नेपाळमध्ये शाल विकणारा मुलगा ते प्रसिद्ध हिरा उद्योगपती राज कुंद्राचा प्रेरणादायी प्रवास…

राज कुंद्रा एका सामन्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा पण परिस्थितीवर मात करत त्याने असामान्य कामगिरी करून दाखवली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टींचा नवरा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्र आहे. आज राज कुंद्राची संपत्ती २४०० करोड आहे पण यामागे काही इतिहास आहे. एक शाल विकणारा मुलगा उद्योगपती कसा होतो हे आज आपण खासरेवर बघूया…

राज कुंद्राच्या बालपणी त्यांनी सुध्दा कधी विचार केला नसेल कि त्यांना हे बघायला मिळेल ते एका मुलाखतीत सांगतात कि, आज जे जीवन ते जगत आहे याच्या उलट त्यांचे बालपण होते. त्यांनी स्वप्नात सुध्दा हि उंची गाठायचा विचार केला नाही.

राज कुन्द्रांचा जन्म एका सामन्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाळकृष्णन हे इंग्लंड मध्ये बस कंडक्टर होते. १८ वर्षाच्या राजला वडील सतत तगादा लावत स्वतःचा धंदा कर, काहीतरी काम सुरु कर, रेस्टारंट चालव म्हणून राज १९९४ साली नेपाळला आले आणि त्याचे आयुष्य बदलले पश्मीना शालीच्या व्यवसायातमध्ये…

Raj Kundra Parents

शालीचा व्यवसाय चांगला तेजीत आला आणि ते फक्त शाल आयात निर्यात करणे यावर समाधान न मानता जवळ आलेला पैसा घेऊन ते दुबईला गेले. तिथल्या हिरा व्यापाऱ्याशी चर्चा केली परंतु मनासारखे यश आले नाही. पैसा संपत होता परत ते नेपाळला आहे आणि काही पशमीना शाल त्यांनी खरेदी केल्या आणि ब्रिटेनच्या काही ब्रँडेड दुकानांमध्ये विकल्या. त्यांना या व्यवसायात परत यश आले.

परंतु या व्यवसायात आता स्पर्धा वाढली होती. त्यामुळे राज हिऱ्याच्या व्यवसायाकरिता परत दुबईला गेले, आणि त्यानंतर त्यांना यश प्राप्त झाले. दुबई, युक्रेन, रशिया या देशात त्यांनी खनन, रियल इस्टेट आणि सौर उर्जा इत्यादी व्यापारात जम बसवला.

पहिली पत्नी कविता सोबत त्यांचा २००७मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ साली त्यांनी शिल्पा शेट्टी सोबत लग्न केले दोघाची ओळख लंडनला झाली होती. त्यांचे लग्न हि अविस्मरणीय होते जयपूर येथील जलमहलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. आणि आज दोघांना एक एक मुलगा (विवान) देखील आहे.

आज ते वेगवेगळ्या १० कंपन्यांमध्ये मालक आहेत. राज कुंद्राला २००४ मध्ये एका ब्रिटिश मॅगजीनने सगळ्यात श्रीमंत आशियातील ब्रिटिश लिस्टमध्ये १९८वं स्थान दिलं. आयपीएलमध्ये देखील ते राजस्थान रॉयलचे मालक होते.

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा सुनील शेट्टींची संपत्ती बघून तुम्ही थक्क व्हाल, दुसरे अंबानीच आहेत सुनील शेट्टी
वाचा आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *