बिग बॉस स्टार सपना चौधरी विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि रागिनी शैलीतील सिंगर सपना चौधरी बिग बॉस या कार्यक्रमात धमाल उडवीत आहे. परंतु तिच्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सपना हरियाणाच नाही तर पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही फेमस आहे. २६ वर्षांच्या सपनाचे अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले होते. मोठ्या संघर्षातून तिने गाणे आणि डान्सिंगमध्ये आपली कारकिर्द घडवली आहे. तिच्या या गुणांच्या जोरावरच तिने कुटुंबाचेही पालन पोषण केले. चला बघूया खासरेवर सपना चौधरी विषयी काही अपरिचित माहिती..

२५ डिसेंबर १९९० ला हरियाना येथील रोहतक जिल्ह्यातील कसबा नजफगड येथे सपना चौधरीचा जन्म झाला. तिचे शिक्षक रोहतक येथे पूर्ण झाले. सपनाचे वडील खाजगी कंपनीत काम करत होते. २००८ साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सपना फक्त १२ वर्षाची होती. तिची आई नीलम चौधरी आणि भावंडाची जवाबदारी सपनाने खांद्यावर घेतली आणि गायन व नृत्य यामध्ये तीने आपले करीयर बनविले.

आज सपना एका प्रोग्रामचे लाख रुपये एवढी फी घेते परंतु सुरवातीस तिला फक्त एका कार्यक्रमाचे ३००० रुपये मिळत ती सांगते कि तिचा पहिला कार्यक्रम १० डिसेम्बर २०१२ ला कैथल जिल्ह्यात पुंडरी येथे झाला ज्याचा मोबदला तिला काहीच मिळाला नाही.

लोकसंगीताचा बाज असलेली सपनाची गीते हरियाणा, पंजाबमध्ये प्रसिद्ध आहेत. सपनाचे पहिले गाणे ‘सॉलिड बॉडी रै’. या गाण्याने सपनाला काही दिवसांमध्येच हरियाणामध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर बसविले.

सपना सगळी कडे फेमस झाली ते गाणे म्हणजे ‘सॉलिड बॉडी’हे आहे. रातोरात सपना संपूर्ण हरियाना,पंजाब,राजस्थान,युपी,दिल्ली, सगळीकडे ती फेमस झाली. यानंतर तिच्या कुठलाही कार्यक्रम पोलीस संरक्षणाशिवाय पूर्ण झाला नाही..

गुडगावच्‍या चक्करपूर परिसरात झालेल्‍या एका कार्यक्रमात सपना आणि तिच्‍या पथकाने रागिनी शैलीमध्‍ये ‘जात-पात का बिगडग्या’ हे गीत गावून दलितांचा अपमान केला असे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर सपनावर गुन्हा नोंद करण्यात आला तिने दलितांना बावला शब्द वापरला ह्या कारणामुळे तिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

यानंतर सपनासोबतचा करार मोर मुझ्यिक कंपनीने सम्पुष्टात आणला. ह्या सर्व दबावामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु ती सुखरूप वाचली. आणि तिचा प्रसिद्धीचा आलेख सतत वाढत राहिला आहे.

युवकांमध्येतर सपनाची प्रचंड क्रेझ आहे. जेव्ही तिचा कार्यक्रम असतो तेव्हा लोक इतर कलाकार स्टेजवर आल्याबरोबर सपनाला बोलावण्याचा आग्रह धरतात.

एका शासकीय कार्यक्रमात सपना आणि राज्याचे परिवहन मंत्री कृष्ण पंवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकांनी मंत्री महोदयांना दोन मिनीट बोलण्याचीही संधी दिली नाही आणि सपनाचा कार्यक्रम सुरु करण्याचा आग्रह धरला. बहादूरगडमधील एका कार्यक्रमात सपनाला पाहाण्यासाठी आणि तिचे गाणे ऐकण्यासाठी लोक घरांच्या छतावर, झाडांवर चढले होते.

हि आहे सपना चौधरी आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *