गुटखाकिंग रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?

जेष्ठ उद्योगपती आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकभाऊ धारीवाल (वय ७८) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरुर तालुक्यातील बडे प्रस्थ म्हणून त्यांची ओळख होती. आधी तंबाखूचा व्यापार त्यानंतर गुटखा व्यवसायात त्यांनी नाव कमावले. आधीचा ‘माणिकचंद’ आणि नंतरचा ‘आरएमडी’ हे गुटख्याचे जगप्रसिद्ध ब्रँड त्यांचेच आहेत. शिरुर शहराचे ते २१ वर्षे नगरसेवक होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. धारीवाल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली तसेच या संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही दिल्या जातात.

परंतु हि झाली सामाजिक ओळख चला बघूया रसिकलाल माणिकचंद धारीवाला विषयी काही खासरे गोष्टी…

धारिवाल हे गाड्याचे शौकीन होते. भारतात कुठलीही महागडी गाडी आल्यास पहिली खरेदी धारिवाल करत असे. मारुती ८०० असो , लान्सर, स्कोडा, ओपरा मिनी कूपर किंवा मे-बैक सारखी ५ करोड़ रुपयाची गाडी पहिली खरेदी रसिकलाल यांनी केली आहे.

मुलीला भेट दिलीली मे-बैक गाडी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. गाड्यांचा शोक त्यांना १९५० पासून होता तेव्हा त्यांनी स्टडबेकर हि गाडी ९०० रुपयात खरेदी केली होती.

त्यांच्या कडे गाड्याचा फार मोठा संग्रह आहे. ज्यामध्ये बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बैंज, लेक्सस व जग्वार या कंपनीचे कोणतेही नवीन मॉडेल आल्यास ते खरेदी करत असे.

रसिकलाल १४ वर्षाचे असताना त्यांच्या वडलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कडे वडिलाची बिडी फैक्ट्री आली. आज त्यांनी व्यवसायात एवढी प्रगती केली कि त्यांच्याकडे इंटरनेशनल स्कूल, दानार्थ संस्थान, कंस्ट्रक्शन, पैकेजिंग, मिनरल वॉटर व दवाखाना याचा मोठा ग्रुप आहे.

रसिकलाल यांनी दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीचा मुलगा प्रकाश सर्व व्यवसाय सांभाळतो. रसिकलाल यांच्या दुसरी पत्नी शोभा यांची मुलगी जान्हवी हि आहे. रसिकलाल दुबई येथे राहत होते. त्यांचा व्यवसाय पुणे पासून ६० किमी दूर सरादवाडी येथे आहे.

धारीवाल यांचे घर

मागे सोशल मिडीयावर धारीवाला यांच्या घराचा विडीओ वायरल झाला होता. घराच्या सुरवातीला मुझिकल कारंजे लावण्यात आले आहे. घरात बहुमुल्य झुंबर लाऊन लक्झरी लुक देण्यात आलेले आहे. मुख्य हॉल मध्ये इटालियन मार्बल आणि मोठा सोफा व टीव्ही लावण्यात आलेला आहे. याच हॉलमध्ये एक डिजिटल फोटो फ्रेम आहे. घरातील सर्व फर्निचर गोल्डन कलर मध्ये आहे. बेडरूममधील प्रत्येक वस्तू जांभळ्यारंगाची आहे. या प्रसंगी पालकमंत्री गिरीष बापट सुध्दा उपस्थित होते. हा बंगला पुणे येथील कोरेगाव पार्क भागात आहे. उद्घाटन समारंभचा विडीओ आपण खाली बघू शकता.

दाऊद कनेक्शन

दाउद इब्राहीमचा भाऊ अनिस याच्या चौकशीत मुंबई पोलिसांसमोर दोन नावे आली होती रसिकलाल धारीवाल व जेएम जोशी हे दोघेही गुटखा व्यापारी आहे. गोवा मध्ये या दोघांचा बिझनेस सोबत होता. सीबीआयने या दोघा विरोधात आरोपपत्र सुध्दा दाखल केले होते. त्यामध्ये असा उल्लेख होता कि जोशी व धारीवाल यांच्या मध्ये एक डील दाउदनि केली होती. याचा मोबदला म्हणून पाकिस्तानमध्ये गुटखा व्यापारा करिता यांनी दाउदला मदत केली होती. परंतु काही दिवसा अगोदरच यांना या प्रकरणात अंतिम जमीन मिळाला आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… खारसे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली….

वाचा स्वदेशी आंदोलनातून जन्म झाला जगप्रसिद्ध पारले जी बिस्किटचा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *