जळत्या गाडीतून ८ चिमुकल्यांना वाचविणारा ओमप्रकाश, आज आलीये भिक मागायची वेळ…

मनुष्य कठीण काळात काय निर्णय घेतो यावर त्याचे व्यक्तिमत्व अवलंबून असते. काही काही छोटे मुले सुध्दा अश्या गोष्टी करून दाखवितात ज्या चांगल्या चांगल्या रथीमहारथीना जमत नाही. अशीच एक घटना आपण खासरे वर बघूया…

उत्तर प्रदेश आझमगड ओमप्रकाश करिता तो नेहमी प्रमाणे दिवस होता. शाळेची तयारी करून तो शाळेत निघाला होता वय होते फक्त ११ वर्ष नेहमी प्रमाणे स्कूल बस मध्ये सर्व मित्र शाळेत जाण्याकरिता निघाले. यशोदा इंटर शाळेत तो शिकत होता हि बस शाळेची होती. नरसीपूर रोड वर गाडी आल्यावर होत्याचे नव्हते झाले. गाडी मध्ये गॅेस लिकेज होता त्यामुळे गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्या बरोबर गाडीचा चालक दरवाजा उघडून पळून गेला.

ओमप्रकाशसुध्दा ड्रायवरच्या बाजूने बसून होता तो हि गाडीच्या बाहेर सुरक्षित निघाला. परंतु इतर लहान मुलांना गाडीचा दरवाजा उघडता येत नव्हता. त्याच्या सोबत त्याची लहान बहिण सुध्दा होती. त्याने जीवाची पर्वा न करता त्या बस मध्ये तो गेला आणि एक एक करून सर्व चिमुकल्यांना बाहेर काढले. परंतु या दरम्यान गाडीत लागलेल्या आगीमुळे त्याचा चेहरा संपूर्ण भाजून गेला. तसाच तो बाहेर आला आणि बेशुद्ध पडला.

त्यानंतर ओमप्रकाशवर दवाखान्यात ४८ दिवस उपचार चालले त्यानंतर तो सुखरूप बाहेर आला. परंतु त्याच्या सोबत राहिले आयुष्यभर न जाणारे चेहऱ्यावरील जखमा आणि कानाला हि दुखापत झाल्यामुळे त्याला कमी ऐकायला येऊ लागले. हि घटना होती २४ सप्टेंबर २०१० ची आज या घटनेला ७ वर्ष झाली आणि ओमप्रकाशचे वय १९ वर्ष आहे.

२६ जानेवरी २०११ला त्याला संजय गांधी चोपडा शौर्य पुरस्कार सुध्दा भेटला त्याला वाटले या पुरस्कारानंतर त्याचे जीवन बदलेल परंतु तसे काही झाले नाही. या घटनेनंतर तो जखमा घेऊन आयुष्य जगत आहे. २०१४ साली त्याच्या घरच्यांनी कर्ज काढून २.५ लाख रुपये त्याला लावले परंतु पूर्ण इलाज झाला नाही. पुढील इलाजा करिता ओमप्रकाश भिक मागून पैसे जमा करत आहे. राजकारण्या कडे तो अर्ज करून थकला आहे. अतिशय दुखद घटना आहे कि त्याच्या साहसा करिता त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेले.

ओमप्रकाश लवकर बरा व्हायला हवा…
हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा कदाचित कोनही दानशूर व्यक्ती त्याची मदत करेल…
बहिणीला बिबट्याच्या तावडीतून वाचवणारी महाराष्ट्राची ‘वाघीण’

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *