जीएसटीच्या नावावर दुकानदार असे करत आहे ग्राहकाची फसवणूक…

देशात 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी जीएसटीच्या नावावर छापील किंमतीपेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांची थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना काही गोष्टींसाठी कमी तर काही गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु जीएसटीच्या नावाखाली दुकानदार अजूनही लोकांना चुना लावत आहेत.

मोदी सरकारनं नुकताच म्हटले आहे की काही दुकानदारांनी अजूनही स्वत:ला जीएसटीशी नाही जोडलं. तरी ते ग्राहकांकडून जीएसटीनुसार पैसे घेत आहेत. अशा परिस्थितीत, जर एखाद्या दुकानदाराने आपल्याकडून जीएसटीच्या स्वरूपात पैसे घेतले तर त्यांच्याकडून त्याचं निश्चित बिल मिळवा. जर त्याच्याकडे जीएसटीचं बिल नसेल तर मग त्याची तक्रार करण्याचंही आवाहन सरकारने ग्राहकांना केलं आहे.

सरकारने टीन नंबर ऐवजी जीएसटीनंबर आणला आहे. जीएसटी 15 अंकी आहे. दुकानदारांकडून मिळणाऱ्या बिलावर ते मुद्रित केलेलं पाहिजे. जर दुकानदार आपल्याला जीएसटी नंबर नसलेलं बिल देत नसेल तर त्याला जीएसटीनुसार पैसे देऊ नका आणि त्याची तक्रार करा.

तक्रार कुठे करणार?

Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर तक्रार करता येईल. ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तक्रार करु शकता. वैधमापन विभागाच्या dclmm_complaints@yahoo.com या ई मेल आयडीवर तक्रार करता येईल. किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.अन्यथा संबंधित जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचं आवाहन गिरीष बापट आणि वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.

याशिवाय, काही दुकानदार काही बँडेड वस्तूंवर जास्त टक्के जीएसटी लावून लोकांना फसवत आहेत. आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेता तेव्हा त्या वस्तूच्या प्राईज टॅगवर लिहिलेलं असतं की, सर्व टॅक्ससह एमआरपी किंमत. पण तरी एखादा दुकानदार टॅगवर लिहीलेल्या किंमतीनंतरही जीएसटीची रक्कम वेगळी मागत असेल तर तो तुम्हाला फसवत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *