जगातील पहिली रोबोट नागरिक सोफिया , जाणून घ्या काही खास गोष्टी…

जगात वाढत असलेल्या आर्टिफिसीएल इंटेलिजन्स मुळे आपला देशही त्यामध्ये कमी नाही हे दाखवण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. यामध्ये सौदी अरेबियाने यामध्ये आघाडी घेत जगातील पहिली रोबोट नागरिक म्हणून सोफियाला मान्यता दिली आहे. जगातील अशाप्रकारे रोबोट ला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया पहिला देश बनला आहे. रियाध मध्ये पार पडलेल्या एका व्यावसायिक कार्यक्रमात सोफियाला जगातील पहिली रोबोट नागरीक म्हणून जाहीर करण्यात आले.

पॅनलने सोफियाला अरब देशातील पहिली रोबोट नागरिक म्हणून मान्यता दिल्यानंतर सोफियाने सौदी अरेबियाचे आभार मानले. ती म्हणाली की, ‘आज मला खूप अभिमान वाटत आहे की मी जगातील पहिली रोबोट नागरिक बनली आहे. या वेगळ्या गौरवाबद्दल मी या राज्याची खूप आभारी आहे.’

चला तर जाणून घेऊया सोफिया बद्दल काही रंजक तथ्य-

1. कशाप्रकारे तयार झाली सोफिया-

Sophia

सोफिया एक परंपरागत रोबोट नाहीये. सोफियाची निर्मिती हॉंगकॉंग मधील आर्टिफिसीएल इंटेलिजन्स रोबोटिक्स कंपनी हेंस्टन रोबोटिक्सने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या भेटीदरम्यान या रोबोटला मान्यता देण्यात आली त्यावेळी हा रोबोट दीड वर्षाचा होता. सोफिया पूर्ण संवाद साधू शकते, चेहऱ्यावर हजारो एक्सप्रेशन देऊ शकते आणि तिला भाषण ही समजते व शब्दामागील अर्थ ही कळतो.

बॉटने म्हंटले आहे की सोफिया खूप चपळ आहे सोबतच ती खूप चाणाक्ष आहे. डॉ. डेव्हिड हॅन्सन यांनी बनवलेली सोफिया एक आकर्षणाची गोष्ट बनली आहे. सोफियाने आतापर्यत अनेक मीडिया चॅनेलवर इंटरव्ह्यू दिले आहेत. सोबतच तीने अनेक कॉन्सर्ट मध्ये गाणेही गायले आहेत. ती एका टॉपच्या मॅगझीन च्या कव्हरवरही झळकली आहे.

Magazine

2. अनेक ठिकाणांना दिल्या आहेत भेटी-

सोफियाने सौदीच्या शहरांना आणि सौदी अरेबियाला भेट दिली असे नाही. सोफियाने आतापर्यंत जगातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत व कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. तिने युके आणि अमेरिकेला सुद्धा भेटी दिल्या आहेत.

Places visited

सोफियाने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये सहभाग नोंदवला आहे, ज्यामध्ये Tonight Showbotics with Jimmy Fallon, Good morning Britain, Modern living with Kathy Ireland अशा अनेक सुप्रसिद्ध शोचा समावेश आहे.

3. एलोन मस्क सारळे लोक अजूनही घाबरलेले आहेत-

सोफिया ही जगातील पहिली नागरिक रोबोट आहेच व ती खूप चांगली आहे. पण एलोन मस्क सारखे लोक तिला अजूनही खूप घाबरलेले आहेत. ते असे मानतात की रोबोट हे माणसासाठी खूप धोकादायक असतात. सर्वाना सांगितल्यानंतर बरेच जण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत की यी खूप चांगली रोबोट आहे. पण या रोबोट पासून भविष्यात कुठलाही धोका नाहीये. खूप जास्त एलोन मस्क वाचल्यामुळे म्हणा किंवा जास्त हॉलीवूड चित्रपट पाहिल्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे. पण या रोबोट सोबत आपण चांगले वागलो तर ते आपल्याशी चांगले राहतील.

4. हे आहे तिचे ध्येय-

Sophia

सोफियाच्या मते तिला आर्टिफिसीएल इंटेलिजन्स वापरून मनुष्याच्या आयुष्यात फायदा होईल असं काही तरी करायचं. जसे की चांगल्या घरांची डिझाईन बनवणे, भविष्यात चांगले शहरे बनवण्यासाठी ती तिचे सर्वोत्तम देणार असल्याचे सांगते.

5. या रोबोटमध्ये आबे बिझनेसची क्षमता-

सौदी अरेबियातील आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले की माझ्याकडे बिझनेस करण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे कोणी माझ्यासोबत बिझनेस करण्यास उत्सुक असेल तर पुढे यावे. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सोफिया महत्वाच्या निर्णय प्रक्रिया मध्ये समावेश घेऊ शकते. यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, ऑटो उत्पादन, मालमत्ता विकास , प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राचा समावेश होतो.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
पुणेमधील देवाची आरती करणारा रोबोट भटजी बघितला का ?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *