ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वयानुसार काही बदल होत असतात अमी त्यापैकी एक आहे दाढी. दाढी व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणाऱ्या केसाला संबोधले जाते. बघायला गेलं तर जास्त लोकांना दाढी आणि मिशा ठेवायला आवडतात. कारण दाढीमुळं व्यक्तीच्या सुंदरतेमध्ये भर पडते. परंतु काही जागा अशा असतात जिथे तुम्हाला दाढी करूनच जावे लागते. जसे की कॉलेज म्हणा किंवा ऑफीस ला दाढी करूनच जावे लागते. दाढी करणं पूर्वीच्या काळात अवघड काम होते. पण आता वेगवेगळी उपकरणे बाजारात दाखल झाली आहेत त्यामुळे दाढी करणे खूप सोपं झालं आहे. दाढी करण्यात सर्वात महत्वाची असते ती म्हणजे ब्लेड.

straight-razor

जाणून घेऊया ब्लेडच्या निर्मितीविषयी-

ब्लेड आपल्याला रोजच्या आवश्यक वस्तु पैकी एक अशी वस्तू आहे ज्याची गरज खास करून माणसांना जास्त पडते. माणसाला दाढी करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी विशेष करून ब्लेडची आवश्यकता असते.

Blade

ब्लेड च्या अवश्यकतेविषयी तर सर्वाना माहिती आहे पण ब्लेडचा शोध कधी लागला कोणी लावला याविषयी जाणून घेऊया. बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ब्लेडचा शोध कसा लागला. ब्लेडचा शोध 1901 मध्ये प्रसिद्ध जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कैंप जिलेट यांनी लावला होता. ब्लेडची जी डिझाईन आहे ती त्यांनी स्वतः एक सहयोगी सोबत मिळून केली होती.

Gillet

तेव्हापासून आज पर्यंत ब्लेडची एकच डिझाईन मार्केट मध्ये आली आहे. नंतर आलेल्या सर्व कंपन्या याच डिझाईनला फॉलो करत आल्या आहेत. त्यामध्ये टोपाज आणि मारफक या प्रसिद्ध कंपन्यांचा ही समावेश आहे. परंतु आपण कधी हा विचार केला आहे का की ब्लेडच्या मध्ये जी डिझाईन असते ती काय असते. जेव्हा जिलेट ने पहिल्यांदा ब्लेडची निर्मिती केली होती, तेव्हा त्यांनी ब्लेडचे फक्त 165 डिझाईन बनवले होते. ब्लेडच्या मध्ये जो जी डिझाईन केली होती ती खासकरून यासाठी सोडली गेली होती की, शेविंग करते वेळेस ब्लेड ला सोप्या पद्धतीने बोल्ट मध्ये सेट करता यावे. हेच कारण आहे की ब्लेडमध्ये विशिष्ट जागा सोडली जाते, जेणेकरून शेविंग करते वेळेस शेविंग हँड मध्ये अगदी आरामात फिट होईल.

wetshave

जिलेटनेच पहिल्या वेळेस शेविंग रेजर बनवले होते. आज हेच डिझाईन जगभरातील पूर्ण कंपन्या कॉपी करतात. सर्वप्रथम जिलेटने ब्लु जिलेट ब्लेड नावाने ब्लेडची निर्मीती केली होती. पुरुषांसाठी जिलेट एक वरदानच ठरले होते, कारण यामुळे दाढी करण्याच्या समस्येवर कायमचा उपाय त्यांना मिळाला होता.

SHaving

खालील व्हिडीओ मधूनही जाणून घेऊ शकता कारण-

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा: जगातील १५ रहस्यमय गोष्टी ज्यांचा उलघडा आज पर्यंत कुणालाही करता आला नाही.
वाचा: नासाने लाँच केले १८ वर्षीय भारतीय तरुणाने बनवलेले जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *