Royal Enfield बुलेट विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?

Royal Enfield हे नाव एकल्या बरोबर समोर असतो रुबाबदार दमदार गाडी आपल्या लक्षात येते जिची लोकप्रियता दिवसान दिवस वाढत आहे. तिला बुलेट म्हणून सुध्दा आपण ओळखता. १९५५ पासून आपले वर्चस्व निर्माण करणारी Royal Enfield मोटरसायकलने या स्पर्धेच्या काळातसुध्दा आपली जागा अबाधित ठेवली आहे. जिथे पहिली बुलेट बनविल्या गेली त्यांनी आता बुलेटचे उत्पादन बंद केले आहे. एक काळ असा होता कि वर्षाला फक्त २००० बुलेट विकल्या जायच्या आणि बुलेट घ्यायला ६ महिने अगोदर बुकिंग करणे आवश्यक होते. असेच काही बुलेट विषयी खासरे तथ्य आज आपण बघूया…

१९९४ मध्ये Eicher ग्रुपद्वारा विकत घेतल्या जाणारी बुलेट विषयी काही खास गोष्टी आपल्याला कदाचित माहिती नसणार, त्याच खासरे गोष्टी आज आम्ही आपणास सांगणार आहोत.

Royal Enfield कंपनीने शस्त्र बनविणारी कंपनीच्या स्वरुपात काम सुरु केले होते. त्याचे प्रसिध्द शस्त्र Enfield Rifle हे आहे. Royal Enfield द्वारे मोटर सायकल बनविण्याची सुरवात १९०१ सालापासून झाली.

Royal Enfield चा लोगो तोफ होता आणि त्यांची टॅगलाईन होती तोफी सारखी दिसणारी व बंदुकीच्या गोळी सारखी चालणारी. Made like a gun goes like a bullet

Royal Enfield चे एक विशेष आहे कि, प्रत्येक मोटरसायकल वरील पेट्रोलची टाकी हि चेन्नई येथील दोन कारागिराच्या हाताने पेंट केल्या जाते. इंग्लंड मध्ये मोटर सायकल उत्पादन सुरु करण्या अगोदर हि कंपनी रशियन सरकार करिता युद्ध मोटर सायकल बनवत असे.

इंग्लंड पासून भारतापर्यंत सर्व उत्पादनाचा विचार केल्यास Royal Enfield जगातील सगळ्यात जुनी मोटरसायकल कंपनी आहे जिचे उत्पादन अजूनही सुरु आहे.

तुम्ही सर्वात पहिले शोले सिनेमात साईड कारसोबत हि गाडी बघितली असेल. साईड कारचा पहिला उपयोग पहिल्या विश्व युद्धात मशीन गन व सैनिकाकरिता करण्यात आला.

Royal Enfield हि जगातील पहिली कंपनी आहे जिने ४ स्ट्रोक इंजिनचा वापर मोटरसायकल करिता सुरु केला. १९९० साली Enfield India ने डीझलपासून चालणारे मोटरसायकल इंजिनची निर्मित केली ज्याचे नाव Taurus हे होते. परंतु या मोटरसायकलला बाजारात जास्त यश मिळाले नाही. त्यामुळे २००२पासून डिझल इंजिन बुलेटने बंद केले.

भारतामध्ये टूव्हीलर मध्ये रेअर डिस्क ब्रेकचा पहिला प्रयोग करणारी कंपनी Royal Enfield आहे. १९६५ मध्ये भारत सरकारने आपल्या देशातील पोलीस आणि सैन्यास चांगल्या मोटरसायकल देण्याचा विचार सुरु केला. त्याकरिता सगळ्यात चांगली गाडी म्हणून बुलेटची निवड झाली. Royal Enfieldचा वापर आजही भारतीय सैन्याकरिता केल्या जातो.

भारतासोबत बुलेटचा वापर अमेरिका जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि आणखी ४५ देशात हि गाडी निर्यात केली जाते. जेवढ्या Harley Davidson पूर्ण जगात विकल्या जातात तेवढ्या बुलेट फक्त भारतात विकल्या जातात हे विशेष….

आणि सर्वात विशेष म्हणजे कधी तुम्ही बुलेटची जाहिरात टीव्ही वर बघितली का ? मग विचार करा हि कंपनी का एवढी प्रसिद्ध आहे.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा या तरुणाने वाचवली बुलेट(Royal Enfield) कंपनी इतिहास जमा होण्यापासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *