नक्की वाचा दररोज दही खाल्ल्याने होणारे फायदे…

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे ताक, लस्सी असे पेय प्यायला हवे.

ताप

तापेमध्ये तोंड कडू पडते. काहीही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही. अशावेळी दही-भात खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामधील रोगप्रतिकारक तत्त्व आणि अँटीऑक्सीडेंट्स तापेचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते. तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा.

प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनचा खजिना

दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनमुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे. दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.

वाचा प्लेटलेट्स मानवी शरीराची कवचकुंडलं विषयी संपूर्ण माहिती…

बध्दकोष्ठता व पोटाची समस्या

दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. तसेस दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही. अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही-भात खाणे फायदेशीर असते. भात पचण्यास सोपा असतो. यामुळे वेदना आणि त्रास होत नाही. दह्यामुळे पचनशक्ती चांगली होते. ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे.

हृदयरोगावरही आहे गुणकारी

दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार थांबवण्याची क्षमता आहे. रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळू हळू कमी होईल.

आतड्यांचे रोग

अमेरिकी आहारतज्ञांच्या मते दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग व पोटासंबंधित आजार बरे होतात. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.

वजन कमी

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दही-भात खाणे आवश्यक आहे. परंतु दोन्ही वेळी दही भात खाऊ नये. मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे. वजन वाढवायचे असल्यास दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो.

तणाव

दही खाल्ल्याने ताण कमी होण्यासही मदत होते. त्यामधील प्रोबायोटीक बॅक्टेरिया आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स, चांगले फॅट्स फायदेशीर ठरतात. दह्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा का वाढतो ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा धोका ! लक्षणे आणि बरे करण्याचे उपाय..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *