मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…

मुलगा काय करतो ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या घरचे अभिमानाने सांगतात फेसबुकवर काड्या करतो. नाहीका भन्नाट काम? फेसबुकवर त्यांनी काही वर्षा अगोदर छंद म्हणू पेज काढले आणि आज त्याच छंदाचे व्यवसायात रुपांतर झालेले आहे. काही मराठी फेसबुक स्टारची माहिती आपण आज खासरे वर बघूया…

राहुल रंजन आरेकर वय २६ वर्ष माहीम, मुंबई

मोठे फेसबुक पेज:- आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात Latest Marathi Jokes

राहुलची एकंदर स्टोरी सिनेमा सारखी आहे एक मुलीच्या आठवणीत त्याने हे फेसबुक पेज २०१० साली सुरु केले. कधी त्याने हा विचार सुध्दा केला नव्हता कि एक दिवस हेच पेज त्याचे करीयर घडवेल. परंतु हे त्याचे आज करीयर झाले आहे तो म्हणतो कि लोक आपल्या आयुष्यावर नकळत उपकार करून जातात आणि झालेही तसे.

तिच्या आठवणीत तो चारोळ्या, कविता या पेज वर शेअर करत असे लोकांना सुध्दा हे आवडत होत त्या सोबत त्याने इतर पेजहि फेसबुकवर सुरु केले. फेसबुकवर एकूण ५० पेज राहुल कडे आहे. एवढेच काय तर मराठी अभिनेत्री प्रिया बापट, अमृता खानविलकर, केतकी माटेगावकर यांचे फॅन पेज राहुलने सुरु केले होते आज हे पेज त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्या सोबत जुळलेले आहे. केतकी माटेगावकरला तिच्या वाढदिवसानिमित्त राहुलने तिला पेज गिफ्ट केले आहे.

नाहीका खासरे , आज राहुल कडे फेसबुकवर विविध प्रमोशन मधून चांगला पैसा येतो. त्याने Paying Ghost या चित्रपटाचे प्रमोशन हि केले आहे. ४ मोबाईल्स, २ लॅपटॉप्स, १ DSLR हे सर्व काही राहुलने फेसबुक पेजच्या कमाईवर मिळविले आहे. लवकरच तो मुंबईला स्वतःचे घर घेणार आहे या करिता बऱ्याच दिवसापासून तो बचत करत होता. तो आनंदी आहे कि त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार.

भविष्यात राहुलला युट्युब वर पॉप्युलर मराठी चॅनेल बनवायचं आहे. ज्यामध्ये शॉर्ट मुव्हीज, pranks, webseries सर्व काही असेल. आणि मुंबईला एक स्वतःचे हॉटेल टाकायचे त्याचे स्वप्न आहे. लवकरच ते पूर्ण होवो ह्या खासरे कडून शुभेच्छा…

महेश VipMarathi वय २५ मराठी VipMarathi.Com सध्या vipmarathi.in या नावाने सुरु आहे.
फेसबुक पेज VipMarathi

मराठवाड्यातील एक सामान्य युवक घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण जेमतेम ९ व्या वर्गा पर्यंत झाले होते. मित्राच्या इंटरनेट कॅफेवर जाणे येणे चालत होते त्यामुळे इंटरनेट वगैरे विषयी त्याला बरीच माहिती होती. २०१० साली महेश नाईट ड्युटी करिता एका दुकानात काम करत होता. तेव्हा त्याच्याकडे होता चायनाचा मोबाईल इंटरनेट विषयी माहिती असल्यामुळे त्याने या मोबाईलवर नेट सुरु केले.

Wapka, Pepornity या सारख्या अनेक वेबसाईट वर त्याने असच काही तरी म्हणून वेबसाईट बनवत असे. त्यावरच त्याला कल्पना सुचली पहिली मराठी गाण्याची वेबसाईट VipMarathi.Com काम सोपे नव्हते परंतु या क्षेत्रातील त्याला माहिती होती आणि अनेक जाणकार ऑनलाईन मित्र जुळले होते. तो सांगतो एक एक रुपया उधार घेऊन त्याने ६००० जमविले आणि त्यानंतर २०११ साली त्याची वेबसाईट VipMarathi सुरु झाली आणि दिवसागणिक या वेबसाईटची लोकप्रियता वाढत गेली. मराठी गाण्याकरिता हि एकमेव वेबसाईट होती.

महेश सांगतो कि तो तालुक्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्याला नेट वगैरे इत्यादी मिळवायला त्रास होत असे. मित्राकडून सीडी उधार आणणे आणि गाणे अपलोड करणे यात दिवस जात होता. त्याकाळात 2G नेटचा स्पीडहि भयंकर कमी होता. २०१३ पर्यंत यात कुठलाही त्याला फायदा नव्हता परंतु या गोष्टीची त्याला आवड होती. फेसबुक पेजहि झपाट्याने वाढत होते त्यानंतर वेबसाईटवर इतर कंपनीच्या जाहिराती त्याने देणे सुरु केल्या आणि उत्पन्नाचे स्त्रोत सुरु झाला.

आज महेश स्वतःच्या कारने फिरतो, घर घेतले, स्वतःचे ऑफिस आहे हे सर्व काही झाल छंदातून भविष्यात महेशला स्वतःचे न्यूज पोर्टल सुरु करायचे आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खासरे कडून महेशला शुभेच्छा… (महेशला त्याचे पूर्ण नाव जाहीर करायचे नसल्यामुळे बाकी वैयक्तिक माहिती आम्ही देऊ शकत नाही)

मोहित मोहन कोलंगडे वय २६ वर्ष रा. कळंब जिल्हा. उस्मानाबाद https://12chyabhaavaat.com
फेसबुक पेज- आईच्या गावात बाराच्या भावात, इंजिनियरिंग फंडा

या नावाने मोहितला कोणी ओळखणार नाही. परंतु आईच्या गावात अन बाराच्या भावात, इंजिनियरिंग फंडा हे फेसबुक पेज नाव आज मराठीत प्रसिद्ध आहे. १० वर्षा अगोदर इंजिनियरिंगला असलेल्या मोहितने आईच्या गावात हे फेसबुक पेज सुरु केले. उद्देश होता फक्त मनोरंजनाचा त्या व्यतिरिक्त त्याने हा व्यवसाय होईल याचा विचार देखील केला नाही. हळू हळू त्याचे पेज लोकाच्या पसंदीला उतरू लागले आज मोहितच्या दोनीही पेजला दहा लाखाच्या घरात लाईक आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल फेसबुक पेजवरून कमाइ कशी सुरु केली मोहितने ? तर तो करतो मुव्ही प्रमोशन, Android Application प्रमोशन आणि आता वेबसाईट प्रमोशन सुरु केले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मोहितने याच फेसबुक पेजच्या जोरावर स्वतःचे घर बांधले. याच महिन्यात १० तारखीला त्याच्या या फेसबुक घराचा गृहप्रवेश आहे.

तो सांगतो पेजवर त्याची पहिली कमाई आहे त्याने घेतलेली स्वतःची बाईक आणि आता हा प्रवास पुढे सुरु आहे. मोहित आता स्वतःची वेबसाईट https://12chyabhaavaat.com चालवतो. भविष्यात त्याला हि कंपनी मोठी करायची आहे . आज मोहित घरबसल्या वर्षाला लाखो कमावतो.

हे आहेत काही खासरे मराठी फेसबुक उद्योजक ज्यांनी प्रतिकूल परीस्थित हे सर्व साम्राज्य निर्माण केले. विशेष म्हणजे हे सर्व वन मॅन आर्मी सर्व स्वतःच बघतात. असेच काही फेसबुकचे उद्योजक तुमच्या समोर अजून आणणार आहोत फक्त खासरेवर…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका… आपल्याकडे काही भन्नाट कथा किंवा आयडिया असेल तर संपर्क करा info@khaasre.com

टीप- खासरेच्या पूर्वपरवानगी शिवाय लेख कॉपी करू नये…

वाचा फेसबुक मध्ये काम करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *