Whatsapp विषयी काही अपरिचित खासरे गोष्टी…

दोन मित्रांनी चांगली उच्च पगाराची नौकरी सोडली आणि काहीतरी नवीन करण्याचे ठरविले परंतु यश आले नाही त्यामुळे त्यांनी नौकरी परत सुरु केली. परंतु मनातील काहीतरी नवीन करायचे भूत गेले नव्हते. यानंतर त्यांनी काही नवीन प्रयोग केले जे लोकप्रिय होत गेले. एक दिवस त्याचे हे app एवढे लोकप्रिय झाले कि फेसबुक सारख्या मोठ्या कंपनीने हे app विकत घेण्याकरिता सहमती दर्शवली. हि गोष्ट आहे Whastsapp बनविणाऱ्या Jan Koum व Brian Acton ची या दोघा मित्रांनी तयार केले आहे Whatsapp तर आज खासरे वर whatsapp विषयी माहिती नसलेल्या गोष्टी बघूया…

Whats Up (काय सुरु आहे?) हा पाश्चिमात्य देशातील प्रसिध्द शब्द त्यामुळे Whatsapp हे नाव या अप्लिकेशनचे ठेवण्यात आले.

Whatsapp वापरणारे जगात सर्वाधिक लोक भारतात आहे. इथे Whatsapp मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते.

Whatsapp ने स्वतःच्या प्रसिद्धी करिता advertiseवर रुपया सुध्दा खर्च केला नाही तरी ते एवढे लोकप्रिय आहे.

जगात स्रावाधिक Download होणाऱ्या application पैकी Whatsapp हे ५ व्या नंबरवरील app आहे.

Whatsapp “No Ad Policy” वर काम करतो त्यामुळे Whatsapp वर तुम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात दिसत नाही.

Whatsapp टीम मध्ये ५५ इंजिनियर काम करतात. यामध्ये एक इंजिनियर १ करोड ८० लाख वापरकर्त्यांना हैन्डल करतो.

Whatsapp वर रोज ४३०० करोड मेसेज सेंड होतात. whatsapp वर रोज शेअर होणाऱ्या फोटोची संख्या १६० करोड एवढी आहे आणि विडीओ ची संख्या २५ करोड एवढी आहे.

Whatsapp चा वापर आपण ५३ भाषामध्ये करू शकतो. whatsappचे महिन्याला active वापरकर्ते १०० करोड आहे जे फेसबुक मेसेंजर पेक्षाही अधिक आहे.

कधी विचार केला का whatsapp वर किती ग्रुप असतील त्याची संख्या १०० करोड पेक्षाही अधिक आहे.

Whatsapp चे जनक Jan Koum व Brian Acton यांनी २००९ साली फेसबुकमध्ये नौकरी करण्याकरिता अर्ज केला होता परंतु फेसबुकनि या दोघांना reject केले होते.

Jan Koum याचा जन्म युक्रेन देशातील कीव येथे झाला होता. तो अतिशय गरीब परिस्थितीत जन्मला आहे. त्याच्या घरी लाईनसुध्दा नव्हती. Jan Koum ने दुकानात साफ सफाईचे काम सुध्दा केले आहे सध्या तो अरबपती आहे.

Whatsapp चा ट्रायल सुरवातीस jan koum याने काही रशियन मित्राच्या मोबाइल वर केले होते. Whatsapp एवढ्या जलद गतीने वाढणारे दुसरे कोणतेही application नाही आहे.

Whatsapp मुळे इतर मेसेजिंग कंपनीना ३८६ बिलियन डॉलर एवढे नुकसान झाले आहे. फेसबुक ने whatsapp ११८२ अफ्ज रुपयात विकत घेतले. हि डील १४ फेब्रुवरी २०१४ रोजी झाली होती.

whatsappची वार्षिक कमाई NASA (अमेरिका अवकाश संशोधन संस्था)च्या बजेट पेक्षाही जास्त आहे.

इंटरनेटवर पडणाऱ्या २७% सेल्फीला whatsapp जवाबदार आहे. January 2012 ला whatsapp ios store वरून ४ दिवसाकरिता काढण्यात आले होते.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *