कर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट

दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना बोनस अनेक कंपन्या देतात. परंतु आज आपण खासरे एका अश्या व्यापाऱ्याविषयी माहिती बघणार आहो ज्यांनी दिवाळीला तब्बल ५१ कोटी रुपये खर्च करून कर्मचाऱ्याची दिवाळी हि अविस्मरणीय केली…

सावजीभाई ढोलकिया उर्फ सावजीकाका हे गुजरात मधील प्रसिध्द नाव ते गुजरात येथी हिरा व्यापारी आहे. त्यांनी यावर्षी हरे कृष्णा एक्सपोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांना १२६० कार व ४०० फ्लॅट भेट दिल्या आहे. यासाठी त्यांचा खर्च तब्बल ५१ करोड रुपये झाला आहे.

ढोलकिया यांनी कंपनीत काम करणाऱ्या उत्कृष्ट १७१६ कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना हि अविस्मरणीय भेट दिली आहे. ज्यांच्या कडे घर आहे त्यांना कार व ज्यांना घर नाही त्यांना फ्लॅट त्यांनी गिफ्ट केले आहेत.

१२.५० रुपये घेऊन केली होती व्यवसायाची सुरवात

सुरत येथे १९७७ साली सावजीभाई यांनी व्यवसायास सुरवात केली. केवळ १२.५० रुपये घेऊन सावजीभाई अमरेली वरून सुरत येथे आले होते. महिन्याला १६९ रुपये पगारापासून त्यांनी काम करायला सुरवात केली. ज्या कंपनीत ते काम करायचे त्याच कंपनीचे ते कालांतराने मालक झाले. कठोर परिश्रम आणि जिद्द याच्या भरवश्यावर सध्या त्यांच्या हिरा व टेक्स्टटाईल कंपनीत ५५०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.

२०११ पासून त्यांनी कर्मचाऱ्याना बंपर बोनस देण्याची हि प्रथा सुरु केली आहे. ११०० Sq Ft जागा असलेले फ्लॅट त्यांनी स्वतःच्या हाउसिंग स्कीममध्ये दिलेले आहे. ह्या सर्व १२६० कार Datsun कंपनीच्या असून पहिल्याच दिवशी कंपनीने ६५० कार त्यांना पोहचविल्या आहे. या कारचे विशेष म्हणजे या सर्वावर तिरंगा काढण्यात आलेला आहे.

सर्व फ्लॅट हे केवळ १५ लाख रुपयाच्या अत्यल्प किंमतीत कर्मचाऱ्यांना दिलेले आहे. ५ वर्षापर्यत स्वतः सावजीभाई याचे हफ्ते भरतील आणि उरलेली रक्कम कर्मचारी भरणार आहेत.

मागील वर्षी सुध्दा सावजीभाईने त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ४९१ कार व २०० मकान गिफ्ट केली होती. असा मालक प्रत्येक कर्मचाऱ्यास मिळायला हवा…

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Source Hindustan Times

वाचा जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

वाचा रोजंदारी शेतमजूर ते अमेरिकेत आयटी कंपनी सिइओ ज्योती रेड्डीचा संघर्षमय प्रवास..

3 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *