श्याम रंगीला: नरेंद्र मोदीची नक्कल करणारा सामान्य शेतकरी पुत्र…

राजस्थानमधील २२ वर्षीय युवक रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला आहे. ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज मध्ये स्पर्धक म्हणून तो आला आणि त्याने केलेल्या मोदिच्या नक्कली नंतर रातोरात तो प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे मोदीची नक्कल केल्यामुळे त्याला या शो मधून काढण्यात आले आहे. चला तर बघूया श्याम रंगीला विषयी काही खासरे माहिती…

श्याम रंगीला २२ वर्षीय राजस्थानमधील गंगासागर तालुक्यातील मोखमवाला गावात शेतकरी कुटुंबात श्यामचा जन्म झाला. श्याम एका सामान्य कुटुंबातील सदस्य त्याचे वडील शेतकरी आहे. परंतु श्याम अचानक प्रसिद्ध झाला त्याचे श्रेय जाते सोशल मिडीयाला ते कसे तर, मागील वर्षी १९ नोव्हेंबरला श्यामच्या मित्राने त्याला नक्कल करायला लावली. विषय होता सोनम गुप्ता बेवफा है…

श्यामने ती नक्कल मोदि स्टाईलमध्ये केली. आणि त्याच दिवशी त्याच्या मित्राने तो विडीओ युट्युबवर अपलोड केला. त्यावेळेस त्याच्याकडे मोबाईलसुध्दा नव्हता आणि तो सांगतो गावात रात्री आम्ही विडीओ बनवत होतो तेव्हा लाईनहि नव्हती. विडीओ मध्ये आपण बघू शकता कि त्याच्या चेहऱ्यावर टॉर्चच्या मदतीने हा विडीओ शूट केला.

२ दिवसात विडीओ एवढा तुफान वायरल झाला कि त्याला १० लाख पेक्षाही अधिक views आले. त्यानंतर श्यामने एक स्टेज शो केला. विवेकानंद इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी जयपूर येथे तिथे त्याने राहुल गांधीची नक्कल केली विषय होता पाणीपुरी तो विडीओसुध्दा वायरल झाला.

श्यामला लहानपणापासून कॉमेडीयन व्हायचे होते. तो ११ वर्षाचा होता तेव्हा त्याने त्याचे करीयर ठरविले होते त्याकरिता तो जयपूर येथे राहत होता. तो अमिताभ, राज कुमारयांची सुध्दा हुबेहूब नक्कल करतो. २०१४च्या लोकसभेपासून त्याने मोदीची नक्कल करायला सुरवात केली.

काही दिवसा अगोदर तो मुंबई येथे आला स्टार प्लसच्या ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंजमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. त्याने केलेली नक्कल एवढी हुबेहूब होती कि कोणीही आवाजावरून फरक ओळखू शकणार नाही परंतु या कार्यक्रमाचे प्रसारण टीव्हीने केले नाही आणि त्याला शोमधून काढून टाकण्यात आले आहे. कारण हि अद्याप कोणालाही माहिती नाही. युट्युब अथवा फेसबुकवर हा विडीओ अपलोड केल्यास स्टारप्लस रिपोर्ट करून तो विडीओ काढायला भाग पाडत आहे.

असो श्याम रंगीला करिता हि सुरवात आहे दिवसान दिवस या हरहुन्नरी कलाकाराचा प्रगतीचा आलेख असाच वाढत राहो त्याकरिता खासरे कडून शुभेच्छा…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !
वाचा पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *