व्हायरल होतोय ‘मर्सल’मधील तो सीन…

तामिळ चित्रपट “मर्सल”चा जीएसटी सारख्या महत्वपूर्ण विषयावर चित्रित केलेल्या संभाषणावरून चांगलाच वादंग निर्माण झाला.बीजेपी ने या संभाषणाला विरोध दर्शविला आहे,महानायक राजीकांत ने यालाच “बहोत खूब” संभाषण म्हणून सांगितलं आहे.पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.

देशभरात या वादामुळे चित्रपटाविषयी आकर्षण,एक क्रेझ वाढत चालली आहे.तामिळनाडू मध्ये चित्रपटात असलेले जीएसटी आणि डिजिटल इंडिया यांच्यावर असलेले संभाषण हटवण्यामुळे वादंग निर्माण झाला आहे.हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला.

‘सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी असूनही आरोग्यसेवा मोफत दिली जाते पण भारतात २८ टक्के जीएसटीनंतर आरोग्यसेवा मोफत दिली जात नाही’ या डायलॉगवर तामिळनाडू सरकारने आक्षेप घेतला आहे. सिनेमातील ‘तो’सीन काढण्यात यावा, असे चित्रपट दिग्दर्शकांना सांगण्यात येत आहे.

अभिनेता रजनीकांत कमल हसन तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि डीएमके नेता एम.के.स्टॅलिन यांच्याबरोबरच अन्य नेत्यांनीही बीजेपीच्या मनुसुब्याचा निषेध व्यक्त केला आहे.

बिजेपीने याला धार्मिक रंग देत लिहलं होत की,”मर्सल या सिनेमातुन जोसेफ विजय याची मोदींविषयी असलेली नकारात्मक भावना दिसून येते.”एटली द्वारा निर्देशित,मर्सल सिनेमामध्ये विजय ट्रिपल रोल मध्ये आहे.सध्या बॉक्सऑफिसवर या सिनेमाची कमाई चांगली चालू आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *