तीन कुर्ते आणि एक सायकल असणारे IIT प्राध्यापक…

सोप नाही आहे आरामदायक जीवन सोडून खडतर परीस्थित जीवन जगणे. जिथे जगातील प्रत्येक माणूस पैसा,बंगला गाडी याच्या मागे धावत आहे. तिथे आलोक सागर यांच्या सारखे लोकही आहे. जे आयुष्यात काहीही मिळवू शकतात. कितीही पैसा कमवू शकतात परंतु त्यांनी खडतर आयुष्य निवडले आणि या निर्णयावर ते समाधानी आणि खुश आहेत आज खासरे वर बघूया आलोक सागर यांचे जीवन…

परदेशात घेतले शिक्षण

आयआयटी दिल्ली येथे इंजिनियरिंगची पदवी त्यानंतर मास्टर डिग्री आणि ह्युस्टन परदेशातून पीएचडी मिळवली आहे आलोक सागर माजी आयआयटी प्राध्यापक आहेत. पूर्व रिझर्व बँक गवर्नर रघुराम राजन यांचे गुरु आहेत आलोक सागर परंतु सध्या ते ३२ वर्षापासून मध्यप्रदेश मधील दुर्गम भागात आदिवासी बहुल गावात राहतात. तिथल्या लोकांच्या प्रगती आणि विकासाकरिता ते महत्वपूर्ण काम करत आहेत. कुठल्याही फायद्या करिता ते हे काम करत नसून त्यांना फक्त या दुर्गम भागातील लोकांना प्रगत मानवी प्रवाहात आणायचे आहे.

आयआयटी दिल्ली येथे नौकरी करीत असताना त्यांनी अनेक नामांकित व्यक्तींना शिकविले आहे. त्यानंतर त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला आणि सध्या आलोकजी मध्य प्रदेश मधील बैतुल जिल्ह्यात होशंगाबाद येथे आदिवासी विकासाकरिता काम सुरु केले. मागील २६ वर्षात त्यांनी ७५० आदिवासी लोकांसोबत दुर्गम गाव कोछमु येथे राहतात. जिथे वीज, रस्ता इत्यादी कुठल्याही प्राथमिक सुविधा नाही आहे फक्त एक प्राथमिक शाळा…

आत्तापर्यंत आलोकजीनि या आदिवासी भागात ५०,००० पेक्षाही अधिक वृक्ष लावले आहेत त्यांना देशसेवेचा हा परमोच्च मार्ग वाटतो आणि हा मार्ग आहेच देशसेवेचा. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते सांगतात कि, भारतात एवढ्या समस्या आहेत, परंतु भारतातील बुद्धीजीवी लोक ह्या समस्या दूर करायचे सोडून स्वतःला मोठे करण्यात गुंतलेले आहेत.

नक्षलवादी असल्याचा केला होता संशय

राष्ट्रीय अंतराष्ट्रीय गोष्टी सोडून आलोकजी शांतपणे आपले काम करीत आहे. मागील निवडणुकीत स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांच्यावर वेगळाच संशय पकडला आणि त्यांना या भागातून काढायचा प्रयत्न केला. तेव्हा आलोक सागर यांनी त्यांचा परिचय स्थानिक अधिकाऱ्यांना दिला आणि हे सर्व बघून सर्व अधिकारी स्तब्ध झाले. आणि शहनिशा केल्यावर त्यांना हे सत्य कळले.

आलोकजी यांचे साधे आयुष्य खरच प्रेरणादायी आहे. आलोकजी यांच्या जवळ फक्त तीन कुर्ते आणि एक सायकल आहे. ते संपूर्ण दिवस भर वेगवेगळ्या झाडाच्या बिया जमा करतात आणि आदिवासी लोकांना वाटतात. आलोकजी तिथल्या स्थानिक भाषासुद्धा शिकले आहेत. श्रमिक आदिवासी संघटन जुळून ते हे सर्व काम आदिवासी विकासकरिता करीत आहे. आलोक सागर यांना खासरेतर्फे मानाचा मुजरा…

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा फक्त चहा विकणारे मोदीच नाही तरअतिशय गरीब कुटुंबात जन्‍मलेले झाले आहेत पीएम-सीएम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *