उत्तरेतील झंजावत श्रीमंत महाराज महादजी शिंदे…

अठराव्या शतकाच्या पूर्वधात भरताता मराठ्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्याच्या रक्षणाची व्यवस्थ छत्रपती शाहू महाराज यांनी मोठ्या दूरदृष्टिने केली.

सरखेल अंग्रे(कोकणपट्टी) सरदार गायकवाड़(गुजरात) सरदार होळकर(इंदूर-मालवा) सरदार पवार (धार-मालवा) सरदार शिंदे(उज्जैन ग्वाल्हेर- मालवा) सरदार खेर(सागरप्रांत-बुंदेलखंड) सेनासाहेब सुभा भोसले(नागपुर -वर्हाड) सरदार फत्तेसिंह भोसले(अक्कलकोट) सरदार पटवर्धन(कर्नाटक सीमा)
अशा प्रकराचे सराजमे देवून मराठा दौलतीचे रक्षण व्हावे, अशी योजना करण्यात आली.

छत्रपती शाहु महाराजांनी जे नवे सरदार पुढे आनले त्यापैकी मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे प्रमुख होते. राणोजीराव शिंद्याच्या चार पुत्रानी जय्यापाराव,ज्योतिराव,दत्ताजीराव तुकोजीराव आणि जनकोजी(नातू) एका मागून एक असे मराठा साम्राज्यासाठी आपले बलिदान दिले, इतके करुणही पनिपतावर रणदेवता मराठ्यांना प्रसन्न झाली नाही. अपरित हानी झाली.शिंदयांचे वारस म्हणून शिंदयांची दौलत पुन्हा उभी करण्याचे आणि उत्तरेत मराठा राज्याची गेलेली पत पुन्हा निर्माण करण्याचे अत्यंत बिकट कार्य नियतीने महादजींच्या पदरात टाकले.

असे असूनही पानीपतानंतर पुढची सात आठ वर्षे पेशव्याच्या घरातल्या अंतर्गत राजकरणाचा परिणाम म्हणून महादजींना सुभेदारी मिळू शकली नाही.वनवासात सिंहासन घडत असते या नियमानुसार या सात वर्षाच्या राजकीय विजनवसातच महादजीच व्यक्तिमत्व.नेतृत्वगुण यांचा कस लागून ते बावनकशी सोने असल्याचे सिध्द झाले.याच कालखंडात त्यांनी जी माणसे जोडली ती आयुष्यभर त्यांच्याशी एकनिष्ठ राहिली.

पुढे सुभेदारी मिळाल्यानंतर महादजींनी सगळा हिंदुस्थान आपल्या पराक्रमाने उजाळुन टाकला.त्यांनी दिल्ली पुन्हा झींकुन रोहिल्यांचा पूर्ण पराभव केला.पनिपताचा सूड पुरेपुर उगवला.त्यानंतर शहाआलम बादशहाला दिल्लीच्या गादिवर बसवून उत्तरेत मराठ्यांचा दबदबा पुन्हा निर्माण केला. परंतु जरा स्थिरस्थावर होते न होते तोच रघुनाथरावाच्या अततायीपनाने मराठा राज्यावर इंग्रजांचे संकट आले. या संकटाचा मराठ्यांनी यशस्वी मुकाबला केला आणि वडगावला इंग्रजांचा साफ पराभव केला,तो प्रामुख्याने महादजींच्या नेतृत्वाखाली..

या वेळे पर्यन्त इंग्रजांना भरताता पराभव माहित नव्हता.

वडगावची लढाई जर इंग्रजांनी जिंकली असती तर पुढे 1818 साली जे मराठ्यांचे राज्य बुडाले ते चाळीस वर्ष अगोदरच घडले असते. आशा युद्धात सेनापतित्वाचा खरा कस लागतो आणि यात महादजी अजेय ठरले.पानीपतावर गेलेली प्रतिमा मराठा राज्याने वडगावच्या लढाईत पुन्हा प्राप्त केली.पुढे सालाभाईच्या तहाने ती कायम प्रस्थापित झाली आणि अठरावे शतक संपेपर्यन्त ती टिकून राहिली.

या कालखंडात मराठा साम्राज्य टिकले ते महादजी शिंदे यांच्या बुध्दिकौशल्य आणि रणकौशल्य यामुळेच महादजी नुसतेच उत्तम सेनापती नव्हते तर पहिल्या प्रतिचे मुत्सुदी होते,याचे अनेक दाखले त्यांच्या चरित्रात सापडतात. उत्तर हिन्दुस्थानत किती सत्तांना आपल्या क़ाबूत ठेवावे लागे त्यावर नुसती नजर टाकली तर आश्चर्य वाटते-मुग़ल,रोहिल,अवधचा नवाब,राजपूत,जाट,शिख,बुंदेले, इंग्रज इतक्या सत्तांना तोड़ द्यावे लागे.

हे सारे उत्तरेचे राजकारण महादजींनी सुमारे पंचवीस वर्षे एकहाती संभाळले आणि तेहि अत्यंत यशस्वीपणे हाच त्यांच्या बुध्दिकौशल्याचा पुरावा काहे …!!
महादजींनी पानीपतावर जवळपास नामशेष झेलेले शिंदयांचे लष्कर पुन्हा उभारले इतकेच नव्हे , तर तत्कालीन भरतातले अजिंक्य सैन्य अशी प्रतिष्ठा त्याला प्राप्त करुण दिली.

मराठ्यांनी निजामाशी खरडा येथे मोठी लढाई दिली आणि ति जिंकली.ही मराठ्यांनी जिंकलेली अखेरची लढाई. या लढाईच्या वेळी झाडून साऱ्या सरदरांच्या सरंजामी फौजा गोळा करण्यात आल्या होत्या.पण शिंदयांच्या फौजेखेरिज नवाबाशी लढाई करणे नानाना शक्य वाटेना म्हणून त्यांनी उत्तरेतुन शिंदयांची कवायती व इतर फ़ौज बोलवली आणि पुढे याच फौजेने यूध्दाला निर्णायक कलाटनी दिली.

या युद्धाच्या वेळी इंग्रजांचा वकील मँलेट हा मराठ्यांच्या छावनीत होता.त्याने तेथून एक खलीता आपल्या सरकारला लिहिला त्यात तो म्हणतो महादजी शिंध्यानी डी बॉय कवायतीचे कुठेच तोड़ नाही,कवायातीतला ज्या प्रमाणे आपल्या सरकरातिला क्वायतीस सुख सुविधा असून सुद्धा आपल्या वाद आहेत,या पैकी कोणतीही सोय सुविधा नसून देखील महादजीची कवायती फ़ौज ही अजिंक्य आहे.

ज्या इंग्रजांनी कवायती पलटनीच्या जोरावर सारा भारत जिंकला ,त्याच इंग्रजांनी महादजीच्या कवायती पलटनीना दिलेले हे शिफारस पत्र पाहिले म्हणजे महादजींचा कर्तुत्वाची ओळख पटते.

प्रत्येक मराठ्याची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी गोष्ट आहे.

महादजींचे व्यक्तिमत्व बहुरंगी होते,ते पराक्रमी योध्दे,उत्तम सेनापती प्रजा दक्ष राजा,कसलेले मुत्सुदी तर होतेच पन ते स्वतः भक्ति पर रचना करत आणि त्या स्वतः म्हणत असत. माधव विलास नावाचा भक्ति पर रचनांचा संग्रह त्यांनी लिहिला…..

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महादजी

Courtesy शेखर शिंदे सरकार

वाचा तानाजी मालुसरे व शिवरायांची कवड्याची माळ संपूर्ण इतिहास

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *