अबब ! एवढा मित्रपरिवार असणारा फक्त टायगरच…

त्याला टायगरच्या नावाने सर्व ओळखतात व्यक्तिमत्वहि तसेच वाघाप्रमाणे फक्त व्यक्तिमत्वच नाही तर काम हि तो तसेच समाजपयोगी करतो. ह्याच गोष्टीतून त्याला समाधान मिळते. काल अचानक वाचता वाचता एक पोस्ट बघितली कि तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्याकरिता संपूर्ण भारतातून ८०,००० लोक करमाळ्यात आले. मी तर थक्कच झालो कि कोण असेल हा व्यक्ती ज्याचा वाढदिवस साजरा करायला एवढे लोक आणि घेतला शोध तानाजीरावचा आज खासरे वर बघूया तानाजी जाधव यांचे कार्य

पैलवान तानाजी जाधव करमाळा येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला युवक ते सांगतात कि वडील गाढवावर माती वाहायचे काम करत होते. परंतु लहानपणापासून तालमीत जायचा त्यांना भारी नाद आणि यामुळेच अनेक मित्र जुळत गेले. त्यांचे पूर्वज हि तसेच पैलवान होते त्यामुळे मल्लविद्या हि रक्तातच होती. शिक्षणात काही बस जमला नाही ८ वी नापास, १० वी नापास, १२वी नापास हे सगळ अनेक वेळा होत होत. परंतु शाळेत परत दाखला टाकायचा कारण काय तर नवीन मित्र मिळतात.

नाहीका भन्नाट म्हणजे मित्र जमविन्याकरिता परत परत शाळेत दाखला टाकणे. परंतु जमवलेले मित्र टिकवणे फार कमी लोकांना जमते त्यामधील एक तानाजी जाधव जेवढे मित्र जमवले ते आजही टिकून आहेत. त्यांचा मोठा भाऊ जालिंदर जाधव याने असाच मित्र परिवार स्थापन केला नाव “टायगर ग्रुप” ग्रुपचा उद्देश छोट्यात छोट्या अडचणीपासून तर मोठ्यात मोठ्या कठीण प्रसंगात मित्रांना मदत करणे.

त्याच ग्रुपचे काम आज तानाजी भाऊ बघतात. २००८ ला हा ग्रुप स्थापन झाला ४ वर्ष तालुक्यात अनेक मित्र जुळाली काहीतरी मोठ करायचं आणि मित्र जमविण्याची आवड तानाजी सांगतात कि पुण्याला नेहमी जाने येणे असायचे. तर जाता जाता कुठल्या तरी गावात थांबायचं नवीन लोक सोबत संपर्क करायचा आणि जुळवायचे मित्र अनेक आणि महत्वाच म्हणजे त्यांच्या सुखा दुखात सामील होणे. आज पुणे करमाळा रस्त्यावर कुठलीही दुर्घटना घडली तर टायगर ग्रुप तिथे पहिले पोहचतो.

कधी कुस्तीत कोणावर अन्याय झाला तर तानाजी भाऊ पुढे, नौकरीला तर जवळपास त्यांनी १००० ते १५०० मुले वेगवेगळ्या कंपनीत लावलेली आहे. निव्वळ नौकरीला नाही तर या मित्र परिवारातून अनेक मल्ल, बॉक्सर, नेमबाज खेळाडू तयार झाले आहे. आज टायगर ग्रुप महाराष्ट्रा बाहेर सुध्दा आपले पाय रोवत आहे. कर्नाटक राजस्थान युपी एमपी पंजाब येथील अनेक युवक या मंडळात सामील झाले आहे.

येवढा मोठा जनाधार युवक पाठीमागे साहजिकच प्रश्न पडणार राजकारण ?

तर आमच्या सोबत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले कि , माझे अनेक मित्र नगरसेवक सरपंच झाले असा कुठलाच पक्ष नाही कि त्यांनी मला बोलावले नाही आणि मोठे पदही देऊ केले परंतु मला राजकारणात रस नाही करायची ती समाजसेवा आणि जमवायचे ते मित्र हीच आपली संपत्ती आहे. तानाजीचे मित्र अनिकेत घुले यांच्या लग्नात तानाजीनि चक्क हेलिकॉप्टरने एंट्री केली.

मित्र असावा तर असा जिगरबाज आला लग्नाला कसा तर हेलिकॉप्टरने आणि त्या अगोदर २००० गाड्या फक्त स्वागताकरिता हे सर्व लोक भाड्याचे नसून जीवाला जीव देणारे आणि तानाजीच्या एका हाकेवर धावत येणारे मित्र आहेत.

याची प्रचीती आली २ नोव्हेंबरला तानाजी भाऊचा वाढदिवस मग चर्चा तर होणारच परंतु एवढी प्रचंड तब्बल ८०,००० लोक करमाळा तालुक्यात जमले यामध्ये संपूर्ण भारतातून लोक आले फक्त वाढदिवस साजरा करायला. तानाजी भाऊ ला कीती आल गिप्ट १३५ तलवारी त्यातील अनेक तलवारी चांदीच्या, शेकडो मोबाईल एका मोबाईल ची कीमंत १५ हजारा पासुन दीड लाखा पर्यत आणि मित्रा कडून एक SUV गाडी भेट, सोने तर विचारू नका.

संपुर्ण महाराष्ट्रात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर तसेच पंजाब,कर्नाटक,दिल्ली येथे ही वाढदिवसाचे डिजिटल पोस्टर अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, अंधेरी येथे युवकांना फ्री जिम, शिर्डीला मोफत ट्रॅक सूट वाटप याला म्हणतात वाढदिवस भूतो न भविष्या होणारा.

खरी संपत्ती हे मित्र आहे हे पैलवान तानाजी भाऊ जाधव यांनी सिद्ध केले आहे. मित्राच्या सहकार्याने माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो हे त्यांना बघून चांगल्या राजकारण्यांना देखील हेवा वाटेल.

ना कोणाचा हात, ना पूर्वजांची संपत्ती, ना शेतीवाडी फक्त स्वतःच्या कष्टाच्या जोरावर जमवलेलं हे सर्व त्यांना खासरे तर्फे सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..

खासरे तर्फे टायगर ग्रुपला शुभेच्छा ! लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *