डेअरी महाराष्ट्रात आहे. पुणेपासून ६० किमी अंतरावर असलेले मंचर हे गाव इथे आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आणि त्यांचे उत्पादन प्राईड ऑफ काऊ अक्षरशः सेलिब्रिटीना भुरळ घालत आहे. त्याचे ग्राहक साधारण व्यक्ती नसून भारतातील मोठे सेलिब्रिटी जसे मुकेश अंबानी,सचिन तेंदुलकर, अमिताभ बच्चन इत्यादी आहेत. या डेअरीचे एकूण ग्राहक संख्या आहे २५००० लोक आणि येथी गाईची संख्या आहे ३५०० व त्याची काळजी घेण्याकरिता दिवसरात्र काम करणारे ७५ कर्मचारी आहेत.

या सर्व साम्राज्याचे मालक आहे देवेंद्र शाह आणि त्यांची मुलगी अक्षाली शाह दरवर्षी फक्त दुधातून मिळणारा निव्वळ नफा असतो १५०० करोड रुपये आता भारतातील विविध भागातून यांच्या डेअरीच्या दुधाला मागणी वाढलेली आहे. देवेंद्र शहा यांनी ‘भाग्यलक्ष्मी डेअरीची सुरवात एक एक मॉडेल फार्मच्या धर्तीवर केली होती. शहा म्हणाले की, 90 च्या दशकात सरकारने ‘मिल्क हॉली डे’ची घोषणा केली तेव्हा, मंचरमधील शेतकरी दूध गोबर गॅस प्लांटमध्ये फेकत होते. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये दूध ठेवण्यास सुरुवात केली. नंतर दूध शहरात विक्रीसाठी पाठवणे सुरु झाले. एक महिनेत 20 ते 40 हजार लिटर दूध येऊ लागले. नंतर हळूहळू मिल्क प्रॉडक्ट्स बनवून ते एक्सपोर्ट करण्यास सुरवात झाली. ‘गोवर्धन’ या ब्रॅंड नेमने मिल्क प्रॉडक्टची विक्री केली जाते.

२०११ साली Pride of Cow हे उत्पादन सुरु केले तेव्हा ग्राहक संख्या होती फक्त १७५ आज ती २५,००० पर्यंत पोहचली आहे. यामध्ये तिने सोशल मिडिया या शस्त्राचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे. सोबतच ते दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना येथे मोफत ट्रेनिंग देतात यामुळे लोकपर्यंत त्याच्या डेअरीची माहिती लवकर आणि चांगल्या प्रकारे पोहचायला मदत होते.

काय आहे येथील गाईच्या दुधात विशेष ?

गायीसाठी पसरवण्यात आलेले रबर मॅट दिवसातून तिनदा बदलण्यात येते. विशेष म्हणजे येथील गायी आरओचे पाणी पितात. म्युझिक २४ तास सुरुच असते. गायींना सोयाबीन, अल्फा घास, हंगामी भाज्या मक्का खाऊ घातला जातो. गायींचे पोट साफ करण्‍यासाठी त्यांना हिमालय ब्रँडच्या आयुर्वेदिक औषधी दिल्या जातात. गायींना दिल्या जाणार्‍या खुराकमुळे दूधमधील फॅट कंट्रोलमध्ये राहातात. कंपनी सांगते कि गाई खुश तर दुध चांगले यामुळे हि सर्व काळजी घेतल्या जाते.

या सोबतच गायींना तपासण्याकरिता कॅनडातील न्युट्रीशियन एक्सपर्ट डॉ.फ्रँक दर तीन महिन्यांनी येथे येतात. हवामानाच्या हिशेबाने गायींचे आहार निर्धारित करतात. सध्या फार्ममध्ये एकावेळी ५४ लिटर दूध देण्यार्‍या गायी आहेत. दूधात यूरोपियन स्टँडर्डनुसार ७ ते ९ हजार लॅक्टेशन आहे. मात्र, कॅनेडियन लॅक्टेशन ९ ते ११ हजारवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

कोणालाही या डेअरीचा ग्राहक होता येत नाही. या साठी लागतो वशीला हो वाशिलाच म्हणावे लागेल जुन्या ग्राहकांचा, प्राइड ऑफ काऊचे ग्राहक होण्यासाठी जुन्या ग्राहकांची शिफारस आवश्यक असते.

भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचा आता पर्यटन टूरमध्ये समावेश झाला आहे. काही टूर ऑपरेटर मुंबई आणि पुण्याहून फार्मसाठी पॅकेज टूर आयोजित करतात. प्रत्येक वर्षी ८ हजार पर्यटक फार्म पाहाण्यासाठी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीचे संपूर्ण काम हे ऑनलाईन आहे त्या करिता एक विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे ज्यामध्ये ऑर्डर, ऑर्डर रद्द करणे आणि पैस्याची देवाण घेवाण सर्व ऑनलाईन व्यवहार होतो. यासोबतच कंपनीने स्वतःचे मोबाईल app हि विकसित केले आहे ज्या द्वारे ग्राहक कुठल्याही अडथळ्याशिवाय काम करू शकतो.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा रोजंदारीवर चार रुपये कमाविण्यापासून ते बावीस हॉटेलांचे मालक…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *