त्याने चक्क 4 कोटी 53 लाखाच्या गाडीला मालकांनी जुंपली गाढवं…

आपल्या 4 कोटी 53 लाख रुपये देऊन खरेदी केलेल्या महागड्या जगुआर कारमध्ये नेहमी होणाऱ्या बिघाडीला कंटाळून या गाडीमालकाने चक्क या गाडीला ओढत नेण्यासाठी गाढवं जुंपली आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी उद्योगपती राहुल ठाकरेम यांनी 4 कोटी 53 लाखाची ही महागडी कर खरेदी केली खरी पण या कारमध्ये सतत काही न काही बिघाड होत आहे. याच गोष्टीला कडरलेल्या राहुल यांनी कार बिघडल्यावर तिला गाढवं जुंपून ओढत नेण्याचा मार्ग पत्करला आहे. गाढवांनी गाडी ओढत नेने आता राहुल यांना जास्त विश्वासार्ह वाटत आहे.

राहुल यांनी ही कार बिघडल्यानंतर गाढवं जुंपून नेणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. गुजरात मधील अहमदाबादचे रहिवाशी असणाऱ्या 38 वर्षीय राहुल ठाकरेम यांनी नियमित बिघडणाऱ्या कारला ओढत नेण्यासाठी ही नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी गाडी घेतलेल्या ठिकाणी भेट देऊन अनेक वेळा गाडी दुरुस्त केली पण एक समस्या संपली ना संपली की दुसरी काही तरी उद्भवते.

राहुल सांगतात, मी त्यांना परत परत जाऊन गाडी दुरुस्त करण्यास सांगण्यास कंटाळलो होतो. सर्व होऊनही मी ती वापरतो व त्या गाडीची किंमत माझ्यासाठी काय आहे हे डीलरला दाखवण्यासाठी गाडीला गाढवं जुंपण्याचा विचार आला.

खरेतर त्यांना गाढवं हे जगूआर पेक्षा विश्वासार्ह वाटतात. तर पुढे म्हणाले, ” माझ्या मते ही गाडी चाकावरील सरडाईन टिनपेक्षा वाईट आहे. मी अनेक डीलर्स कडे ही गाडी दुरुस्तीसाठी घेऊन गेलो आणि दुरुस्त केली परंतु यामुळे माझी समस्या काही मिटली नाही. या गाडीमध्ये एवढ्या समस्या आहेत की मी त्यांची यादीही करू शकत नाही.

त्यांनी सांगितले की 7 मे रोजी ही कार घेतली तेव्हापासूनच त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात अगोदर गाडीचे लाईट बंद झाले. मी ओरडलो तर त्यांनी लाईट बदलून दिले. नंतर बंपर निघून पडले आणि ते 10 दिवसांनी बदलून मिळाले जे की 24 तासात दुरुस्त करून मिळणे बंधनकारक आहे. तेव्हापासून ही समस्यांची मालिकाच सुरू झाली.

राहुल म्हणाले की त्यांच्या कुटुंबाने त्यांचं हसू करण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्य त्यांना या गाडीपेक्षा गाढवाची गाडी बरी म्हणून चिडवायला लागले आणि तसं तर तर एकप्रकारे बरोबरच वाटू लागले.

भारतीय डीलर्सनी या प्रकरणावर काही भाष्य करण्यास नकार दिला आहे, कारण त्यांची राहुल ठाकरेम यांच्याशी अजूनही चर्चा चालू आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा कर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *