बांद्राचा राजा या खासरे ऑटोरिक्षा मध्ये बसण्यासाठी करावं लागतं ऍडव्हान्स बुकिंग

या खासरे ऑटोमध्ये आहे एलसीडी टीव्ही चार्जिंगची सोय वायफाय कनेक्शन मोफत प्रथमोपचार रेडिओ मॅगझीन आणि अजून बऱ्याच सुविधा. वाचून नवल वाटेल पण या सर्व सुविधा एका रिक्षामध्ये आहेत. हा रिक्षा आहे आहे बांद्राचे सुप्रसिद्ध ड्रायव्हर संदीप बच्चे यांचा. 37 वर्षीय संदीप यांच्या रिक्षाला बांद्राचा राजा म्हणूनही ओळखले जाते. संदिप आपल्या रिक्षात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अगोदर 5 रुपयांमध्ये 1 कॉफीचा कप देऊन त्यांचे स्वागत करतात. नेहमी सुगंधी वास दरवळणाऱ्या त्यांच्या रिक्षात बसण्यासाठी गेल्यावर ते चॉकलेट ही देतात. रिक्षात बसणारे लोकं त्यांना सांगतात की त्यांना त्यांच्या राहत्या घरात बसल्याचा अनुभव येत आहे.

sandeep-bacche-2

संदीप हे आपल्या छोट्या कुटुंबासह एका छोट्या खोलीत राहतात. तर दररोज सकाळी आपली रिक्षा धुतात व त्या दिवसाचे वर्तमानपत्र ठेवतात. अजून एक विशेष बाब म्हणजे संदीप रोज आपल्या रिक्षामध्ये त्या दिवसाचे हवामान, सोन्याचे दर, विनिमय मूल्य आणि शेअर मार्केटचे अपडेट लिहितात.

sandeep-bacche

या सर्व सोयीसुविधा व्यतिरिक्त संदीप यांनी ऑटोला दृष्टीदान, जलसंवर्धन, प्रदूषण आणि मुली वाचवा अशा अनेक संदेशानी सजवलेले आहे. यातून त्यांच्या संवेदनशीलतेचाआणि उदारतेचा प्रत्यय येतो. त्यांच्या रिक्षामध्ये कॅन्सरच्या रुग्णांना मदत करण्यासाठी एक दान पेटीही ठेवलेली आहे.

sandeep-bacche-2

गरजूंना पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न संदीप नेहमी करतात. ते अंध व्यक्तीना, अपंगांना व नवीन लग्न झालेल्या जोड्यांना सवलतीच्या भाड्यात सोडतात. एखाद्याला वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमधे कुठे सोडले तर ते एक रुपयाही घेत नाहीत.

sandeep-bacche-2

संदीपच्या या आकर्षक रिक्षामध्ये काही मर्यादाही आहेत. त्यांनी रिक्षामध्ये ‘टॉयलेट उपलब्ध नाही’ असा बोर्ड लावलेला आहे. कारण काही महाविद्यालयीन मुलींनी त्यांना विचारले होते की तुमच्या रिक्षामध्ये सर्व सुविधा आहेत पण टॉयलेट कुठेय. तेव्हा पासून त्यांनी हा बोर्ड लावला आहे.

sandeep-bacche

म्हणतात ना तुमचा काम करण्याचा अंदाज तुम्हाला दुसऱ्या पासून वेगळं असल्याचं सिद्ध करतो. त्याचप्रमाणे संदीप हे इतर रिक्षावाल्यांसाठी एक उदाहरण बनले आहेत. खार आणि बांद्रा मध्ये राहणार प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या रिक्षामधून प्रवास करण्याची इच्छा असते. अजून एक खास बाब म्हणजे टॅक्सीप्रमाणे लोकाना त्यांच्या रिक्षाचं ऍडव्हान्स बुकिंग करावं लागतं. विनम्रता आणि विशेष ऑटोमुळे महाराष्ट्र पोलीस त्यांना रोल मॉडेल म्हणून पुढे आणत आहेत. लवकरच संदीप हे इतर रिक्षाचालकांना प्रामाणिकपणे कमाई करण्यासाठी काही युक्त्या शिकवणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा ऑटो ड्रायव्हरचा मुलगा ते टीव्हीतील महाराणा प्रताप…
वाचा गाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक,उस्मानाबादच्या गणेश देशमुखची कथा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *