संपूर्ण जगभराचे आवडते पेय चहाचे हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का?

सर्वात अगोदर १८१५ साली काही इंग्रजी पर्यटकांचे लक्ष आसाममधील चहा च्या झाडावर गेले जे की स्थानिक आदिवासी लोक एक पेय म्हणून पित असत. पुढे १८३४ मध्ये चहाची परंपरा भारतात सुरू करण्यासाठी आणि चहाचे उत्पादन करण्याची शक्यता पडताळणीसाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बैंटिक यांनी एका समितीची स्थापना केली. त्यानंतर १८३५ ला आसाममध्ये चहाचे बाग लावण्यात आले.

Tea Garden

बोलले जाते की एक दिवस चीनचे सम्राट शॅन नुंग यांच्या गरम पाण्याच्या ग्लासमध्ये काही पाने येऊन पडली आणि पाण्याला रंग आला आणि मग जेव्हा त्यांनी ते पिले तर त्यांना ते खुप आवडले. बस इथूनच चहाचा सफर सुरू झाला. चहापानाच्या परंपरेचा पहिला उल्लेख ३५० साली म्हणजेच २७३७ वर्षापूर्वीचा आहे. १६१० मध्ये डच व्यापारी चीनमधून चहा युरोपमध्ये घेऊन गेले आणि हळू हळू चहा हे संपूर्ण जगभराचे आवडते पेय बनले आहे.

Tea

भारतात मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन घेतले जाते. आसाममध्ये चहाच्या प्रचंड बागा बघायला मिळतात. जगात होणाऱ्या चहाच्या उत्पादनाच्या 25% उत्पन्न हे भारतात घेतले जाते. भारतामध्ये गरम चहाचे शौकीन असणाऱ्या लोकांची कमी नाहीये. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी सारख्या वस्तू घालून आरोग्याच्या दृष्टीने चहा पिणे उत्तमही आहे.

Tea

संपुर्ण जगभराचे आवडते पेय असणाऱ्या चहाचे अनेक दुष्परिणामही आहेत, जाणून घेऊया काही दुष्परिणाम-

१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ,रक्तदाब वाने, पक्षाघातासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (५ रू/चहा असे) वर्षाचे ३६०० रू होतात. ५ वर्षाचे १८००० रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.

खरे पाहिले तर ‘चहा’ दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही.

Tea biscuite

याशिवाय बरेच वेळा आपल्याला सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी चहा पिल्याने ऍसिडिटीचा सामना करावा लागू शकतो. पचन तंत्र कमजोर होणाची समस्याही रिकाम्या पोटी गरम चहा पिल्याने उद्भवू शकते. चहाने भूक पण कमी लागते. अति उकळलेला चहा आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरतो, कारण त्यात कॅफिन जास्त प्रमाणात असते. पोटात जळजळ होणे, उलटी येणे, जीव घाबरणे अशा समस्यांचा सामनाही तुम्हाला करावा लागू शकतो. चहासोबत ब्रेड बिस्कीट खाल्याने यापासून थोडा बचाव होऊ शकतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

इंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…

हे पेय तुम्हाला अनेक रोगापासून वाचवू शकते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *