वयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनमधील सर्वात तरूण करोडपती भारतीय वंशाचा अक्षय..

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे Age is just a number म्हणजे वय हा फक्त एक आकडा आहे. याचा अर्थ असा कि तुमचे वय कितीही कमी अथवा जास्त असेल याचा काहीही फरक पडत नाही. हि म्हण अश्या व्यक्तीकरिता वापरतात ज्याचे वय जास्त आहे परंतु त्याचे राहणीमान अगदी तरून आहे. परंतु इथे आपण ह्या म्हणीचा वापर १९ वर्षीय मुला करिता करत आहो. या तरुणाने यशाचे असे शिखर गाठले आहे जे मोठ मोठ्या व्यक्तींना शक्य नाही आहे. भारतीय वंशाचा अक्षय रूपारेलीया ब्रिटन मधील सर्वात तरून करोडपती झालेला आहे हे सर्व त्याने केले फक्त एका वर्षात तर चला बघूया खासरे वर अक्षयचा हा प्रवास…

अक्षय १९व्या वर्षी एक यशस्वी उद्योजक झालेला आहे. त्याची ऑनलाईन कंपनी Doorstep.co.uk १६ महिन्याच्या आत ब्रिटन मधील सगळ्यात मोठ्या १८ सर्वात मोठ्या कंपनी पैकी एक झाली आहे. अक्षयच्या कंपनीची किंमत एका वर्षात एक करोड वीस लाख पौंड (1,02,69,48,000 भारतीय रुपये) एवढी आहे. ब्रिटन मधील सर्वात तरूण उद्योगपत्यापैकी तो एक आहे.

ज्या वयात आपण फुटबॉल व क्रिकेट खेळतो, कॉलेज कैन्टीन किंवा कट्ट्यावर मस्ती करत असतो त्या वयात अक्षय अभ्यासासोबत जमिनीचे सौदे करण्याचे काम करत आहे. त्याच्या माहिती नुसार त्याने जेव्हापासून कंपनी सुरु केली तेव्हा पासून आजपर्यंत त्याने १० करोड पौंड रुपयाचे जमिनीचे सौदे केले आहे. त्याने कंपनीची सुरवात ७००० पौंड उधार घेऊन सुरु केली होती, आता त्याच्या कंपनीमध्ये १२ लोक काम करतात. अक्षयचे वडील कौशिक केअर वर्कर आहे आणि आई रेणुका हि दिव्यांग मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे.

वाचा १५ वर्षाचा मुलगा संपत्ती एवढी कि घरी पाळतो वाघ, सिंह…बघा आहे कोण हा मुलगा?

अक्षय नि ६ महिन्या अगोदर Doorstep.Co.Uk हि वेबसाईट सुरु केली. कॉलेज मुळे त्याला काम करता येत नसे. त्यामुळे त्याने एका कॉल सेंटर वाल्यास हे काम दिले जेव्हा तो कॉलेजमध्ये असायचा तेव्हा त्याच्या ग्राहकाच्या प्रश्नाचे उत्तरे कॉल सेंटर वाले देत असत आणि कॉलेज सुटल्यावर तो स्वतः ग्राहकासोबत बोलत असे.

अक्षय त्याच्या कडे असलेल्या जमिनी विकण्याकरिता ब्रिटनमधील स्वयं रोजगार असणाऱ्या विवाहित स्त्रियांची मदत घेतो. त्याच्या कंपनीचे विशेष हे आहे कि तो जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारावर तो अतिशय कमी दलाली घेतो. यामुळे अगदी कमी वेळात त्याची कंपनी एवढी लोकप्रिय झाली आहे. अक्षय सांगतो कि लोक स्त्रीयावर विश्वास करतात त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी लवकर विकल्या जाते.

अक्षयला ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी तर्फे अर्थशास्त्र व गणित या विषयात अभ्यासाकरिता ऑफर सुध्दा आली आहे, परंतु त्याला सद्या आपल्या बिझनेसवर लक्ष देऊन तो अधिक वाढवायचा आहे. अक्षय आपल्या कंपनीच्या नफ्यातून प्रत्येक महिन्याला एक लाख पौंडची पहिली कार घेण्याकरिता बचत करत आहे.

तर अक्षयने हे सिद्ध केले आहे कि आपल्याकडे काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर यश आपल्या पासून दूर नाही. वय कितीही कमी असो याचा फरक पडणार नाही. अक्षयला खासरे तर्फे शुभेच्छा…

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Source Financial Expres

वाचाजाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…

वाचा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *