भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

शत्रूच्या सीमेत विमान कोसळले आणि युद्धबंदी म्हणून पकडल्या गेल्या तरी त्या डगमगणार नाहीत. पुरुष लढाऊ वैमानिकांच्या युद्धकाळातील हिमतीचे कौतुक होते, हे कौतुक आपल्याही वाट्याला येणार याची त्यांना खात्री आहे, कारण त्यांनीही खडतर प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याही मनात तीच जिद्द आणि तोच लढाऊ बाणा आहे. भारतात पहिल्यांदा महिला हवाईदलातील पहिल्या ‘फायटर पायलट’ म्हणून सेवारत झाल्या.

फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या ‘फायटर पायलट’ म्हणजेच ‘लढाऊ वैमानिक’ महिला म्हणून निवड झालीय. आज खासरेवर बघूया यांच्याविषयी माहिती…

बिहारच्या भावना कांत, मोहना सिंग आणि मध्य प्रदेशच्या अवनी चतुर्वेदी या तिघी तरुण-उमद्या महिला वैमानिक हवाई दलाच्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये १८ जून रोजी दाखल झाल्या. हैदराबादच्या हकीमपेट येथील तळावर आपले कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मोहना सिंग यांना हवाई दलाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही हवाई दलात वैमानिक होते. युद्धसामग्रीवाहक विमानांचे वैमानिक होते. आज तिसऱ्या पिढीच्या मोहना एक पाऊल पुढे टाकत लढाऊ विमानांची जॉयस्टिक हाती घेणार आहेत.

पक्षांप्रमाणे आकाशात भरारी घेणं हे अवनी चतुर्वेदीचं वेड तिचं लहानपणापासूनचं हे स्वप्न पूर्ण तर झालयंच पण तिची आता भारताच्या संरक्षणाच्या इतिहासातही नोंद होणार आहे.

भावना म्हनायची कि आम्ही खूप स्पेशल आहोत असं काही आम्हाला वाटत नाहीय आमचं लक्ष लागलंय ते ट्रेनिंगकडे यावरून त्याचे ध्येय त्यांनी निश्चित केलेले होते आणि हे कठोर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करून सिद्ध केले आहे.

आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत हकेम्पेटमध्ये असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसमध्ये या तीघीने ट्रेनिंग घेतले आहे. ज्या पद्धतीची ट्रेनिंग पुरुष पायलटसना दिली जाते तिच ट्रेनिंग आपल्यालाही मिळत होती. केवळ महिला आहोत, म्हणून कोणतीही सूट दिली जात नाहीय, असं मोहना सिंग सांगत होत्या.

या अगोदर १९९१ पासून इंडियन एअर फोर्समध्ये महिला पायलट हेलिकॉफ्टर आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमध्ये दिसत आहेत. भारतीय सैन्यात खालील प्रमाणे महिलांची संख्या आहे. आर्मी १४३६ एयर फोर्स १३३१ IAF मध्ये पायलट ९४ नौदल ४१३ ह्या तिघीही भारताचे नाव रोशन करतील यात कुठलीही शंका नाही.

या तिघींना खासरे तर्फे सलाम ! माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

वाचा भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकाऱ्याचा संघर्षमय प्रवास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *