जाणून घ्या ऍनाकोंडा बद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी. खरंच ते माणसाला खातात का?

ऍनाकोंडा विषयी आपल्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज असतात. त्यापैकी ऍनाकोंडा माणसाला खातो याबद्दल खूप चर्चा होत असते.पण ही चर्चा फोल ठरू शकते. यामध्ये काहीही तथ्य नाहीये की ऍनाकोंडा माणसाला खातो. ऍनाकोंडा साप हे 30 फूट लांबीचे असतात तर त्यांचे वजन 550 पौंड पर्यंत असते. मादा ऍनाकोंडा या नर ऍनाकोंडा पेक्षा मोठ्या असतात. ऍनाकोंडा सापाचा आकार त्याच्या जीवनभर वाढत असतो.

anaconda

ऍनाकोंडा हे अमेरिकेतील उष्णकटिबंधीय वर्षावनात, झरे आणि दलदल मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे साप सामन्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे असतात. परंतु ऍनाकोंडा हे आपल्या आयुष्यातील अधिकतर काळ हा पाण्याखाली घालतात, कारण ते पाण्याखाली स्वतःला झाकू शकतात. ऍनाकोंडा विषयी अजून एक विशेष बाब म्हणजे हे साप आपल्या शिकारीला कधीच चावून खात नाहीत तर ते शिकारीला थेट गिळून घेतात.

ऍनाकोंडा एका हरणाला सहज गिळू शकतो. ऍनाकोंडाला एकदा जेवण केल्यानंतर अनेक महिने किंवा कधी कधी तर वर्षभर जेवणाची आवश्यकता पडत नाही. ऍनाकोंडा साप हे विषारी नसतात परंतु त्यांनी एकदा शिकार पकडली तर त्या शिकारीला एव्हडे जखडून ठेवतात की त्याचा जीव गेल्याशिवाय ते सोडतच नाहीत. ऍनाकोंडा हे एकदाच त्यांची पूर्ण शिकार गिळू शकतात. ऍनाकोंडा हे बरेच वेळा रात्री शिकार करतात.

anaconda

एप्रिल आणि मे महिन्यात ऍनाकोंडा हे संभोग करतात. त्यानंतर 6 महिन्यांनी मादा ऍनाकोंडा ही 15 ते 25 ऍनाकोंडा बालकांना जन्म देते. जन्माच्या वेळी हे ऍनाकोंडाचे मुलं हे 2 फूट लांबीचे असतात. एका ऍनाकोंडा सापाचे आयुष्यमान हे जवळपास 12 वर्षे आहे. जगभरात ऍनाकोंडा सापाच्या 4 प्रजाती आढळतात.

anaconda

जाणून घेऊया ऍनाकोंडा विषयी अजून काही मजेशीर गोष्टी-

1. वनांमध्ये 10 ते 12 वर्षे आयुष्यमान असणाऱ्या ऍनाकोंडा ला आपण जर बंदिस्त करून ठेवले तर ते 30 वर्षापर्यंत जगू शकतात.

anaconda

2. सवाना मध्ये राहणारे ऍनाकोंडा साप नदीमध्ये राहणाऱ्या ऍनाकोंडाच्या तुलनेत खूप छोटे आणि वजनाने हलके असतात. याचे कारण की सवाना मध्ये खाण्याची उपलब्धता ही फक्त हंगामी असते.

3. नवजात ऍनाकोंडा हे जगातील सर्व सापांच्या तुलनेत अधिक मोठे असतात.

4. नवजात जन्मलेले ऍनाकोंडा हे आईच्या आकाराच्या फक्त 1% एवढे असतात.

5. जन्मल्यापासून प्रौढ वयापर्यंत एक ऍनाकोंडा जवळपास 500% बायोमास मिळवतो.

anaconda

6. ऍनाकोंडा मध्ये जन्मल्यानंतर जवळपास 1 वर्षांमध्ये लैंगिक ज्ञान येते.

7. हिरव्या नर ऍनाकोंडा मध्ये थोड्या काळासाठी शुक्राणू संचित करून ठेवण्याची विशिष्ट गोष्ट आहे.

8. मादा ऍनाकोंडा हे बाळाला जन्म दिल्यानंतर 1-2 ऍनाकोंडाना खातात, कारण त्यांना जवळपास 7 महिने अन्न न खाता राहावे लागते.

anaconda

9. लहान ऍनाकोंडा खूप आक्रमक असतात. तर खूप तेजस्वी रंगाच्या नसतात यावरून समजते की ते विषारी नसतात.

10. नवजात ऍनाकोंडा चया फुफुसामधून जोरात आवाज ऐकू येतो. त्यांच्या जवळून जाणाऱ्या शिकारीवर ते खूप जलद हल्ला करतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा: सर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *