शिवरायांचा खरा मावळा ३३०० फूट उंचीच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर या पट्ट्याने पोहचवले पाणी!

माथ्यावर चंद्रकोर, दाढी वाढवून आणि हातावर नाव कोरून शिवभक्त होत नसतात. शिवभक्त त्याच्या कृतीतून सर्वाना दाखवितात कि हो आमचे आदर्श शिवराय आहेत. असच काही घडल साताऱ्यात ३३०० फुट उंचीवरील अजिंक्यतारा किल्ला सह्याद्रीच्या उंच पर्वतावर असल्याने तेथे पाण्याची सोय नव्हती. आता हीच सोय डॉ. अविनाश पोळ यांच्या प्रयत्नातून झाली आहे आज खासरेवर त्यांचा हा प्रवास बघूया…

सरकारला शिव्या देणारे आपल्याला खूप लोक भेटतात. पण आपले गाव, आपला देश चांगला करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण स्वत बदलले पाहिजे हे मनापासून समजून घेणारे आणि त्याप्रमाणे स्वतामध्ये बदल घडवणारे लोक फारच कमी असतात. अश्याच काही मोजक्या लोकांपैकी डॉ. अविनाश पोळ हे आहे.

अजिंक्यतारा पर्वतावर वसलेल्या या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. या किल्ल्यावर पर्यटनास व ट्रेकिंगला जाणा-या लोकांना खालून पाणी न्यावे लागत असे. मात्र, सातारा जिल्ह्यातीलच डॉ. अविनाश पोळ नावाच्या अवलियाने थेट किल्ल्यावर पाणी पोहचवले आहे. डेंटिस्ट असलेले डॉ. पोळ सातारा भागातील दुष्काळी भागात अनेक वर्षे जलसंधारणासाठी काम करीत आहेत. अनेक देश-विदेशात त्यांनी भेटी दिल्या असून, जागतिक पाणी परिषदेतही त्यांनी सहभाग घेतला आहे. या किल्ल्यावर पाणी पोहचविण्यासाठी त्यांनी नेमके काय काय केले त्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. तो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.

११९० साली शिलाहार वंशातल्या दुस-या भोजराजाने हा किल्ला बांधला. त्यानंतर अनुक्रमे बहामनी आणि विजापूरचा आदिलशहा यांनी हा किल्ला जिंकला. २७ जुलै, १६७३ साली हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. हा किल्ला म्हणजे मराठय़ांची चौथी राजधानी होती. १७०८ साली शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर १८१८ सालापर्यंत तो मराठय़ांच्याच अखत्यारीत होता.

या किल्ल्याची उंची जास्त असल्याने या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा जिल्ह्यावर बारकाईने नजर ठेवता येत असे. गडावर मंगळाईचा बुरूज, महादेवाचं मंदिर, यासारखी काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

खासरे तर्फे डॉक्टर अविनाश पोळ यांना शुभेच्छा.. लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा सावधान!शिवाजी नाहीसा होतोय..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *